मा. लोकप्रतिनिधी इतर मान्यवर व नागरिकाकडून मा. मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदन , पत्रे यावरील कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि १०-०९-२०१५
लोकप्रतिनिधी, इतर मान्यवर आणि सर्वसाधारण नागरिकांच्या निवेदनावर मा. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शेऱ्यासंदर्भात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी :-
(अ) सर्वसाधारण पत्रावरील कार्यवाही :- अ. ज्या पत्रांवर प्रचलित नियमाप्रमाणे कार्यवाही करणे शक्य असेल, अशी निवेदने / पत्रे. संबंधित विभागाचे मंत्री व मा. मुख्यमंत्री यांच्याकडील विषयांच्या बाबतीत संबंधित राज्यमंत्री, यांची मान्यता घेऊन निर्णय घेण्यात यावा व तसे संबंधित लोकप्रतिनिधी, मान्यवर, सर्वसाधारण नागरिक यांना कळविण्यात यावे, त्याचा अहवाल मुख्यमंत्री सचिवालयातील विशेष कार्य कक्षास पाठविण्यात यावा. ब. धोरणामध्ये बदल करणे आवश्यक असेल तर अशा प्रकरणांचे प्रस्ताव मुख्य सचिव यांच्यामार्फत सकारण प्रस्ताव मा. मुख्यमंत्री यांना सादर करण्यात यावेत.
(ब) बदली / नियुक्ती संदर्भातील पत्रे असतील तर, त्याबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.:- १. बदली अधिनियमानुसार निश्चित केलेले सक्षम प्राधिकारी, तसेच बदली अधिकार प्रत्यावर्तीत केल्याप्रमाणे बदली करण्यास सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन असे प्रस्ताव हाताळण्यात यावेत.
२. ज्यांची बदली करणे शक्य आहे, अशा प्रस्तावांवर बदली करण्यास सक्षम असलेल्या प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने प्रकरण निकाली काढावे.
३. जेथे बदली करणे शक्य नाही, असे प्रस्ताव सकारण मा. मुख्यमंत्री यांना सादर करावे.
४. वरीलप्रमाणे कार्यवाही ही फक्त नियतकालिक (एप्रिल/मे) बदल्यांसाठीच लागू राहील.
५. एप्रिल / मे व्यतिरिक्त च्या कालावधीत बदली अधिनियमातील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने बदली करण्याचे प्रस्ताव हाताळण्यात यावेत.
विधान मंडळ, संसद सदस्यांना सन्मानाची सौजन्याची वागणूक देणे, त्याचेकडून आलेल्या पत्र ,अर्ज निवेदनांना पोच देणे त्यावर सत्वर कार्यवाही करणे,शासकीय कार्यक्रमाना लोकप्रतिनिधीना आमंत्रित करणे, त्याचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापणे इ बाबत मार्गदर्शक तत्वे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि २७-०७-२०१५
कर्मचाऱ्यांकडून सन्मानजनक वागणूक मिळण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना.
(৭) विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्यासंबंधी : विधानमंडळ / संसद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयांना कामानिमित्त भेट देतील, त्या वेळी त्यांना आदराची व सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. खासदार / आमदार यांचे म्हणणे शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक ऐकून घ्यावे व शासकीय नियमानुसार शक्य असेल तेवढी मदत लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामकाजात करावी. (ii) खासदार / आमदार भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उत्थापन देऊन अभिवादन करावे.
(iii) विधानमंडळ / संसद सदस्य यांनी दूरध्वनीद्वारे माहिती विचारल्यास अथवा चौकशी केल्यास सन्माननीय सदस्यांना यथोचित माहिती द्यावी. दूरध्वनीवरून सन्माननीय सदस्यांशी बोलताना आदराने व सौजन्याने बोलावे.
