306
महाराष्ट्र विकास सेवा गट अ साठी २१ व महाराष्ट्र विकास सेवा गट ब साठी ९ अशी एकूण ३० अधिसंख्य पदे निर्माण करणे ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक 10-05-2016
महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ संवर्गातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी उमेदवारांकरीता २१ अधिसंख्य पदे रु.१५६००-३९१००, ग्रेड वेतन रु.५४००/- या वेतनश्रेणीत आणि महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब संवर्गातील सहायक गट विकास अधिकारी उमेदवारांकरीता ९ अधिसंख्य पदे रु.९३००-३४८००, ग्रेड वेतन रु.४४००/- या वेतनश्रेणीत अशी एकूण ३० अधिसंख्य पदे दिनांक २.५.२०१६ पासून दोन वर्षाच्या कालावधीकरीता निर्माण करण्याकरीता शासन मंजूरी देत आहे.
२. सदर ३० अधिसंख्य पदे ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात येत आहेत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
महाराष्ट्र विकास सेवा गट अ साठी ७२ व महाराष्ट्र विकास सेवा गट ब साठी 100 अशी एकूण १७२ अधिसंख्य पदे निर्माण करणे ग्रामविकास विभाग, शासन निर्णय दिनांक 30-04-2014
शासन निर्णय:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नेमणूका करण्याकरीता महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ या संवर्गाची ७२ आणि महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब या संवर्गाची १०० अधिसंख्य पदे दिनांक १.५.२०१४ पासून दोन वर्षाच्या कालावधीकरीता निर्माण करण्याकरीता शासन मंजूरी देत आहे. संबंधित परिविक्षाधिन अधिका-यांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून स्वतंत्ररित्या काढण्यात येतील.
२. महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ व गट-ब मध्ये निवड झालेल्या अनुक्रमे ७२ व १०० उमेदवारांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी विविध स्तरावरील प्रशिक्षण देण्याकरीता प्रशिक्षणार्थी म्हणून दि. १ मे, २०१४ पासून सामान्य प्रशासन विभागाकडून नियुक्ती देण्याचे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने दि.२.४.२०१४ रोजी मा. प्रधान सचिव (सेवा) यांच्याकडे झालेल्या बैठकीमध्ये गट-अ मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दरमहा रु.३०,०००/- आणि गट-ब मधील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दरमहा रु.२०,०००/- एवढी ठोक रक्कम वेतन म्हणून प्रदान देण्याचे संदर्भीय पत्रान्वये निर्देशित केले आहे. त्यानुसार गट-अ व गट-ब मध्ये नियुक्ती द्यावयाच्या अनुक्रमे ७२ व १०० उमेदवारांना दोन वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत ठोक रक्कम अदा करण्यासाठी एकूण खर्च अनुक्रमे रु.५,१८,४०,००० व रु.४,८०,००,००० एवढा येईल. याप्रमाणे ठोक वेतनाचा खर्च सन २०१४-१५ व सन २०१५-१६ मध्ये यशदा. पुणे व वनामती, नागपूर या संस्थांना विभागाकडून त्यांच्या संबंधित लेखाशीर्षावर उपलब्ध करुन देण्यात येईल. महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ आणि गट-ब च्या १७२ अधिसंख्य पदांच्या ठोक वेतनाचा सन २०१४-१५ व २०१५-१६ मध्ये एकूण खर्च रु.९९८.४० लक्ष एवढा असून सदर खर्च हा सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या वर्षीच्या अतिरिक्त अनुदानातून मंजूर करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात येत आहे.
३. महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ व गट-ब च्या वरील १७२ परिविक्षाधीन पदांवरील दि.१.५.२०१४ ते ३०.४.२०१६ या कालावधीचा खर्च सन २०१४-२०१५ व सन २०१५-२०१६ या वर्षीच्या मंजूर
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
You Might Be Interested In