कार्यालयीन उपस्थीती कार्यालयीन उशिरा उपस्थिती व विनापरवानगी अनुपस्थितीबाबत सर्वकष सूचना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २१-०६-२००८
परिपत्रकः
मंत्री आस्थापनेवरील सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याविषयीच्या. तसेच कार्यालयात उशिराने उपस्थित होणाऱ्या अधिकारी / कर्मचा-यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. असे असूनसुध्दा मंत्री आस्थापनेवरील काही अधिकारी / कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे आणि कार्यालयीन वेळेआधी कार्यालय सोडत असल्याचे तसेच रजा मंजूर करुन न घेताच अनुपस्थित राहत असल्याचे व नोंदणी कार्ड प्रणालीद्वारे त्यांच्या उपस्थितीची नोंद करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व बाबींची अत्यंत गांभीर्याने नोंद घेतली असून याबाबत मंत्री आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचा-यांना खालीलप्रमाणे सर्वसमावेशक सूचना देण्यात येत आहेत.
१. मंत्री आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे व कार्यालयीन वेळेआधी कार्यालय सोडू नये. कार्यालयीन वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्या आणि कार्यालयीन वेळेआधी कार्यालय सोडणाऱ्या अधिकारी / कर्मचा-यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.
२.मंत्री आस्थापनेवरील अधिकारी/ कर्मचारी कार्यालयात गैरहजर असूनही त्यांची त्या दिवसाची हजेरी /उपस्थिती 'समय प्रणाली' वर नोंदविली गेल्याचे निदर्शनास आल्यास अशाप्रकारच्या गोष्टींस संबंधित अधिकारी / कर्मचारी व्यक्तिशः जबाबदार राहतील. तसेच, ही बाब गंभीर समजण्यात येऊन संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबत मंत्री आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचा-यांचे लक्ष वेधण्यात येत आहे. कार्यालयात गैरहजर असूनही 'समय प्रणाली मध्ये उपस्थिती नोंदविली गेल्याचे निदर्शनास आल्यास तर अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुध्द कोणतीही पूर्वसूचना न देता निलंबनाची कारवाई करण्यात येईल याची मंत्री आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
३. मंत्री आस्थापनेवरील जे अधिकारी कर्मचारी पूर्वपरवानगीने रजा मंजूर न करता कार्यालयात अनुपस्थित राहतील तसेच समय प्रणालीत आपल्या उपस्थितीची नोंद करीत नसतील अशा अधिकारी / कर्मचा-यांची त्या दिवसाची अनुपस्थिती, शासन परिपत्रक क्रमांक समय १००६/प्र.क्र.३३/२००६/१८ (र.व.का.) दि.१३ जून, २००६ मधील तरतुदींनुसार विनावेतन रजा करण्यात येईल याचीही सर्व अधिकारी / कर्मचा-यांनी नोंद घ्यावी.
४.मंत्री आस्थापनेवरील कांही अधिकारी व कर्मचारी त्यांना अनुज्ञेय असलेल्या आठ नैमित्तिक रजा वर्षाच्या
सुरुवातीच्या काही कालावधीतच संपबून तद्नंतर किरकोळ कारणासाठी अर्जित वा अर्धवेतनी रजेची मागणी करतात.मात्र, अर्जित अर्धधेतनी रजेची मागणी करताना त्यामागील कारण समर्पक नसेल तर संबंधित मंत्री आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचा-यास रजा मंजूर केली जाणार नाही.
मंत्री आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या मोठ्या कालावधीच्या अर्जित रजेच्या मागणीचा वर्षातून एकदा किंवा अपरिहार्य कारणास्तव एकापेक्षा अधिकवेळा विचार केला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशा रजेबाबतचा अर्ज किमान १५ दिवस अगोदर पर्ण्यवेक्षीय अधिकाऱ्याच्या शिफारशींसह आस्थापना शाखेस प्राप्त झाला आहे हे पाहण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी / कर्मचा-याची राहील.
नैमित्तिक रजा खर्च करुन टाकणे व तद्भुतर पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित राहणे अशी प्रवृती असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती "असाधारण रजा" करण्यात येईल.
५. मंत्री आस्थापनेवरील ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा उपभोगावयाची आहे, त्यांनी त्याबाबतचा लेखी अर्ज त्यांच्या पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांमार्फत किमान एक दिवस अगोदर आस्थापना शाखेस (सा.प्र.वि./का.२१) पाठविणे आवश्यक आहे. पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांची त्या दिवसाची अनुपस्थिती "असाधारण रजा" करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
६. काही अरिहार्य कारणामुळे पूर्वपरवानगीशिवाय रजा घेणे क्रमप्राप्त ठरले तर अशावेळी संबंधितांनी याबाबत आस्थापना शाखेस तसेच आपल्या पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना त्याबाबत त्याचदिवशी तात्काळ कळविणे आवश्यक राहील. अनुपस्थितीबाबत आस्थापना शाखेस अवगत न केल्यास व आस्थापना शाखेकडून शिस्तभंगविषयक कारवाई सुरू झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांची राहील.