(iv) शासकीय कार्यालयात अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांना सौजन्यपूर्ण व आदराची वागणूक न दिल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात यावे व त्यांच्याविरुध्द प्रचलित शिस्तभंगविषयक नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
(v) विधानमंडळाची कोणतीही समिती एखाद्या शासकीय कार्यालयाला / निमशासकीय कार्यालयात भेट देते, त्यावेळी विधानमंडळाच्या कोणत्याही समितीची प्रतिष्ठा व विशेषाधिकार यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अशा समितीला नेहमी सौजन्यपूर्ण वागणूक देण्याविषयी विशेष खबरदारी घ्यावी. (vi) भेटीसाठी आलेल्या अभ्यागतांमध्ये विधानमंडळ / संसद सदस्य व इतर लोकप्रतिनिधी यांना प्राधान्य देणेः- पूर्वनियोजित अपरिहार्य शासकीय कामामध्ये व्यग्र असतांना भेटीसाठी आलेल्या विधानमंडळ / संसद सदस्यांच्या / इतर लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास पूर्वनियोजित अपरिहार्य कार्यक्रमात व्यग्र असल्याची बाब विनम्रपणे आणून सन्माननीय सदस्यांच्या सोयीची अन्य वेळ ठरवून घ्यावी. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या वेळेत भेटीसाठी येणाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांनी खासदार / आमदार यांना प्राधान्य द्यावे व भेटीची वेळ आगावू ठरवून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्यानंतर भेटीसाठी आलेले खासदार / आमदार यांना प्राधान्य देऊन अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घ्यावी. सन्माननीय लोकप्रतिनिधींना त्यांची संविधानिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांना मदत करतांना प्रयत्नांची शिकस्त करणे अपेक्षित आहे.
(२) शासकीय कार्यक्रम / समारंभाच्या वेळी विधानमंडळ सदस्य / संसद सदस्यांना आमंत्रित करणे इत्यादीबाबत :- शासकीय लोकोपयोगी / विकासात्मक कामांच्या भूमिपूजनाच्या / पायाभरणीच्या / शुभारंभाच्या /उद्घाटनाच्या, इत्यादी संदर्भातील कार्यक्रमांत स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असतो, म्हणून अशा कार्यक्रमाच्या वेळी त्या कार्यक्षेत्रातील सर्व विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, लोकसभा /राज्यसभा सदस्य महोदयांना योग्य ती पूर्वसूचना देऊन आमंत्रित करण्यात यावे. त्यांनाही विश्वासात घेऊन ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे याची खातरजमा करून या समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेत प्रमुख उपस्थितांच्या नांवाचा उल्लेख असल्यास त्यामध्ये सन्माननीय स्थानिक खासदार / आमदारांच्या नांवाचा समावेश करावा.
(1) ज्या मतदारसंघात शासकीय कार्यक्रम असेल, त्या मतदारसंघातील सर्व विधानमंडळ / संसद सदस्यांची नांवे निमंत्रणपत्रिकेवर योग्य प्रकारे छापण्यात यावीत. (ii) ज्या जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम/समारंभ असेल, त्या जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनाही सदर कार्यक्रमास आमंत्रित करावे. तसेच तत्संबंधीच्या निमंत्रण पत्रिकेवर पालक मंत्र्यांचे नांव योग्यप्रकारे छापण्यात यावे व समारंभाच्यावेळी त्यांना आदराचे स्थान देऊन त्यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचारानुसार करण्यात यावी. (iii) ज्या जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम असेल, त्या जिल्ह्यातील सर्व केंद्रीय मंत्री (मंत्री / राज्यमंत्री / उपमंत्री) राज्यातील त्या जिल्ह्यातील सर्व मंत्री (मंत्री/राज्यमंत्री / उपमंत्री) यांनाही योग्य ती पूर्वसूचना देऊन आमंत्रित करण्यात यावे. त्यांना विश्वासात घेऊन ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे याची खातरजमा करून समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेवर त्यांचे नांव योग्य प्रकारे छापण्यात यावे. (iv) तसेच त्यांना समारंभाच्या वेळी आदराचे स्थान देण्यात यावे व समारंभाच्या वेळी त्यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचारानुसार करण्यात यावी.
विधानसभा-विधानपरीषद प्रश्ना संदर्भात प्राथमिक माहिती विहित मुदतीत पाठवीणेबाबत. संसदीय कार्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- एलइजी-1093-1514- पांच, दिनांक:- 16-09-1993
विधानमंडळाशी संबंधित असलेले कामकाज हाताळण्याबाबत.महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक:- एलबीडी 1899-(262-91) अ-1, दिनांक:- 22-01-1992
खासदार,आमदार यांना शासकीय कार्यालयात सौजन्यपूर्व वागणूक देण्यासंबधी. CR क्रमांक:- सीडीआर-1091-प्र.क्र.6-91-अकरा, दिनांक:- 31-12-1991