सेवा पुस्तक हा जतनीय दस्तऐवज असून मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम ५२ खालील परिशिष्ट १७ नुसार सेवापुस्तक हे प्र्दीघ कालावधी पर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक आहे. अधिनस्थ अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक सुस्थितीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 (सेवेच्या सर्व साधारण अटी) मधील नियम ३५ ते नियम ४९ मधील तरतुदिनुसार
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 (सेवेच्या सर्व साधारण अटी) मधील नियम36 परिशिष्ट -4 नुसार Service Book नमुना विहित करण्यात आला आहे.
नियम ३५ : सेवा अभिलेख
नियम ३६ सेवा अभिलेख सुस्थितीत ठेवणे
नियम ३७ सेवा पट सुस्थितीत ठेवणे
नियम ३८: सेवा पुस्तका मध्ये सर्व घटनाची व जन्म तारखेची नोंद करण्याची कार्यपद्धती [जन्म तारखेत बदल]
नियम ३९: पदावनती,सेवेतून काढून टाकणे इ ची करणे सेवा पुस्तकामध्ये नमूद करणे.
नियम ४०: वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात न घेणे
नियम ४१: कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्याना सेवा पुस्तक दाखविणे.
नियम ४२: बदलीनंतर सेवा पुस्तक पूर्ण करून ते नवीन कार्यालयात पाठविणे.
नियम ४३: अराजपत्रीत शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकात लेखापरीक्षा अधिकाऱ्याने स्वियेत्तर सेवेतील घटना नमूद करणे
नियम ४४: राजपत्रीत पदावर स्थानापन्न असणाऱ्या अराजपत्रीत शासकिय कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक, तो राजपत्रीत अधिकारी म्हणून जेथे काम करीत असेत त्या कार्यालयाच्या प्रमुखांने सुस्थितीत ठेवणे.
नियम ४५: सेवा पुस्तकाची व सेवा पटाची वार्षिक पडताळणी.
नियम ४६: पोलीस शिपायांचे सेवा पट सुस्थितीत ठेवणे.
नियम ४७: सेवा पुस्तक व सेवा पट यांची तपासणी
नियम ४८: सेवा समाप्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला सेवा पुस्तक परत न करणे.
नियम ४९ : विमा कंपन्या सेवाविषयक अभिलेखातून उतारा देणे.
सेवा पुस्तकाचे भाग
•पहिले पान
•नियुक्ती तपशील
•रजेचा हिशोब
•अहर्ताकारी सेवेची प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशील
•सेवा पडताळणी
सेवा पुस्तक पहिले पान
•जन्म तारखेची नोंद :.[महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 (सेवेच्या सर्व साधारण अटी) मधील नियम 38 2 (ए )]
•जन्मतारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखांने स्वाक्षरी असावी.
•धर्म व जात लिहताना मूळ जात बाबतची नोंद करावी. ( शक्य तो ज्या प्रवर्गा मधून निवड झाली त्याबाबतची नोंद (कंसात घ्यावी )
• सेवेत प्रवेश करताना असलेल्या शैक्षणिक अर्हतेची नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक ,
•शैक्षणिक अर्हतामध्ये वाढ झाल्यास त्याप्रमाणपत्राच्या उल्लेखासह ती नोंद साक्षाकीत करावी .
टीप: शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तिकेत नोद्विलेल्या जन्म दिनांकामध्ये दुरुस्ती करावयची असल्यास शासन सेवेत प्रवेश केल्यापासून 5 वर्षाच्या आत अर्ज केला असल्यास तपासणी सूचीतील पुरावे मागवून तपासून संबधिताचे जन्म दिनांकात दुरुस्ती करता येईल.