७. कार्यालयीन उपस्थितीची नोंद संगणकावर घेतली जात असल्यामुळे मंत्री आस्थापनेवरील सर्व अधिकारी /कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या रजेच्या अर्जावर ओळखपत्र क्रमांक (ID No.) न विसरता टाकावा. जेणेकरुन त्यांच्या रजेची नोंद आस्थापना शाखेस संगणकावर घेणे सुलभ होईल.
८. असे निदर्शनास आले आहे की, रजा उपभोगून आल्यावर बहुतांशी अधिकारी / कर्मचारी रुजू अहवाल आस्थापना शाखेत सादर करीत नाहीत किंवा विलंबाने सादर करतात. यापुढे सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी रजेवरुन परत आल्यावर त्यांचा रुजू अहवाल आपल्या पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने त्याच दिवशी आस्थापना शाखेला सादर करावा. विलंबाने रुजू अहवाल देणाऱ्या व रुजू अहवाल सादर न करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची अनुपस्थिती असाधारण रजा करण्यात येईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.
९. पर्यवेक्षीय अधिकारी आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करतात. असे कर्मचारी रजेवर गेल्यानंतर पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांकडून पर्यायी कर्मचारी उपलब्ध करुन देण्याची मागणी आस्थापना शाखेकडे केली जाते. मंत्री आस्थापनेवरील मर्यादित साबधी पदे विचारात घेता पर्यायी कर्मचारी उपलब्ध करुन देणे शक्य नसते. आपल्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांना रजा मंजूर करणा-या अधिकाऱ्यांनी आपल्याच अधिपत्याखालील अन्य कर्मचाऱ्यांच्या सेवा ग्जेवर जाणा-या कर्मचा-याबद्दल पर्यायी कर्मचारी म्हणून घ्याव्यात. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
कार्यालयीन उपस्थीतीची तपासणीबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २८-०९-२००६
२.
उशिराने उपस्थित होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे बाबत कार्यालय प्रमुखांनी उपस्थितीबाबत दररोज सकाळी ९.५५ वाजता तपासणी करावी अशा सूचना वरील परिपत्रकानुसार देऊनही त्याचे पालन होत नसल्याचे दिसून येते. मंत्रालयीन विभागातील काही अधिकारी / कर्मचारी कार्यालयात गैरहजर असूनही त्याची त्या दिवसाची हजेरी उपस्थिती नोंदणी कार्डस प्रणाली (Time Attendance System) वर नोंदविली गेली आहे. यावरुन त्या अधिकारी / कर्मचाऱ्याला देण्यात आलेल्या उपस्थिती नोंदणी कार्डचा वापर अन्य कर्मचाऱ्याने केला असून ही बाब अतिशय गंभीर असून संबंधितांवर यासाठी गुन्हा दाखल होवू शकतो याची नोंद विभाग / कार्यालय प्रमुखांनी घेवून कार्यालय उपस्थितीबाबत दिनांक १३ जून, २००६ च्या शासन परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार विभाग / कार्यालय प्रमुखांनी अधिकारी / कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत दररोज सकाळी ९.५५ वाजता तपासणी करुन याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांविरुध्द योग्य ती कार्यवाही करावी असे याद्वारे सूचित करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्याने रजा मंजूर करुन घेतल्यास किंवा कार्यालयीन कामासाठी परस्पर बाहेर जाणार असल्याचे माहिती असल्यास त्या व्यतिरिक्त जो कर्मचारी गैरहजर असेल त्यांची उपस्थितीची तपासणी संबंधित कार्यासनाच्या अवर सचिव/ कक्ष अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे व जर कर्मचारी पूर्वपरवानगी न घेता अनुपस्थित असल्यास आणि कार्ड पंचिंग मशिनवर कार्ड पंच केल्याचे आढळून आल्यास तसे आस्थापना शाखेकडे कळविण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित कार्यासनाच्या अवर सचिव / कक्ष अधिकारी यांची राहिल.
३. अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेची शिस्त कटाक्षाने पाळावी आणि कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याची विशेष काळजी घ्यावी. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
कार्यालयीन उपस्थिती जाण्या येण्याचा वेळेमध्ये सवलत देणा-या कर्मचा-याच्या उपस्थितीची तपासणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १२-०९-२००६
प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याविषयी व उशिराने उपस्थित होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याबाबत योग्य ती कारवाई करावी याविषयी वरील शासन परित्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत.
