जिल्हा परिषदेतील आदर्श ग्राम सेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १०-०५-२०२३
सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३९/२३ सेवा-३दिनांक ३०-०५-२३ अन्वये व सामान्य प्रशासन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ५८/का.८ दिनांक ०२-०३-२३ अन्वये प्राप्त मान्यतेने व सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
या ऐवजी
सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक ३९/२३ सेवा-३दिनांक ३०-०१-२३ अन्वये व सामान्य प्रशासन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ५८/का.८ दिनांक ०२-०३-२३ अन्वये देण्यात आलेले अभिप्राय व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्रमांक ९६०२/२०२१, ११८४६/२०२१, २८५७/२०२१ आणि ३२००/२०२१ मध्ये दिनांक २२ सप्टेंबर, २०२२ रोजी दिलेल्या अंतिम न्याय निर्णयास अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे. असा वाचावा अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
जि प आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वेतनवाढ ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०५-२०२३
१. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आदर्श ग्राम सेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक/ग्राम विकास अधिकारी यांना, त्यांना देय असलेल्या २४ ऑगस्ट, २०१७ पर्यंतच्या आगाऊ वेतनवाढी देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
२ ऑक्टोबर या गांधी जयंती दिनी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १९-०४-२०१२
आदर्श ग्रामसेवक निवडीसाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये आता नव्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सदरची कार्यकारिणी आता पुढील प्रभागे राहील :-
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचाधत )जिल्हा परिषद
सदस्य सचिवअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सदस्य प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य ग्रामसेवक युनियन प्रतिनिधी सदस्य
आदर्श ग्रामसेवक पृस्कर वेतनवाढ 26-10-2010
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वोतोपरी सहाय्य करणा-या ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड जिल्हा परिषद स्तरावर करण्यात यावी. प्रत्येक गटातून एक सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी निवडून जिल्हा परिषदेमार्फत त्याचा सत्कार करण्यात यावा. सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्या ग्रामसेवकाला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देण्यात यावे व त्याची नोंद त्याच्या गोपनीय अहवालात घेण्यात यावी. तसेच सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ग्रामसेवकास एक आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी.
२. सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून निवड झालेल्या ग्रामसेवकाला प्रशस्तीपत्रक व सन्मानपत्रक देवून पुरस्कार वितरण कार्यक्रम “२ ऑक्टोबर” या गांधी जयंती दिनी पार पाडण्याचे शासनाचे आदेश असले तरी सदर दिवशी जिल्हास्तरावर ग्रामसभा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याने आदर्श ग्राम सेवक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम त्या दिवशी पार पाडणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर आदर्श ग्राम सेवक पुरस्कार वितरण कार्यक्रम विलंबाने पार पाडले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
३.याबाबत शासनाचे असे आदेश आहेत की, ” २ ऑक्टोबर” या गांधी जयंती दिनी जिल्हा स्तरावर विविध कार्यक्रमाची आखणी करण्यात येत असल्याने त्या दिवशी जिल्हा परिषदांची होणारी प्रशासकीय गैरसोय विचारात घेवून सदर कार्यक्रम ” २ ऑक्टोबर” या गांधी जयंती दिनाव्यतिरिक्त जिल्हा परिषदांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीनुसार ऑक्टोबर महिन्यातील इतर कोणत्याही दिवशी पार पाडण्याबाबतची मुभा याद्वारे देण्यात येत आहे. मात्र सदर कार्यक्रम हा ऑक्टोबर महिन्यातच पार पाडला जाईल याची सर्व जिल्हा परिषदांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. ऑक्टोबर महिन्यात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पाडण्यास कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्त यांनी त्यांचे स्तरावर करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….