247
मौखिक आदेश, सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक २४-०२-२०१४
तारा७.२०
भारताचे संविधान
क्रमांक- वशिअ-१११३/प्र.क्र.७३/११- भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेतः-
१. या नियमांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) (सुधारणा) नियम, २०१४ असे म्हणावे.
२. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम ३ मध्ये,
(अ) पोट-नियम (१) च्या शेवटी पुढील स्पष्टीकरण समाविष्ट करण्यात यावेः
"स्पष्टीकरण - शासकीय कर्मचारी वारंवार त्याला नेमून दिलेले काम त्यासाठी विहित केलेल्या कालमर्यादेत आणि त्याच्याकडून अपेक्षित असलेल्या दर्जानुरूप पूर्ण करीत नसेल तर ती वरील पोट-नियम (१) मधील खंड (दोन) च्या अर्थांतर्गत कर्तव्यपरायणतेमधील उणीव मानली जाईल."
(ब) पोट नियम (३) च्या जागी खालील पोट-नियम समाविष्ट करण्यात यावाः
“(३) (एक) कोणताही शासकीय कर्मचारी त्याच्या कार्यालयीन वरिष्ठाच्या निदेशानुसार कृती करीत असेल ते खेरीजकरुन, त्याच्या कार्यालयीन कर्तव्याचे पालन करीत असताना किंवा त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करताना त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार सत्य व अचूक नसलेल्या गोष्टी करणार नाही,
(दोन) कार्यालयीन वरिष्ठाचे निदेश सामान्यतः लिखित स्वरुपात असतील. मौखिक निदेश देण्याचे, शक्य असेल तेथवर, टाळले जाईल. मौखिक निदेश देणे अपरिहार्य असेल तेव्हा कार्यालयीन वरिष्ठ त्यास त्यानंतर तात्काळ लिखित पुष्टी देईल,
(तीन) शासकीय कर्मचारी, त्याला त्याच्या कार्यालयीन वरिष्ठांकडून मौखिक निदेश मिळाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर त्यास लेखी पुष्टी मिळविल आणि अशा प्रकरणी निदेशाची लेखी पुष्टी देणे हे कार्यालयीन वरिष्ठाचे कर्तव्य असेल."
You Might Be Interested In