पोलीस कोठडीतील/कारागृह कोठडीतील अनैसर्गिक मृत व्यक्तीचे शवविच्छेदनासाठी आदर्श शवविच्छेदन अहवालाचा फॉर्म तसेच, शवविच्छेदन करताना घेण्यात येणा-या व्हिडीओ फिल्म काढण्यासंदर्भातील मार्गदर्शक सुचना.
गृह विभाग शासन परिपत्रक क्रमांक- एसएचआरसी-२०१८/प्र.क्र. ९१/पोल-१४ मुख्य इमारत, दुसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक- ०२ ऑगस्ट, २०१८
पोलीस कोठडी/कारागृह/पोलीसांच्या ताब्यात असतांना मृत्यू पावणा-या व्यक्तींचे शवविच्छेदन सोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (त्यांचे कार्यक्षेत्रानुसार) करण्यात यावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संलग्नित शैक्षणिक रुग्णालये कि जेथे न्यायवैद्यकशास्त्र विभाग कार्यरत आहे, तेथे कोठडीत/ताब्यात असताना मृत्यु पावणा-या व्यक्तीचे शवविच्छेदन व व्हिडीओ चित्रिकरण करणे व ते सीलबंद करुन ते त्वरीत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला पाठविणे ही जबाबदारी त्या-त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक पॅथॉलोजिस्ट (Forensic Pathologist) यांची राहिल. शवविच्छेदन हे न्यायवैद्यक पॅथॉलोजीस्ट यांनी दोन किंवा अधिक डॉक्टरांच्या पॅनेलसह करावे. व्हिडीओ ग्राफर हा फॉरेन्सीक पॅथॉलोजीस्टला इन्क्वेस्ट करणा-या प्राधिका-याने उपलब्ध करुन द्यावा व तो व्हिडीओग्राफर त्यांनी जिल्हादंडाधिका-याच्या अधिकृत पॅनेलमधुन घ्यावा. व्हिडीओ चित्रीकरणावर येणारा खर्च हा प्रथम संबंधीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी करावा व तो नंतर संबंधित पोलीस आयुक्त / पोलीस अधिक्षक/कारागृह विभाग यांचेकडुन वसूल करावा.
संकेताक २०१८०८०३११२४३०१०२९अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शवविच्छेदनाबाबत मार्गदर्शन दिनांक ०६-१०-२००५
अधिपत्याखाली रुग्णालयात सकाळी नंतरही म्हणजच शवविच्छेदनाची सुविधा उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी पुरसा प्रकाश हवा म्हणून शवविच्छेदन गृहाच्या भिंती व फरशी सफेद (पाढग) रंगाच्या असाव्यात, लगेच उपकरणे पाणी व विद्युत पुरवठा या बाबी नियमित उपलब्ध राहातील याधावत दक्षता घेण्यात यावी. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याच्या प्रशिक्षणायावत नियमित आढावा घेण्यात यावा.
ज्या संस्थेमध्ये शवविच्छेदनासाठी आणले जाईल त्याच ठिकाणच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करावे. त्यासाठी इतर संस्थांच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना बोलावू नये.
तसेच २४ तास शवविच्छेदन केल्या जातील याची दक्षता घ्यावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….