राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर योजना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नांवाने राबविणे बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २८-०६-२०२२
राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अटी व निकष पुढीलप्रमाणे राहतील.
“क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार”
प्रस्तावासाठी आवश्यक अटी :-
१) शिक्षकांनी नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे मुख्याध्यापकांनी प्रमाणित करणे आवश्यक.
२) मुख्याध्यापक पदावरील व्यक्तीने नामनिर्देशनासाठी सादर केलेले पुरावे गटशिक्षणाधिकारी /प्रशासन अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
शासन निर्णय क्रमांकः पीटीसी-२०२२/प्र.क्र.३४/टीएनटी-४
३) शिक्षक/मुख्याध्यापकाची एकूण सलग सेवा किमान १० वर्षे आवश्यक.
४) शिक्षकाचे/मुख्याध्यापकाचे मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल.
५) विभागीय चौकशी सुरु नसल्याचे शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र.
६) शिक्षकांनी केलेल्या लगतच्या ५ वर्षाच्या सेवा कालावधीतील कार्याचे मूल्यमापन राज्यस्तर व
जिल्हास्तर समितीकडून गुणांकनाव्दारे करण्यात येईल.
७) प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांची आवेदने स्वीकारली जाणार नाहीत.
८) शिक्षकाच्या सेवेतील कार्यपध्दतीबाबत व निर्व्यसनी असलेबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील