राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना देय असलेल्या रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत. दि 10-06-2015
स्वग्राम रजा प्रवास सवलत /रजा प्रवास अंतर्गत विमान प्रवास दि 06-12-2006
सध्या स्पर्धात्मक वातावरणामुळे वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या विमान सेवा किफायतशीर दरात उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासन असे आदेश देत आहे की, विमान प्रवास अनुज्ञेय नसलेल्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना या पुढे स्वग्राम रजा प्रवास सवलत/रजा प्रवास सवलती अंतर्गत, रेल्वेने जोडलेल्या ठिकाणांदरम्यानचा प्रवास सार्वजनिक/खाजगी विमान कंपन्यांच्या विमानांनी करता येईल. मात्र, यासाठी संबंधितास रेल्वेच्या (राजधानी शताब्दी एक्सप्रेस वगळून अन्य गाड्यांच्या) अनुज्ञेय वर्गाचे भाडे व विमान प्रवासाचे भाडे यापैकी कमी असलेल्या रकमेची प्रतिपुर्ती मंजूर करण्यात येईल. या विषयीचा दावा सादर करताना, विमानाचे तिकीट/बोर्डिंग पास आणि तिकीटावर प्रवासाचे भाडे नमूद केलेलं नसेल तर कर्मचाऱ्याने/अधिकाऱ्याने भरलेल्या भाडयाची रक्कम दर्शविणारी संबंधित विमान कंपनीची पावतीही सोबत जोडावी लागेल.
२. स्वग्राम रजा प्रवास सवलत / रजा प्रवास सवलती अंतर्गत रेल्वेच्या एसी फर्स्ट क्लास व एसी टु टीयर वर्गाचे भाडे कमाल प्रथम वर्गाच्या भाडयाच्या मर्यादेतच अनुज्ञेय आहे, ही बाब वरील आदेशांच्या अनुषंगाने निदर्शनास आणण्यात येत आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
जिल्हा परिषद कर्मचा-याना चार वर्षातुन एकदा रजा प्रवास सवलत (महाराष्ट्रात कोठेही जाण्यास महाराष्ट्र दर्शन दि 28-10-2005
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलती : कुटुंबाची व्याख्या सुधारणा दि 17-02-2001
राज्य लोकसंख्या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता शासनाने "छोटे कुटुंब" या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. या धोरणानुसार वरील (४) येथील आदेशाद्वारे दिनांक १ सप्टेंबर २००० पासून स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतींच्या प्रयोजनासाठी वरील (२) येथील आदेशान्वये विहित केलेली कुटुंबाची व्याख्या सुधारण्यात आली आहे.
२. वरोल्लेखित अनुक्रमांक (४) येथील दिनांक ११ ऑगस्ट २००० च्या शासन निर्णयान्वये प्रसृत केलेले आदेश रद्द करुन शासन आता या संदर्भात असे आदेश देत आहे की दिनांक १ मे २००१ पासून केवळ पती/पत्नी आणि दोन हयात अपत्यांच्या कुटुंबालाच स्वग्राम आणि रजा प्रदास सवलत हया दोन्ही सवलती अनुज्ञेय असतील. अपत्यांना हया सवलतींचा लाभ मिळण्यासाठी ते शासकीय कर्मचा-यावर अवलंबून असण्याची अट यापुढेही लागू राहील.
टीप १:- ज्या कर्मचा-यांना दि. ३० एप्रिल २००१ रोजी २ पेक्षा अधिक हयात अपत्ये असतील आणि त्या दिनांकास हयात असणा-या अपत्यांची संख्या नंतर वाढली नसेल तर त्या कर्मचा-यांच्या बाबतीत हया आदेशान्वये मुलांच्या संख्येवर घालण्यात आलेली नर्यादा लागू असणार नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्या दि 10-02-2001
राज्य लोकसंख्या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता शासनाने "छोटे कुटुंब" या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. या धोरणानुसार वरील (४) येथील आदेशाद्वारे दिनांक १ सप्टेंबर २००० पासून स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतींच्या प्रयोजनासाठी वरील (२) येथील आदेशान्वये विहित केलेली कुटुंबाची व्याख्या सुधारण्यात आली आहे.
