१) लाभार्थ्याच्या निवडीचे निकष : ज्या व्यक्ती ६५ वर्ष व त्यावरील आहेत
(ज्याचे नांव संजय गांधी निराधार योजनेत नाही अशा व्यक्तींनासुध्दा) त्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये २१,०००/- च्या आत आहे. तसेच ज्यांचे नाव दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाही अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून शासनाकडून दरमहा रुपये ५००/- देण्यात येतील. यासाठी शासन निर्णय दिनांक ३० सप्टेंबर २००८ च्या परिशिष्ट ५ मधील नमुना १३ मध्ये शासनास अहवाल पाठविणे आवश्यक राहिल.२) अटी व शर्ती : या योजनेच्या लाभार्थीची निवड तसेच इतर उर्वरित अटी व शर्ती वर नमूद केलेल्या उपरोक्त क्रमांक १ येथील दिनांक ३० सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णया प्रमाणे राहिल.
३) अर्जाचा नमुना :- या योजनेकरीता करावयाच्या अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे. click for dowload
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
संगणक संकेतांक क्रमांक २००९०६२९१५२२५४००१
वीशेष सहायाच्या योजनेमध्ये तृतीय प्रकृतीस अर्थसहाय देणेबाबत. शासन निर्णय दिनांक:- 12-08-2004
दिनांक १४ जानेवारी, २००४ च्या शासन निर्णयान्वये सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या अंमलबजावणीबाबत सुधारीत व एकत्रित आदेश देण्यात आलेले आहेत. या आदेशान्वये कोणत्या व्यक्ती पात्रतेच्या अटीनुसार आर्थिक मदत मिळण्यास पात्र समजण्यात येतील याचा ऊहापोह केलेला आहे. व्यक्ती ही संज्ञा नैसर्गिक व्यक्तीसाठी वापरतांना त्यामध्ये स्त्री व पुरुष असा प्रामुख्याने भेद केला जातो. तथापी मनुष्य प्राण्यांमध्ये स्त्री/पुरुषांबरोबरच तृतीय प्रकृती (eunuch) हा घटक आपोआप मोडत असल्यामुळे दिनांक १४ जानेवारी, २००४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील राज्य शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनेमधील पात्रतेच्या अटीमधील व्यक्ती या संज्ञेमध्ये तृतीय प्रकृतीचा (eunuch) समावेश करण्यात येल असून त्यांना सदर शासन निर्णयामधील अटी. नियम व तरतुदीनुसार अर्थसहाय्य देण्यास शासन मान्यता देत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
समिती गठीत झाल्यानंतर अर्जाची छाननी करणेबाबत. शासन निर्णय क्रमांक:- 199, दिनांक:- 12-07-2004
दिनांक १४ जानेवारी, २००४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील संजय गांधी सामाजिक सहाय्य योजना समित्यांचे गठण होईपर्यंत पूर्वीच्याच म्हणजे संजय गांधी निराधार योजना समित्या चालू ठेवण्यात याव्यात. या योजनांमधील लाभार्थी निवडीसाठी शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या ग्रामसभा/प्रभाग समितीच्या मान्यतेची अट रद्द करुन पूर्वी प्रमाणेच आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर समितीने लाभार्थीची निवड करावी. अशी निवड झाल्यावर संबंधित लाभार्थ्यास अर्थसहाय्य सुरु करण्यात यावे आणि अशा लाभार्थ्यांची यादी ग्रामसभा/प्रभाग सभेला सूचनार्थ पाठवावी आणि जर ग्रामसभेच्या, असे निदर्शनास आले की, काही व्यक्तींची चुकीची निवड झाली आहे अशा व्यक्तींची निवड निरस्त करण्याचा अधिकार ग्रामसभेला राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
सामाजिक अर्थसहाय योजना. शासन निर्णय :- दिनांक:- 21-05-2004
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….