496
राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश ‘मोदी आवास’ घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
०२. शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र. वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५ दि.२८.०७.२०२३ मधील नमुद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील.
०३. सदर योजनेतंर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेंचा लाभघेतलेला नसावा.
०४. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरुन सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
. संकेताक २०२४०२०११२१२१६६४३४
You Might Be Interested In
-
1.1K
-
660