महावितरण कंपनी मार्फत पुरविण्यात येणा-या सेवाकरिता ग्रामपंचायतीनी फ्रान्चयझी म्हणून काम करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमाका व्हीपीएम-२०१६/प्र.क्र.८/५.श-३ दिनांक २०-१०-२०१६
राज्यातील ३००० लोकसंख्यापर्यंतच्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायतस्तरावर ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीमार्फत पुरविण्यात येणा-या काही सेवा ग्रामपंचायतींनी “फ्रान्चायझी” म्हणून काम करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
१) ग्रामपंचायत ही फ्रान्चायझी म्हणून काम करताना त्याचे कार्यक्षेत्र हे ग्रामपंचायती अंतर्गत महसूली गावाचे संपूर्ण क्षेत्र राहील ज्यामध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक व कृषि ग्राहकांचा समावेश असेल.
२) महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणा-या कामांपैकी पुढील कामे ग्रामपंचायतीने “फ्रान्चायझी” म्हणून करावयाची आहेत:-मीटर रिडींग घेणे
वीज देयके वाटप करणे
ब्रेकडाऊन अटेंड करुन सप्लाय पुर्ववत करणे
डी.ओ फ्युज टाकणे
फ्युज कॉल कम्प्लेंट्स अटेंड करणे
रस्त्यावरील दिवाबत्ती देखभाल व बंद पडलेले दिवे बदलणे
नवीन जोडणीची कामे करणे
थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडीत करणे
३) वर नमूद कामांकरीता ग्रामपंचायतीमार्फत उपयुक्त व क्षमता धारण करणा-या व्यक्तीची एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात येऊन त्यांच्यामार्फत सदरची कामे करुन घेण्यात येतील.
४) नेमणूक केलेल्या व्यक्तीला “ग्राम विद्युत व्यवस्थापक” या नावाने संबोधण्यात येईल.
५) ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करण्याकरीता शैक्षणिक अर्हताः-
किमान आय.टी.आय (इलेक्ट्रीकल तिलाअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
-
2.3K
-
1.1K
-
767