Wednesday, May 13, 2026
Wednesday, May 13, 2026
Home » जिल्हा ग्रामविकास निधी : ग्रामपंचायतीस कर्ज (DVDF )

जिल्हा ग्रामविकास निधी : ग्रामपंचायतीस कर्ज (DVDF )

0 comment 3K views

मुंबई ग्रामपंचायत ( जिल्हा परिषदांनी कर्ज देणे ) नियम १९६९

प्रत्येक ग्रामपंचायतीच्या स्वत: च्या उत्पन्नातून, उत्पन्ना च्या ०.२५ % एवढी रक्कम दरवर्षी जिल्हा ग्रामविकास निधीमध्ये वर्गणी म्हणून जमा करण्यात करण्यात येते (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १३३ अन्वये).

जिल्हा स्तरावर असणाऱ्या निधी मधून ग्रामपंचायतीस विकास कामासाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठी ग्रामपंचायतीने विहित नमून्यातील अर्जासोबत आवश्यक असलेली रक्कम, कर्ज घ्यावयाचे कारण, खर्चाचा अंदाज, त्याची व्यवस्था ठेवण्यासाठी येणारा खर्च, कर्ज परतफेड करावयाची मुदत व हप्त्यांची संख्या इत्यादी माहिती ग्रामपंचायतीच्या मासिक ठरावाद्वारे मंजूरी घेऊन प्रस्ताव जिल्हा परिषदेस सादर करावा. अंदाजपत्रकाचे २५ टक्के रक्कम ग्रामनिधी खात्यात असणे आवश्यक आहे. कर्ज प्रस्तावासोबत पूर्वीच्या वर्षाच्या अखेरीस असलेली शिल्लक पासबुकाच्या झेरॉक्स सह दर्शविण्यास आली पाहिजे. मागील तीन वर्षाचे जमा व खर्चाचे अहवाल, चालू आर्थिक वर्षाचे व पुढील दोन वर्षाचे अंदाजपत्रक, अंदाजे उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावयाचे ठरविले असल्यास त्याचे विवरणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. स्थायी समिती अर्जाची तपासणी करुन कर्ज घेण्याचा उद्देश, पंचायतीची आर्थिक स्थिती, कर्ज फेडण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करुन कामाचे अंदाजपत्रकीय रकमेच्या ७५% एवढी रक्कम कर्ज म्हणून मंजूर करेल. कर्ज परतफेड २० वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठीची नसावी.कर्जासाठी द.सा.द.शे ५% व्याजदर राहील.कर्ज फेडण्याचे सरपंच / उपसरपंच व पंचायतीचे अधिकृत केलेले कोणतेही दोन सदस्य यांनी विहित नमून्यातील हमीपत्र लिहून दिले पाहिजे.ग्रामपंचायत ज्या कालावधीत कर्ज परतफेड करणार असेल त्या कालावधीच्या वार्षिक अंदाजपत्रकात कर्ज हप्ता परतफेड करण्यासाठी तरतूद केलेली पाहिजे.या निधी अंतर्गत उत्पादक स्वरुपाची विकास कामे घेण्यात यावी.कर्जाचा प्रस्ताव तयार करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (जिल्हा ग्राम विकास) निधी नियम, १९६० मधील नियम १० नुसार प्रस्ताव तयार करण्यात यावा.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील सुधारणा 2004 ची अधिसूचना दिनांक 17-02-2004 च्या शुद्धीपत्रकाच्या अमलबजावणीबाबत ग्रामविकास विभाग दिनांक 26-04-2005

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब मध्ये प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना मुंबई जिल्हा ग्रामपंचायत अर्थ संकल्प लेखा नियम 1959 व मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम 1960 मध्ये सुधारणा ग्रामविकास विभाग दिनांक 17-07-2004

जिल्‍हा ग्रामविकास निधी 1960 मध्ये सुधारणा अधिसूचना दिनांक 03-06-2004

मुंबई जिल्हा ग्रामपंचायत (अर्थसंकल्प व लेखा नियम 1959 सुधारणा अधिसूचना अधिसूचना 31-03-2004

मुंबई जिल्हा ग्रामपंचायत (अर्थसंकल्प व लेखा नियम 1959 सुधारणा अधिसूचना दिनांक 17-02-2004

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतणूकी बाबत. 28-02-2003

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत.ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- क्र.व्‍हीपीएम2601/प्र.क्र.1643/22, दिनांक:- 16-05-2002

मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कमा गुंतविणे व पुन्हा गुंतविणेबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि, सदर गुंतवणूक योग्य प्रकारे होत नसल्यामुळे दिनांक २२ नोव्हेंबर, २००० तसेच, दिनांक ८ जानेवारी, २००२चे समक्रमांकाचे परिपत्रकान्वये सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

२. उपरोक्त सूचनांमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीमधील मागील तीन वर्षाच्या सरासरी Withdrawls च्या दीडपटीपेक्षा जास्त रक्कमा Saving Accounts मध्ये रहाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत पुर्नविचार करुन शासनाने असा निर्णय घेतला आहे की, जिल्हा ग्राम विकास निधीमधील सर्व शिल्लक रक्कम Saving Accounts मध्ये न ठेवता त्यापैकी जास्तीत जास्त रक्क्म जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ मधील तरतूदीनुसार ३० ते ४५ दिवसाच्या किंवा अधिक कालावधीच्या निश्चित ठेव योजनेत गुंतवावी आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न आणि मूळ रक्कमा अशाप्रकारे गुंतवाव्यात की, ज्यायोगे शासनाला अधिकाधिक उत्पन्न मिळू शकेल आणि व्याजाची हानी होणार नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने सदर रक्कम गुंतवितांना त्यासाठी ग्रामपंचायतींना कर्जासाठी आवश्यक ती रक्कम तत्काळ उपलब्ध होईल नेही तारतम्याने ठरवावे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत. जानेवारी 2002

जिल्हा ग्रामविकास निधी मुदत ठेवीतील रककमा काढून ठेकेदाराची बिले अदा 04-08-2001

जिल्हा ग्रामविकास निधी कर्ज बाबत पत्र 30-06-2001

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत. 22-11-2000

जिल्हा ग्रामविकास निधी मसुदा दिनांक 25-8-2000

जिल्हा परिषदाना प्रशासकीय इमारती बांधण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास निधी तून कर्ज मंजूर होण्यासंबधी होत असलेल्या मागण्याबाबत दिनांक 03-07-1995

District Village Development Fund 22-9-1994

जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 च्या कलम 130 मधील उपकलम (4) मधील खंड (अ) च्या अनुषंगाने ग्रामीण बँक दिनांक 11-05-1992

जिल्‍हा ग्रामविकास निधीच्‍या गुंतवणूकी बाबत 18-11-1991

जिल्हा परिषदेकडून मोठ्या रकमेची कामे ग्रामपंचायतीस देण्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीची तपासणी करणेबाबत 25-10-1990

जिल्हा ग्रामीण विकास निधी 23-08-1989

जिल्हा ग्रामविकास निधीच्या रकमा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवणे 22-02-1989

प्राथमिक शाळा इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीला कर्ज देण्याची योजना 22-3-1983

District Village Development Fund 21-07-1980

District Village Development Fund 23-10-1973

District Village Development Fund 07-04-1972

District Village Development Fund 31-07-1971

District Village Development Fund 16-04-1971

District Village Development Fund 27-02-1971

District Village Development Fund 22-05-1970

District Village Development Fund 30-12-1969

Bombay District Village Development Fund 8-01 -1969

District Village Development Fund 17-02-1967

District Village Development Fund 17-01-1967

District Village Development Fund 29-12-1966

Bobay District Village Development Fund 1960 Dt 03-12-1966

District Village Development Fund repayment of loan Dt 17-11-1965

Bobay District Village Development Fund Rules 1960 Instrument in respect of audit of accounts of the fund Dt 21-09-1965

Bobay District Village Development Fund Rules depostining of in the cooperative bank 22-07-1965

Bobay District Village Development Fund Rules Contribution of villages 17-07-1965

Bombay District Village Development Fund 18-06-1965

Bobay District Village Development Fund Rules Dt 08-01-1965

District Village Development Fund 06-01-1965

District Village Development Fund 31-08-1964

District Village Development Fund 13-06-1964

District Village Development Fund 03-04-1964

District Village Development Fund11-07-1963

मुंबई ग्रामविकास निधी नियम 1960 सुधारणा दिनांक 30-08-1962

Bobay District Village Development Fund Rules Dt 01-04-1960

Bobay District Village Development Fund Rules 1960 23-01-1960

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

397602

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions