जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत ३१-१२-२०२३ पर्यंत शिथीलता देणेबाबत ग्रामविकास विभाग दिनांक १६-०३-२०२३
१) या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात येत आहे.
२) माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले/भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता असे उमेदवार दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र असतील.
३) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून १० टक्के पदे जिल्हा परिषद सेवेत भरती करताना माहे मार्च, २०१९ च्या जाहिरातीनुसार जे ग्रा.पं. कर्मचारी पात्र होते (म्हणजेच, १ जानेवारी, २०१९ रोजी ज्या उमेदवारांचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नव्हते) व आता त्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली असल्याने ते अपात्र होत आहेत, असे सर्व उमेदवार या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत होणाऱ्या भरती प्रक्रियेस पात्र असतील.
४) सदर शासन निर्णयाच्या दिनांकापुर्वी जाहिराती प्रसिद्ध / भरती प्रक्रिया सुरु झालेल्या असतील परंतु, अद्याप निवडप्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्त्या दिल्या नसतील, अशा सर्व जाहिराती/भरती प्रक्रीयेसाठी देखील उपरोक्त परिच्छेद क्र.१, २ व ३ नुसार कमाल वयोमर्यादेत शिथिलता लागू राहील.
जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत ३१-१२-२०२३ पर्यंत शिथीलता देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग भाग दिनांक ०३-०३-२०२३
१) या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे) देण्यात येत आहे.
२) ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देय राहील.
३) सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिध्द झालेल्या आहेत तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही, अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वरील (१) व (२) नुसार कमाल वयोमर्यादेतील शिथिलता लागू राहील. त्यानुसार संबंधित
जाहिरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्यात यावी.
४) दि.३१ डिसेंबर, २०२३ नंतर प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात अथवा संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील.
शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २५-०४-२०१६
खुल्या प्रवर्गासाठी ३३ वरून ३८ वर्ष व मागासवर्गीयासाठी ३८ वरून ४३
शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणेबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १७-०८-२००४
खुल्या प्रवर्गासाठी ३३ वर्ष व मागासवर्गीयासाठी ३८
सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढविणे बाबत प्राथमिक शिक्षक, शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक २९-१०-२००४
खुल्या प्रवर्गासाठी ३३ वर्ष व मागासवर्गीयासाठी ३८
सेवा प्रवेश नियम अगोदरच शासन सेवेत असलेल्या नामनिर्देशन नियुक्ती वयोमर्यादा 1-11-२००३
शासन सेवा प्रवेश कमाल वयोमर्यादा वाढविणे बाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २८-१०-१९९२
कमाल वयोमर्यादा २८ वरून ३० वर्ष