महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम २००५ अधिसूचना दिनांक २८-०३-२००५
३. लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापनाची आवश्यकता. – शासकीय सेवेतील गट अ, ब, क किंवा ड मधील पद भरतीचे विनियमन करण्याच्या बाबतीत करण्यात आलेले कोणतेही नियम किंवा आदेश किंवा विलेख किंवा त्याबाबत करण्यात आलेले इतर कोणतेही आदेश किंवा विलेख यांमध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ही, कोणत्याही शासकीय सेवेतील गट-अ, गट-ब, गट-क किंवा गट-ड मधील पदाच्या नियुक्तीसाठी एक अतिरिक्त अत्यावश्यक अट असेल :
परंतु, हे नियम अंमलात येण्याच्या दिनांकास दोनापेक्षा अधिक मुले असणाऱ्या व्यक्तीस, अशा अंमलबजावणीच्या दिनांकास असलेल्या तिच्या मुलांच्या संख्येत जोपर्यंत वाढ होत नाही तोपर्यंत या खंडाखाली, नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यात येणार नाही :
परंतु आणखी असे की, हे नियम अंमलात येण्याच्या दिनांकापासून एका वर्षाच्या कालावधीत एकाच प्रसूतीमध्ये जन्मलेले मूल किंवा एकापेक्षा अधिक मुले या खंडात नमूद केलेल्या अनर्हतेच्या प्रत्योजनासाठी विचारात घेण्यात येणार नाही,
४. प्रतिज्ञापन सादर करणे. शासकीय सेवेतील गट अ, ब, क किंवा ड मधील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्याची इच्छा असलेली कोणतीही व्यक्ती, अर्जासोबत या नियमांतील नमुना “अ” मधील प्रतिज्ञापन सादर करील,
५. नियम लागू नसणे. जेथे निवड प्रक्रिया हे नियम अमलात येण्याच्या दिनांकापूर्वीच सुरू झाली असेल त्याबाबतीत हे नियम लागू करण्यात येणार नाहीत.
६. या नियमांच्या तरतुदी शिथिल करण्याचा अधिकार. या नियमांमध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी, शासनास, न्याय्य आणि संयुक्तिक वाटेल अशा परिस्थितीत आणि अशा रितीने शिथिलतेची कारणे लेखी नोंदवून या नियमातील कोणत्याही तरतुदी शिथिल करता येतील.
महसूल सेवक (कोतवाल) पदावर नियुक्तीसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ही एक आवश्यक अर्हता म्हणून लागू करणेबाबत. 02-06-2025 202506021244511319
-
2.2K
-
2.6K