[साप्रवि शा परिपत्रक क्र जन्म दि-१०९२/ प्र क्र ४९/९२/तेरा– अ दि २४/६/१९९२]
प्रथम नियुक्तीच्या नोंदी
•प्रथम नियुक्ती आदेशाची नोंद
•प्रथम रुजू दिनांक नोंद
•प्रथम नियुक्ती स्थायी / आस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग नोंद
•ज्या पदावर नियुक्ती ते पदनाम व वेतन श्रेणी नोद
•अपंगांसाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपंग बाबतची विहित वैधता प्रमाणपत्र ची नोंद
•स्वग्राम घोषणा पत्राची नोंद
•निष्ठेचे शपथ पत्र कर्मचाऱ्यांकडून घेऊन ते साक्षांकित करून सेवा पुस्तकात चिकटवावे
[शासन परिपत्रक सा प्र वि दिनांक 11 सप्टेंबर 2014 व दिनांक 06-10-2015]
•संगणकअर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची किंवा सूट नोंद
•चारित्र्य पडताळणी नोंद
•जात पडताळणी बाबतची नोंद
प्रथम नियुक्तीच्या नंतर आवश्यक नोंदी
•छोटे कुटुंब प्रमाणपत्र
•अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम नोंद
•मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण सूट नोंद
•MSCIT/ टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
•परीविक्षा कालावधी समाप्त करून नियुक्ती नियमित केल्याची आदेशाची नोंद केल्याच्या
•भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद किंवा डीसीपीएस /एनपीएस खाते क्रमांक नोंद
•गट विमा योजना सदस्य नोंद
•स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद
•विभागीय परीक्षा उत्तीर्ण बाबत नोंद अथवा सूट बाबतची नोंद
सेवेतील नियमित घटनाक्रम
•वार्षिक वेतन वाढ नोंद व वार्षिक वेतन वाढ मंजुरीनंतर रकाना क्रमांक आठ मध्ये कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक
•बदली नंतर बदली आदेश/ कार्यमुक्तीचा आदेश /नवीन पदावर रुजू झाल्याचा दिनांक इत्यादी तपशील नोंद [जेथे पदग्रहण अवधी अनुज्ञय असेल तेथे पदग्रहण अवधीची नोंद ]
•पदोन्नती /पदावन्नतीची आदेशाची नोंद .[महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 (सेवेच्या सर्व साधारण अटी) मधील नियम 39]
•पदोन्नती /पदावन्नतीच्या पदावर रुजू दिनांकाची नोंद
•पदोन्नती /पदावन्नतीच्या पदाच्या वर्गाची वेतनश्रेणीची व वेतन निश्चितीच्या आदेशाची नोंद
•वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद
•पदोन्नती /वेतन आयोग/ कालबद्ध पदोन्नतीमुळे एकस्तर पदस्थापनेमुळे वेतननिश्चिती केल्याची नोंद
•वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत बदल झाला असेल पडताळणी पथकाकडून करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद
•वेतनश्रेणी दक्षतारोध येत असेल तो दक्षता रोध पार करण्यास मंजुरी दिलेल्या आदेशाची नोंद
•तदर्थ/ तात्पुरती पदावरील नियुक्ती स्वरूपाची असल्यास त्या आदेशाची नोंद व तो नियुक्ती नियमित केली असल्यास त्याची नोंद
•सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद/ पायाभूत प्रशिक्षण / अनिवार्य प्रशिक्षण / विदेश प्रशिक्षणासाठी नोंद
•जीपीएफ खात्यामध्ये वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने / जमा तपशील प्रमाणात क्रमांक व दिनांक
•वार्षिक सेवा पडताळणी नोंद .[महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 (सेवेच्या सर्व साधारण अटी) मधील नियम 45]
•पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे
•स्वग्राम /महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद
•गट विमा योजना वर्गणीतील वर्गणीत बदल झाल्यास त्याची दिनांक न्याय व थकीत रकमेसह वसुलीची नोंद
•सेवेतून कमी केले असल्यास त्या आदेशाची नोंद
•पुनर्नियुक्ती केलेली असल्यास त्याची नोंद
•दोन नियुक्तींमध्ये, खंड असल्यास खंडाची नोंद
•दोन नियुक्तींमध्ये मधील खंड क्षमापित केला असल्यास त्याची नोंद
•सेवा कालावधीत निलंबन, निलंबन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद
•सेवेतील झालेली शिक्षा
•संपात सहभाग घेणे
•राजीनामा देणे /परत घेणे
•अनाधिकृत गैरहजेरी
•गौरव/ पुरस्कार प्राप्त असल्यास /अनुज्ञेय लाभाच्या नोंदी
•आगाऊ वेतन वाढी मंजूर केलेल्या आदेशाची नोंद व वेतन निश्चिती किंवा ठोक रकमा मंजूर केल्याची नोंद
•सक्तीचा प्रतीक्षाधीन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद
•वेतन समानीकरणाची नोंद
•मानीव दिनांक देण्यात आला असल्यास त्याची नोंद
•नावात बदल झाला असल्यास समप्रमाण नोंद
•आगाऊ जमा करावयाच्या रजा नोंदी कर्मचाऱ्याने वेळोवेळी उपभोगलेल्या व मंजूर केलेल्या रजा नोंदी /रजा मंजूर आदेश रजा लेखा नोंदी सह [रजा व तत्सम नोंदी शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 9 नोव्हेंबर 1990 नुसार ]
•सुट्टीच्या कालावधीतील प्रशिक्षण नोंद
नामनिर्देशन
•गट विमा योजना नामनिर्देशन
•भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन
•निवृत्त वेतन नामनिर्देशनाची नोंद
• मृत्यू आणि सेवा उपदानाची नामनिर्देशनाची नोंद
•डीसीपीएस नामनिर्देशनाची नोंद
•अपघात विमा योजना नामनिर्देशनाची नोंद
•कुटुंब प्रमाणपत्र
विविध अग्रीमे नोंद
•गृहनिर्माणासाठी कर्ज मंजूर झालेल्या वितरित केलेल्या घरबांधणी कर्जाच्या प्रत्येक हप्त्याची नोंद किंवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे
[ शासन परिपत्रक सहकार पण वस्त्रे उद्योग विभाग 25 ऑगस्ट 2011 ]
•घर बांधणी अग्रिम व व्याज वसूल झाल्या नंतर प्राप्त नोटीस प्रमाणपत्राची नोट
•घर बांधणी अग्रीम वरील Accured Interest चा फायदा घेतला असल्यास त्याची नोंद [शासन निर्णय वित्त विभाग 3 जुलै 2002 ]
सेवा पुस्तका सोबत आवश्यक महत्त्वाचे दस्तऐवज
•शैक्षणिक दस्तऐवज
•वैद्यकीय प्रमाणपत्र
•जात प्रमाणपत्र /जात वैधता प्रमाणपत्र
•चारित्र्य प्रमाणपत्र
•एम एस सी आय टी/टंकलेखन परीक्षा प्रमाणपत्र
•नामनिर्देशन (जीआयएस /जीपीएफ/ पेन्शन एनपीएस /डीसीपीएस /कुटुंब प्रमाणपत्र /अपघात विमा )
•परिवीक्षाधिन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश
•मराठी, हिंदी परीक्षा पास अथवा सूट आदेश
•स्वग्राम घोषित आदेश
•स्थायित्व प्रमाणपत्र आदेश
•विभागीय परीक्षा उत्तीर्ण अथवा सूट आदेश
•जादा रक्कम अदाएगी वसुलीचे हमीपत्र
•वेतन निश्चिती विवरणपत्र (वेतन आयोग /कालबद्ध पदोन्नती /पदोन्नती /एक स्तर पदोन्नती इतर )
•विकल्प
•वेतन आयोग फरकाच्या हप्ता विवरणपत्र तसेच प्रदान रकमेचा प्रमाणक क्रमांक दिनांक
•नाव बदललेले असल्यास त्याबाबतचे राजपत्र
•वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे – अहर्ताकारीक सेवा आदेश
•GIS बद्दल आदेश
•सेवार्थ आयडी ,आधार नंबर,डीडीओ कोड PAN NO. , GIS NO,GSLI NO,GPF NO.DCPS/NPS NO.