महाराष्ट्र विकास सेवा मधील सहा गट ब या संवर्गचे संख्याबळ (Cadre Strength) निश्चित करण्याबाबत ग्रामविकास विभाग दि २६-०२-२०२४
आ) उपरोक्त तक्त्यातील स्तंभ क्रमांक ६ मधील प्रतिनियुक्तीच्या पदावर नियुक्ती ही बदली अधिनियमानुसार बदलीने करण्यात येईल.
इ) उपरोक्त तक्त्यातील स्तंभ क्रमांक ७ मधील संख्याबळाचा वेळोवेळी आढावा घेऊन स्तंभक्रमांक ४, ५ व ६ मधील पदसंख्येमध्ये जसे जसे बदल होतील, त्याप्रमाणे त्याबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.
०३. महाराष्ट्र विकास सेवा, गट-ब संवर्गातीलच अधिकारी प्रतिनियुक्तीने नियुक्त होत असणाऱ्या पदांचा तपशील "परिशिष्ट-अ" मध्ये दिला आहे.

महाराष्ट्र विकास सेवा गट अ पद सुधारित आकृतिबंध ग्रामविकास विभाग दि. 10-01-2024
महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ मध्ये (१) गट विकास अधिकारी (२) उप मुख्य कार्यकारी अधिकारी (३) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक आणि (४) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) अशा एकूण ४ संवर्गाचा सुधारित आकृतिबंध
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
म.वि.सेवा गट ब अंतर्गत सहाय्यक ग.वि.अ पदाचा सुधारित आकृतीबंध दि.10.08.2022
ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र विकास सेवेंतर्गत सहायक गटविकास अधिकारी, गट-ब (राजपत्रित) च्या आस्थापनेवर ४४३ पदांच्या (७ व्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार एस-१५,रु.४१८००-१३२३००) सुधारित आकृतीबंधास सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ प्रमाणे याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम, 2015 सुधारणा दि.15.07.2017
महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील पदाचा संवर्गनिहाय सुधारीत आकृतीबंध ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०४-०७-२०१६ साठी येथे Click करा
महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्ग आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त (आस्था./ विकास) / प्रकल्प संचालक संवर्ग या दोन संवर्गामधील मंजूर पदसंख्येव्यतिरिक्त अन्य विभागामार्फत निर्माण करण्यात आलेली मात्र महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधून भरण्यात येणारी पदे विचारात घेऊन, महाराष्ट्र विकास सेवा (गट-अ) मधील, (१) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्ग; (२) उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (निवडश्रेणी) संवर्ग; (३) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त (आस्था./विकास) / प्रकल्प संचालक संवर्ग; आणि (४) अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) संवर्ग अशा एकूण ४ संवर्गांचा सुधारीत आकृतिबंध सदर संवर्गापुढील खालील कोष्टकामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे, यापुढे महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील रिक्त असणारी पदे सदर सुधारीत आकृतिबंधानुसार भरण्यात येतील.
महाराष्ट्र शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूली विभाग वाटप नियम, 2015 दि.28.04.2015
महाराष्ट्र विकास सेवा गट अ व गट ब मध्ये तात्पपुत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आलेल्या अधिका-यांना वेतनवाढ मंजूर करतांना देण्यात आलेल्या स्थानिक पदोन्नतीमधील तांत्रिक खंड क्षमापित करण्याबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०१-०८-२००७
महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब मधील पदे सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार सरळसेवा व पदोन्नतीने भरली जातात. गट-ब मधील पदावर जिल्हा परिषद सेवा / जिल्हा तांत्रिक सेवा (वर्ग-३) मधील पात्र कर्मचा-यांची निवड करण्यासाठी विभागीय आयुक्त स्तरावर विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेऊन, निवडसूची तयार करण्यात येते. या निवडसूचीस सामान्य प्रशासन विभाग व शासन मान्यता घेऊन तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती दिल्या जातात. तर गट-अ मधील पदांवर पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यासाठी गट-ब मधील पात्र कर्मचा-यांची निवड करण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेऊन, त्या आधारे निवडसूची तयार करण्यांत येते आणि निवड सूचीस सामान्य प्रशासन विभाग व शासन मान्यता घेतल्यानंतर पदोन्नत्या दिल्या जातात. एकूणच गट-अ व गट-ब मधील पदांवर पदोन्नतीच्या कोट्यातील पदे भरताना विहित केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन पदोन्नती दिली जाते. अशा प्रकारे गट-अ व गट-ब या दोन्ही राजपत्रित पदावर पदोन्नतीने नियुक्त्या करण्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या निवड सूच्या अंतिम होण्यास प्रशासकीय अडचणीमुळे विलंब लागतो. त्यामुळे पात्र अधिका-यांना प्रथम स्थानिकरित्या अकरा महिन्यांसाठी पदोन्नती देण्यात येते आणि तद्नंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा या पदोन्नत्या स्थानिकरित्या पुढे चालू ठेवण्यात येतात. अशा प्रकारे स्थानिक पदोन्नती देण्यात आलेल्या अधिका-यांच्या / कर्मचा-यांच्या पदोन्नती मधील खंड क्षमापित करण्याची बाब विचाराधीन होती. त्यासंदर्भात आता पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येत आहे.
२. स्थानिक पदोन्नती देण्यात आलेल्या अधिका-यांच्या पदोन्नतीमधील खंड खालील अटींच्या अधीन राहून क्षमापित करण्यात यावेतः-
(अ) पदोन्नतीच्या पदास खालच्या पदावरील ठराविक कालावधीची सेवा ही अट अनिवार्य असेल तर त्या अटींच्या पूर्ततेच्या प्रयोजनार्थ असे खंड क्षमापित करण्यात यावेत.
(ब) वार्षिक वेतनवाढीसाठी १२ महिन्याचा कालावधी गणण्याच्या प्रयोजनार्थ हे खंड विचारात घेऊ नयेत.
(क) हे खंड क्षमापित केल्यामुळे त्यांचा लाभ ज्येष्ठतेसाठी मात्र विचारात घेतला जाणार नाही अशी अट घालण्यात यावी.