Saturday, August 30, 2025
Saturday, August 30, 2025
Home » इंदिरा आवास योजना

इदिरा आवास योजनेअतर्गत बांधण्यात येणा-या घरकुलाच्या कामातील अकुशल कामे महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअतर्गत घेण्याबाबत नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०५-२०१५ साठी येथे click करा

कामाच्या अंमलबजावणीसाठीचे महत्वाचे निकषः
१) लाभार्थीची निवड इंदिरा आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करणे आवश्यक आहे.
२) सदर योजनेसाठी प्रस्तावित इंदिरा आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉबकार्डधारक असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांकडे जॉब कार्ड नसल्यास, ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात अर्ज केल्यास, प्रचलित नियमानुसार तपासणी करून, पात्र कुटुंबांना जॉब कार्डचे वाटप ग्रामपंचायतीने ७ दिवसात करणे बंधनकारक राहील. लाभार्थी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाच्या परि. ५ च्या अनुसूची १ मध्ये विहित केलेल्या खालील संवर्गापैकी (category) असावा.
1) अनुसूचित जाती (SC)
2) अनुसूचित जनजाती (ST)
3) दारिद्रय रेषेखालील लाभार्थी (BPL)
4) अल्प व अत्यल्प भुधारक
5) वन हक्क कायद्याखाली जमिनीची पट्टी मिळालेले लाभार्थी
6) भटक्या /विमुक्त जाती
7) महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब
8) अपंग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब

३) साधारणतः सदर योजनेसाठी लाभार्थ्याने मजूर म्हणून स्वतः काम करणे आवश्यक असून फक्त ६० वर्षाहून अधिक वय असलेले व शारीरीक दृष्ट्या अपंग व्यक्ती यांना काम करण्यापासुन सूट राहील.
४) सदर कामावर मजूरीची अदायगी बैंक / पोस्ट खात्यातुन करणे बंधनकारक आहे. मजुरांना स्वतंत्र खाते उघडण्याची आवश्यकता नसुन अस्तित्वात असलेल्या कोणत्याही खात्यात मजूरीची रक्कम जमा करता येईल. मात्र, मजूरांकडे कोणतेही खाते नसल्यास, खाते उघडावे लागेल.
नियोजन आणि अंमलबजावणीची प्रक्रिया :
१) इंदिरा आवास योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांचेकडुन प्राप्त झाल्यावर इंदिरा आवासच्या नरेगा अंतर्गत प्रस्तावित अकुशल कामासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याची कार्यवाही गट विकास अधिकारी यांचे स्तरावरून करण्यात यावी. जी कामे शेल्फमध्ये व कृती आराखड्यात समाविष्ट नाहीत अश्या कामांना गट विकास अधिकारी स्तरावरून प्रशासकीय मान्यता दिल्यावर विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून आवश्यक असल्यास कार्योत्तर मंजूरी प्राप्त करून घ्यावी.
२) एका ग्रामपंचायत्ती अंतर्गत प्रस्तावित सर्व कामांना एकत्रित प्रशासकीय मान्यता प्रदान करता येईल.
३) एक घरकुल हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एक काम असे समजुन प्रत्येक घरकुलासाठी स्वतंत्र वर्क काड तयार करावे.
४) सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत इतर कामांसमवेत इंदिरा आवास योजना व मगांराग्रारोहयो अभिसरण अंतर्गत घेण्यात आलेल्या कामांचा देखील समावेश असेल.
५) लाभार्थ्याने काम सुरू करण्याची तयारी दर्शविल्यावर किंवा कामाची मागणी केल्यावर ग्रामरोजगार सेवक पंचायत समिती स्तरावर कामाची मागणी नोंदवेल व ई-मस्टर प्राप्त करून सदर कामावर वापरेल. ई-मस्टर प्राप्त करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे कामाचे चार टप्पे निश्चित करून देण्यात आले आहे.
अ) जोत्यापर्यंतचे बांधकाम.
ब) जोत्यापासुन ते सज्जापर्यंतचे बांधकाम.
क) सज्जापासुन ते छतापर्यंतचे बांधकाम.
ड) छताचे बांधकाम व घरकुलाचे संपुर्ण कामे पूर्ण होईपर्यंत
कामाची मागणी घेताना लाभार्थ्यांचे आधार क्रमांक अनिवार्य नाही. याबाबत क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात. ज्या लाभार्थ्यांचा आधार क्रमांक नसेल त्यांचे बाबतीत सूट मिळविण्याची कार्यपध्दती आयुक्त, नरेगा नागपूर यांच्या पत्र क्र. आयुक्तालय/ आस्था/७१०/२०१५, दिनांक १५/०४/२०१५ अन्वये देण्यात आली आहे. आधार क्रमांक नसल्यामुळे कोणीही कामापासुन वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.
६) मगांराग्रारोहयो अंतर्गत असलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे ई-मस्टर प्राप्त करणे, ई-मस्टर पेमेंट साठी पंचायत समितीस सादर करणे ही कामे ग्रामरोजगार सेवकामार्फत करण्यात यावी. मजूरीचे भुगतान EFMS प्रणाली मार्फत करण्यात यावे.
७) हजेरीपत्रक संपल्यावर इंदिरा आवास योजनेचे मोजमाप नोंदविणारे अभियंते त्यांचे नियमित कार्यपध्दतीप्रमाणे मोजमाप नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करतील व हजेरीपत्रकावर नोंदविलेल्या उपस्थिती व झालेल्या कामाप्रमाणे मजूरी अदा करण्याची शिफारस करतील. मोजमाप प्रक्रिया सुलभ करण्यासाठी १ किंवा २ पानाच्या pre-printed मोजमाप पुस्तिकेचा वापर करता येईल. मजूरीची अदायगी मगांराग्रारोहयोच्या नियमित कार्यपध्दती प्रमाणे करण्यात येईल.
खर्च करण्याची कार्यपध्दतीः
१) इंदिरा आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे किमान २० चौरस मीटरच्या घरांचे बांधकाम करताना ९० दिवस अकुशल मनुष्यदिवस अनुज्ञेय आहे. त्यानुसार विहित केलेल्या मर्यादेपर्यंतच म्हणजेच ९० मनुष्यदिवस मजूरीची रक्कम मगांराग्रारोहयोच्या दराने ४ हजेरीपत्रके भरून अदा करणे आवश्यक आहे. डोंगराळ भाग व आयएपी जिल्ह्यांमध्ये ९० दिवसां ऐवजी ९५ दिवस अनुज्ञेय राहील. मुद्दा क्रमांक ५ मध्ये नमुद प्रत्येक टप्प्यासाठी अपेक्षित मनुष्यदिवसा प्रमाणे हजेरीपत्रक भरून मजूरीची अदायगी मगांराग्रारोहयोच्या कार्यपध्दतीप्रमाणे करावी.
२) इंदिरा आवास योजनेच्या नमूना अंदाजपत्रकाप्रमाणे अंदाजित २० स्क्वे. मीटरचे बांधकाम गृहित धरून टप्पानिहाय अपेक्षित अकुशल निर्मित मनुष्य दिवस पुढीलप्रमाणे राहील.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

इंदिरा आवास योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्यास लाभ देण्याबाबत विभागीय आयुक्त नाशिक यांचे पत्र दिनांक ११-०६-२०१३ साठी येथे click करा

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

76489

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.