इंदीरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेले घरकुल काही अपरिहार्य करणास्तव लाभार्यास विकावयाचे असल्यास सदर घरकुल विक्री करावयाच्या प्रक्रीयेबाबत, मा संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण मुंबई पत्र दिनांक २०-०४-२०१९ साठी येथे click करा
सदर विषयान्वये इंदिरा आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामोण अंतर्गत पूर्ण झालेले घरकुल लाभार्थ्यास जर काही अपरिहार्य कारणास्तव विकावयाचे असल्यास त्याबाबत कशी प्रक्रिया राबवावी याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यास सूचित केले आहे.
सदर विषयाबाबत मुद्देनिहाय आपले अभिप्राय या कार्यालयास सादर करावेत. जसे लाभार्थ्यांने स्वतःच्या जागेवर घरकुल बांधकाम केले आहे का? शासकीय जमीनीवर / ग्रामपंचायतीने गावठणामध्ये दिलेल्या जागेवर घरकुल बांधकाम केले आहे का? घरकुल विक्री करण्यामागचे कारण अपरिहार्य आहे का? सदर बाबत ग्रामसभेचा ठराव, जिल्हास्तरावरुन मान्यता देणे, संबंधित लाभार्थ्याचे भविष्यात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र, लाभार्थ्याकडून घरकुल मंजूर झालेल्या दिनांकापासून /घरकुल पूर्ण झालेल्या दिनांकापासून त्यास मंजूर असलेली रक्कम व्याजासह वसूल करावी का? या व आपणांस आवश्यक वाटत असलेल्या मुद्दयांचा समावेश आपले अभिप्राय देत असताना करावा.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
घरकुल विक्रीस परवानगी मिळणेबाबत, ग्रामविकास विभाग पत्र दिनांक ०९-०९-२०१४ साठी येथे click करा

इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ घेतलेला आहे. लाभार्थ्यांनी विविध कारणास्तव घरकुल विकावयाचे असल्याने लाभार्थ्यांची विनंती विचारात घेऊन एक विशेष बाब म्हणून घरकुल विकण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र, लाभार्थ्यांकडून कमीत-कमी आजच्या घरकुल किंमतीऐवढी (म्हणजे रू.९५,०००/- फक्त) किंवा घरकुलाची रक्कम व्याज (म्हणजे रू.९५,०००/- पेक्षा जास्त होत असल्यास) वसूल केल्यानंतरच सदर लाभार्थ्यांस घरकुल विकण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच सदर लाभार्थ्यांना भविष्यात शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळणार नाही व त्यांचे नाव दारिद्रय रेषेच्या यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, याबाबतही त्यांना स्पष्टपणे कळविण्यात यावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
-
536
-
281
-
625