राजश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना यामध्ये सुधारणा करण्याबाबत, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय १६-०३-२०२४
महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योनजा नियमात सुधारणा करण्याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय दिनांक ०७-०२-२०१४
महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंतांना मानधन या योजने अंतर्गत कलावंताची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती नेमण्याबाबत सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक ०१-०६-२००४
महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व वृद्ध कलावंतांना मानधन या योजनेत मान्यता आणि त्या अंतर्गत देण्यात येणा-या अर्थ सह्य्यात मान्यता देण्याबाबत, समाज कल्याण सांस्कृतिक कार्य,क्रीडा व पर्यटन विभाग शासन निर्णय दिनांक १६-०३-१९९१
1. कलाक्षेत्रात 30 वर्षे अनुभव असणा-या व वयाची 50 वर्षे पूर्ण असणारे कलाकारांना मानधन देणेसाठीची योजना आहे.
2. योजनेचे निकष -1. कलाकाराची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रू. 48000/-; वय- 50 वर्षांपेक्षा अधिक असावे.
3. विहीत नमुन्यातील अर्जासोबत वार्षिक उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला तसेच कलेचे 03 पुरावे जोडणे आवश्यक आहे. सदरचा आवश्यक कागपत्रांसह विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्यांच्या गटविकास अधिकारी यांचेमार्फत या कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. 2. कलावंत मानधनाचे दर (दरमहा) – 1. अ श्रेणी- रू. 3150/-; ब श्रेणी- रू. 2700/- ; 3. क श्रेणी- रू. 2250/- 3. रत्नागिरी जिल्हास्तरीय वृध्द कलावंत व साहित्यिक निवड समितीद्वारे पात्र कलावंत व साहित्यिकांची श्रेणी ठरवून निवड करणेत येऊन त्यांची मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचेकडे मानधनाकरीता शिफारस केली जाते. मा. संचालक यांचेकडून संबंधित मंजुर कलावंत/साहित्यिकांच्या बँक खात्यामध्ये मानधन वर्ग करणेत येते.