मंत्रालया व्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालयांनी / प्राधिकरणांनी लोक आयुक्त व उप लोक आयुक्त कार्यालय मुंबई यांचे कडून ई मेल द्वारे केल्या जाणं-या पत्रव्यवहारावर कार्यवाही करणे बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०७-१२-२०१६
करण्यात येत आहेत.
१. लोक आयुक्त व उप लोक आयुक्त कार्यालयाकडून तक्रारींच्या अनुषंगाने यापुढे केला जाणारा जास्तीत जास्त पत्रव्यवहार (गोपनीय पत्रव्यवहार वगळून) स्कॅन करुन ई- मेलद्वारे केला जाणार असून पोष्टामार्फत कोणतीही हार्डकॉपी मागाहून पाठविली जाणार नाही. २०५०२/२२८२४३५८)
२. लोक आयुक्त कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराला प्रतिसाद देण्यासाठी कालमर्यादा प्रत्येक पत्रात विहित केलेली असते. त्यामुळे लोक आयक्त कार्यालयाकडून येणारी सर्व ई – मेल व त्यासोबतची अटॅचमेंटस् रोजच्या रोज नियमितपणे तपासून ती संबंधित अधिकाऱ्यांकडे तात्काळ सुपूर्द केली जातील याची दक्षता घेण्यात यावी. तसेच ई- मेलद्वारे प्राप्त झालेल्या संदर्भाला विहित कालमर्यादेत प्रतिसाद दिला जाईल याची दक्षता संबंधतांनी घ्यावी.
३. लोक आयुक्त कार्यालयाला सादर करण्यात येणारे अहवाल (गोपनीय अहवाल वगळून) ई – मेलद्वारे वर नमूद केलेल्या पत्त्यांवर पाठविण्यात यावेत. संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले अहवाल स्कॅन करुन पाठवावेत. जेणेकरुन अहवाल पाठविणाऱ्या अधिकाऱ्याची ओळख स्वाक्षरीमुळे सुनिश्चित होऊ शकेल.
लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांनी सुनावणी साठी नेमलेल्या दिनांकास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २५-०३-२०११
(अ) लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्याकडील सुनावणीच्या वेळी संबंधित मंत्रालयीन विभागाचे प्रधान सचिव/ सचिव यांना आमंत्रित केले असेल तर त्यांनी व्यक्तीशः उपस्थित रहावे. अशा विशिष्ट दिनांकास त्यांना अन्य कामकाजामुळे उपस्थित राहणे शक्य नसेल तर सुनावणीच्या दिनांकास संबंधित प्रकरणाची सांगोपांग माहिती असलेल्या सह सचिव / उप सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच सुनावणीसाठी पाठवावे. त्यांच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवू नये.
(ब) ज्या प्रकरणात लोक आयुक्त यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, आयुक्त, महानगरपालिका, मुख्याधिकारी, नगरपरिषद यांना किंवा इतर विभाग प्रमुख यांना विनिर्दिष्टपणे व्यक्तीशः सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या असतील. अशा प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी अशा सुनावणीस व्यक्तीशः हजर रहावे.
(क) प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्याकडून जिल्ह्याच्या स्तरावर सुनावणी शिबिरे आयोजित केली असतील अशा वेळी संबंधित आमंत्रित केलेल्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी (उदा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद इत्यादी) सदर सुनावणीसाठी व्यक्तीशः उपस्थित रहावे.
(ड) लोक आयुक्त व उप लोक आयुक्त हे जिल्ह्याच्या ठिकाणी सुनावणी शिबिरासाठी येतील त्यावेळी सर्व राजशिष्टाचाराचे पालन केले जाईल, याची संबंधित प्रभारी राजशिष्टाचार अधिकारी यांनी व्यक्तीशः दक्षता घ्यावी.
(इ) उपरोक्त आदेश/सूचनांचे हेतुपूर्वक उल्लंघन करणारे अधिकारी/कर्मचारी महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम ११(२) मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र ठरतील याची देखील संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी नोंद घ्यावी.
लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कडून प्राप्त होणं-या पत्रव्यवहारावर करावयाच्या कार्यपद्धती बाबत एकत्रित सूचना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०८-२००६
मा. लाक आयुक्त व उप लाक आयुक्त यांच्या कायालयाकडून प्राप्त हाणाऱ्या संदर्भाना विर्धामंडळ कानकाजाप्रमाणं प्राथस्य देवून त्यानुसार बित्रित कालावधीत कार्यवाही कगण्याबाबत सूचना वेळोवेळी उण्यात आल्या आहेत, याबाबत एकत्रित सूजना मंत्रमथिन दिनांक ८ मार्च, २००१ व दिनांक २०.६.२००२ च्या परिपत्रकान्वये पुन्हा निवशानाय आणण्यात आल्या आहेत असे असूनही सतर सूचनांच योग्यरित्या पालन केलं जात नसल्याचं प्रकर्षान निदर्शनास आलं आहे. याबाबत मा. लांक आयक्त तसंच मा. उप लोक आयुक्त यांनी लोक आयुक्त कार्यालयाचे बन्धसे संदर्भ विविध शासकीय कार्यालयांकडे प्रवित असल्याचे निदर्शनास आणून त्यावावत नागजा व्यक्त कला आहे लोक आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त होणा-या पत्रव्यवहारावर करावयाच्या कार्यपद्धतीवावत एकत्रित सचना वरील परिपत्रकान्वये यापवीच देण्यात आल्या आहेत. तेव्हा सर्व मंत्रालयीन विभान विभाग प्रमुख तसंच कार्यालय प्रमुख यांचं मल वर्गल परिपत्रकांकडे पुन्हा बंधण्यात येत आहे. त्यानुसार त्यांनी नांक आयुक्त व उप लांक आयुक्त यांचेकडून प्राप्त होणा-या कामकाजाबाबत विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कडून प्राप्त होणं-या पत्रव्यवहारावर करावयाच्या कार्यपद्धती बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २०-०६-२००२
महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम १९७१ अन्वये लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्याकडुन प्राप्त होणा-या पत्रव्यवहारावर करावयाच्या कार्यपद्धतीबाबत एकत्रित सुचना संदर्भाधीन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील बार्बीचा समावेश. आहे.
१) लोक आयुक्त व उप लोक आयुक्त ही पदनामे वर्णलेखनारुप लिंहिणे.
२) लोक आयुक्त व उप लोक आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करावयाची कार्यपद्धती.
३) लोक आयुक्त किंवा उप लोक आयुक्त यांनी सक्षम प्राधिका-यांना केलेल्या शिफारशीवरील अनुपालन अहवाल विहित मुदतीत पाठविणे.
४) लोक आयुक्त किंवा उप लोक आयुक्त यांनी सादर केलेल्या विशेष अहवालावरील कार्यपद्धती.
५) लोक आयुक्त तसेच उप लोक आयुक्त यांचेकडील सुनावणीच्यावेळी अधिका-यांनी उपस्थित राहणे.
६) लोक आयुक्त तसेच उप लोक आयुक्त यांना तक्रारी / गा-हाणी यांच्यासंदर्भात अन्वेषणासाठी कागदपत्र उपलब्ध करुन देणे.
७) लोक आयुक्त किंवा उप लोक आयुक्त यांनी केलेल्या शिफारशीवरील अनुपालन अहवाल सक्षम अधिका-यांमार्फतच पाठविणे.
विधी