मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आवश्यक वयोमर्यादा:
या योजनेअंतर्गत अर्जदार महिलेचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यामुळे 21 वर्षाखालील आणि 65 वर्षावरील महिलांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही
योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रतिमहिना 1500/- रुपये जमा केले जातील.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबविण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहचविण्याकरीता जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 12-09-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण योजना व महिलांच्या संबंधित राबविण्यात येत असलेल्या इतर योजना महिलांपर्यंत पोहचविण्याकरीता जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 10-09-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 06-09-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या जाहिरात प्रसिध्दी करण्याकरीता माध्यम आराखडा राबविण्यास मान्यता देण्याबाबत..शासन निर्णय दिनांक 06-09-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत. शासन निर्णय दिनांक 02-09-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत. शासन निर्णय दिनांक 26-08-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत. शासन निर्णय दिनांक 20-08-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत. . शासन निर्णय दिनांक 18-08-2024
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिध्दी करण्याकरिता माध्यम आराखडा राबविण्यास मान्यता देण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 15-08-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत. शासन निर्णय दिनांक 25-07-2024
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिध्दी करण्याकरिता Media Plan राबविण्यास मान्यता देण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 24-07-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत.शासन निर्णय दिनांक 19-07-2024
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना-अंमलबजावणी करण्याबाबत… शासन निर्णय दिनांक 18-07-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 15-07-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत शासन निर्णय दिनांक 12-07-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 11-07-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण व गरजू महिलांसाठी ई- पिंक रिक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनस्तरावर मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 08-07-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 05-07-2024
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत शासन निर्णय दिनांक 03-07-2024
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय दिनांक 28-06-2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अटी व शर्ती अटी व शर्ती
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- जर अर्जदार महिलेचा जन्म महाराष्टाच्या बाहेर झाला असेल परंतु तिने महाराष्ट्र राज्यातील मुलासोबत लग्न केले असेल तर अशा परिस्थितीत तिला आपल्या पतीचे कागदपत्र जोडणे आवश्यक राहील.
- अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
- फक्त 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला/मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
- अर्जदार महिलेचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. त्यामुळे जर अर्जदार महिलेचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल आणि 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीत तिचा अर्ज रद्द केला जाईल आणि तिला यो योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार महिलेचे स्वतःच्या नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिला/मुलगी च्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.
- अर्ज करताना खोटी माहिती भरू नये.
सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत
- योजनेच्या लाभासाठी अर्ज.
- ओळखपत्र: अर्जदार मुलगी / महिलेचे आधार कार्ड
- उत्पन्नाचा दाखला: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य) किंवा रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
- बँक खात्याची माहिती: बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- फोटो: पासपोर्ट आकाराचा फोटो (ऑफलाईन अर्ज करताना)
- हमीपत्र: सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
- रहिवास प्रमाणपत्र: 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड/वीज बिल, जन्म दाखला, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (यापैकी एक)
- उत्पन्न दाखला: पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ची झेरॉक्स