२. वरोल्लेखित अनुक्रमांक (४) येथील दिनांक ११ ऑगस्ट २००० च्या शासन निर्णयान्यये प्रसृत سم केलेले आदेश रद्द करुन शासन आता या संदर्भात असे आदेश देत आहे की दिनांक १ मे २००१ पासून केवळ पती/पत्नी आणि दोन हयात अपत्यांच्या कुटुंबालाच स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत हया दोन्ही सवलती अनुज्ञेय असतील. अपत्यांना हया सवलतींचा लाभ मिळण्यासाठी ते शासकीय कर्मचा-यावर अवलंबून असण्याची अट यापुढेही लागू राहील.
टीप १:- ज्या कर्मचा-यांना दि. ३० एप्रिल २००१ रोजी २ पेक्षा अधिक हयात अपत्ये असतील आणि त्या दिनांकास हयात असणा-या अपत्यांची संख्या नंतर वाढली नसेल तर त्या कर्मचा-यांच्या बाबतीत हया आदेशान्वये मुलांच्या संख्येवर घालण्यात आलेली मर्यादा लागू असणार नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
स्वग्राम आणि रजाप्रवास सवलतीच्या अनूज्ञेयतेसाठी लागू असणारी कूटूंबरची व्याख्या सूधारण्याबाबत—दि 10-01-2001
स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत दि 11-08-2000
शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क्र. लोसंघो-२०००/प्र.क्र.५७/००/कु.क. १, दिनांक ९.५.२००० च्या शासन निर्णयाद्वारे राज्य लोकसंख्या धोरण जाहीर केले आहे. सदर धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता शासनाने " छोटे कुटुंब " या संकल्पनेचा स्विकार केला आहे. या धोरणानुसार स्वग्राम आणि रजा, प्रवास सवलत या प्रयोजनासाठी कुटुंब या संज्ञेची व्याख्या बदलण्याचा / सुधारण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासनाने आता यावर असा निर्णय घेतला आहे की, स्वग्राम प्रवास सवलत /रजा प्रवास सवलत या प्रयोजनासाठी कुटुंब या संज्ञेची व्याख्या यापुढे खालीलप्रमाणे असेलः-
____कुटुंब :- पती / पत्नी व २ हयात अपत्ये यांचे मर्यादित कुटुंब यांनाच या सवलतीचा फायदा मिळेल. ज्या कर्मचा-यांस दोन पेक्षा ज्यास्त अपत्ये (जिवंत) असतील त्या कर्मचा-यास वा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना ही सवलत अनुज्ञेय राहणार नाही.
शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांकः टीआरओ- ११६३/२७२६/५, दिनांक २३ ऑक्टो. १९६३ व त्यानंतर हया संदर्भात निर्गमित करण्यांत आलेल्या सर्व तरतूदी (इतर अटी व शर्ती) आवश्यक त्या फेरफारासह लागू राहतील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
चार वर्षातून एकदा महाराष्ट्ात कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत -जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू करण्याबाबत दि 31-01-1996
चार वर्षातून एकदा महाराष्ट्रात कोठेही जाण्यास रजा प्रवास सवलत दि 28-03-1995
Travel concession to govt servant during regular leave दि 13-05-1987
शासकीय कर्मचा-याना स्व्ग्रामी जाण्यासाठी प्रवास सवलत दि 16-04-1981
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 09-12-1965
शासकीय कर्मचा-यांच्या रजा प्रवास सवलतीबाबत दि 13-05-1965
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 14-11-1964
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 03-06-1964
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 19-05-1964
Travel Concession To Govt Servants During Regular Leave दि 23-10-1963