ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज बोर्डसाठी मान्यता देण्याचे अधिकार नसल्याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायती राज विभाग शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम-२०२४/प्र.क्र.१३३/पंरा-४ दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२४
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका.क्र. ८६५७/२०२४ संदर्भातील दि.२१.८.२०२४ च्या आदेशात निदर्शनास आल्याप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या नियमात व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज लावण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी देण्याची तरतुद नाही. सबब राज्यातील ग्रामपंचायतींनी, ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज लावण्यासाठी ना- हरकत प्रमाणपत्र अथवा मान्यता देण्याचे नियमबाह्य कृत्य करु नये. नियमबाह्य कृत्य करणाऱ्या संबंधितांवर प्रचलित कायद्यतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक / होर्डिंग्ज काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….