२. जेथे कार्डर्पोचंग व्यवस्था केलेली आहे अशा कार्यालयामध्ये दिनांक १ जुलै, २००६ पासून हस्तहजेरी पुस्तक (manual muster) बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विभागातील / कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यासाठी आणि कार्यालयातून जाण्यासाठी वेळेत खास सवलत देण्यात आली असल्यास त्या विभागाने / कार्यालयाने आपल्या सचिवांच्या स्वाक्षरीने अशा कर्मचाऱ्यांच्या येण्याच्या / जाण्याच्या वेळा कायमस्वरुपी निश्चित करुन किंवा सवलत किती महिन्यांसाठी / वर्षांसाठी अनुज्ञेय आहे तो कालावधी नमूद करुन तसे आदेश काढावे व या आदेशाची प्रत माहिती व तंत्रज्ञान कक्षाकडे (ओळखपत्र क्रमांकासहित) पाठविण्यात यावी. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान कक्षाकडून अशा कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात येण्याच्या / जाण्याच्या वेळा कार्ड पंच मशिनवर सुधारित केल्या जातील. सदर कर्मचारी त्यांच्या दिलेल्या सुधारित वेळेनुसार कार्यालयात येतात / जातात किंवा कसे याची शहानिशा संगणकाच्या माध्यमातून विभाग / कार्यालय प्रमुखांनी करावी.
३.कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेल्या सुधारित वेळेची कर्मचाऱ्यांनी शिस्त कटाक्षाने पाळावी व त्याप्रमाणे कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याची विशेष काळजी घ्यावी. वरील सूचनांचे पालन अत्यंत काटेकोरपणे होण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागावर राहिल.
कार्यालयीन उपस्थिती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०६-२००६
१.शासकीय कार्यालयाची कामकाजात्ती वेळ सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.समय-१०८८/१२/अठरा (र.व.का.) दि. ३१ ऑगस्ट, १९८८ अन्वये विहित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वसाधारण शासकीय कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी ९.४०५ ते सायंकाळी ५.३० (गट अ, ब आणि क साठी) अशी विहित करण्यात आली आहे. मात्र कार्यालयातील गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.१५ अशी ठरविण्यात आली आहे. वाहतूकीतील बारीक सारीक विस्कळीतपणा व अन्य कारणासाठी क्र. समय १०९२/प्र.क्र.५३/१८. दि.३१/१०/१९९२ च्या परिपत्रकान्वये कार्यालयात उपस्थित राहण्याच्या विहित वेळेत १० मिनिटांचा अवधी "ग्रेस पिरीयड' म्हणून देण्यात आलेला आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी उशिरात उशिरा ९.५५ पर्यंत तर गट 'ड' मधील कर्मचाऱ्यांन सकाळी ९.४० पर्यंत त्यांची उपस्थिती स्मार्ट कार्डद्वारे नोदविणे आवश्यक आहे.
२. संदर्भाधीन परिपत्रकातील सूचनानुसार दि.१ जुलै, २००६ पासून विभागासाठी हस्त हजेरी पुस्तकाचा (Manual Muster) वापर पूर्णप बंद करण्यात येणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी गाची कार्यालयातील उपस्थिती केवळ उपस्थिती नोदणी कार्डस प्रणालीद्वारे (कार्ड पचिग) नोदविली जाणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयामध्ये वक्तशीर व पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना असून त्याप्रमाणे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
३.प्रत्येक अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांची उपस्थिती नोदविण्यासाठी कार्यालयात प्रवेश करतेवेळी व संध्याकाळी कार्यालय सोडताना दोन्ही वेळा स्मार्ट कार्ड (पंचिग कार्ड) पंच करणे आवश्यक आहे. जे अधिकारी/कर्मचारी कार्ड पंच करणार नाहीत किंवा एकदाच पंच करतील अशाच्या बाबतीत सदर्भाधीन परिपत्रकातील निदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.
४.एखादा अधिकारी/कर्मचारी शासकीय कामानिमित्त कार्यालयाबाहेर जाणार असल्यास / कार्यालयात उशिरा येणार असल्यास सदर कामकाजाच्या स्वरुपाची माहिती संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना पुरेशी आधी असल्याने तशी सहमती देणारी टिप्पणी किमान एक दिवस अगोदर आस्थापना शाखेस पाठविणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही आणि संबधितांच्या उपस्थितीसंबंधात 'त्तमय' (SAMAY) आज्ञावलीतील नोद ग्राहय धरण्यात येईल.
५.अगदी अपवादात्मक परिस्थितीत अशी पूर्वानुमती / पूर्वसूचना देण शक्य झाले नाही तर अधिकारी/कर्मचाऱ्यानी कार्यालयात उपस्थित झाल्याचे त्रितशा जास्थापना शाखस अनुपस्थितीबाबत लखो कळवावे.
कार्यालयीन उपस्थिती उशिरा उपस्थितीची तपासणी सामान्य प्रशासन विभाग दिनांक १३-०६-२००६
प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित रहाण्याविषयी व उशिराने उपस्थित होणाऱ्या अधिकारी /कर्मचारी यांच्याबाबत योग्य ती कारवाई करावी या विषयी वेळोवेळी शासन परिपत्रकान्वये
२..सूचना दिलेल्या आहेत. तथापि, कार्यालयात अधिकारी / कर्मचारी वेळेवर येत नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आले असून शासनाने त्याची गंभीर दखल घेतत्नी असून शासन वरील परिपत्रकांतील सूचनांचा पुनरुच्चार करीत आहे.