माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ व त्याअंतर्गत नियमांनुसार माहिती पुरविताना आकारावयाचे शुल्क अर्जदारास कधी व कशा प्रकारे कळवावे, याबाबत शासनाने यापूर्वी संदर्भ क्र.१ येथिल दि. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. तथापि, राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या संदर्भक्र.२ येथील पत्रान्वये सदर परिपत्रकातील तरतुदी अधिनियमाशी सुसंगत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असून अधिनियमातील तरतुदींप्रमाणे सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याची विनंती शासनास केलेली आहे.
२. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम ७ (१) अन्वये जनमाहिती अधिकारी यांनी माहितीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या शिघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासुन ३० दिवसाच्या आत अर्जदारास माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच कलम ७ (३) (क) अन्वये अतिरीक्त फीबाबतची सुचना पाठविल्या नंतर उक्त सुचना पाठविल्याचा व फीचे प्रदान केल्याच्या दरम्यानचा कालावधी हा ३० दिवसाच्या कालावधीची परिगणना करण्याच्या प्रयोजनार्थ वगळण्याची तरतुद आहे. सदर तरतुदीनुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर ठराविक कालावधीत माहिती शुल्क कळविण्याची कोणतीही सक्ती नसून अधिनियमातील विहित कालमर्यादेत माहिती पुरविणे ही जन माहिती अधिकारी यांची मुख्य जबाबदारी आहे.
३.
उपरोक्त तरतुदीस अनुसरून शासन असे निर्देश देत आहे की, माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जामध्ये, माहिती पुरविण्यासाठी शुल्क आकारावयाचे असल्यास, जन माहिती अधिकारी यांनी अधिनियमातील तरतुदींनुसार व प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन माहितीची पृष्ठसंख्या व टपालखर्चासह माहितीच्या शुल्काची रक्कम टपालाने किंवा ई-मेलद्वारे शक्य तितक्या लवकर अर्जदारास कळवावी. तसेच माहिती उपलब्ध करून देण्याची संपूर्ण कार्यवाही अधिनियमातील विहित कालमर्यादेत पूर्ण होईल, याची दक्षता जन माहिती अधिकारी यांनी घ्यावी.
माहिती अधिकार अधिनियम,२००५ नागरिकांना अवलोकनार्थ अभिलेख उपलब्ध करून देणेबाबत, साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१8/प्र क्र 45/कार्या -६ दि २६/११/२०१८
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत स्वताःशीच संबंधीत माहिती अर्ज वा अपील अर्ज निकाली न काढण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१६/प्र.क्र. (१५५/१६) सहा. मंत्रालय, मुंबई – ४००० ३२. दिनांक- ७.९.२०१६.
कार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणी,राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य पुणे परीपत्रक क्र संकीर्ण/२००९/ प्रक्र ५१/०९/ आस्था दि ०५/०८/२००९
माहिती अधिकारा संदर्भात अर्जदाराशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यव्यवहारावर कार्यालयाचा दूरध्वनी क्र. फॅक्स क्र व ई- मेल आयडी ई नमूद करण्याबाबत,सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/८७०/ प्र क्र ३००/०८ /सहा दि १३/०५/२००९
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ शासकीय पुस्तक मिळविण्या साठी येथे क्लिक करा
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Leave a Reply