ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हि दोन्ही पदे एकत्रित करून सदर पदाचे नामाभिदान ग्रामपंचायत अधिकारी करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २४-०९-२०२४
शासन निर्णय:-
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील ग्रामसेवक (एस-८) व ग्रामविकास अधिकारी (एस-१२) ही दोन्ही पदे एकत्रित करून एस-८ (२५५००-८११००) या वेतनश्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नामाभिदान “ग्रामपंचायत अधिकारी” असे करण्यात येत आहे. २. सध्या अस्तित्वात असलेल्या ग्राम विकास अधिकारी या पदांचे वेतन संरक्षित करुन व ही पदे मृत संवर्गामध्ये वर्गीकृत करुन तद्नंतर रिक्त होणाऱ्या या पदांवर ग्रामपंचायत अधिकारी हे नामाभिदान असणाऱ्या एस-८ वेतन श्रेणीतील एकाच पदावर नवीन नियुक्त्या करण्यात याव्यात. ३. ग्रामपंचायत अधिकारी या पदास सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १० वर्षाच्या सेवेनंतर पहिला लाभ विस्तार अधिकारी एस-१४ (३८६००-१२२८००), २० वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभसहायक गट विकास अधिकारी एस-१५ (४१८००-१३२३००) व ३० वर्षाच्या सेवेनंतर तिसरा लाभ गट विकास अधिकारी एस-२० (५६१००-१७७५००) असा अनुज्ञेय राहील.४. ग्रामपंचायत अधिकारी या पदांच्या पदोन्नती साखळी सुधारित होत असल्याने सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून त्या सुधारित पदोन्नती साखळी नुसार आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय होतील. सदर शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी सदर पदांवरील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेंतर्गत लाभ अनुज्ञेय झालेला आहे, परंतु प्रत्यक्षात अदा करण्यात आलेला नाही अशा कर्मचाऱ्यांना सदर शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पूर्वीच्या अनुज्ञेय पदोन्नती साखळी प्रमाणे लाभअनुज्ञेय करण्यात यावेत व तद्नंतरचे लाभ सदर शासन निर्णयाप्रमाणे सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन निश्चिती करुन अदा करण्यात यावेत.
५. सदर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची सध्या असलेली सेवाज्येष्ठता विचारात घेऊन त्यानुसार एकत्रित पदासाठी सेवाज्येष्ठता यादी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर तयार करावी. यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सेवाज्येष्ठतेमध्ये बदल होणार नाही याची दक्षता घ्यावी. ६. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण केल्याने आवश्यकतेनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मध्ये यथावकाश सुधारणा करण्यात येईल.संके ताक <202409241448530520 >
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….