Monday, August 4, 2025
Monday, August 4, 2025
Home » शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना व्याज प्रदान बाबत

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना व्याज प्रदान बाबत

0 comment 293 views

विलंबाने सेवा उपदान व निवृतीवेतन प्रदान केल्यामुळे व्याज अदा करण्याबाबतअधिसूचना दि. 01-11-2008

(१) ज्या कालावधीसाठी तात्पुरते निवृत्तिवेतन प्रदान करण्यात आले असेल त्या कालावधीसाठी व्याज देय होणार नाही. ज्या शासकीय कर्मचाऱ्याला तात्पुरते निवृत्तिवेतन मंजूर केले असेल त्या प्रकरणी, तात्पुरत्या निवृत्तिवेतनाचे प्रदान बंद झाल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी उलटल्यापासून अंतिम निवृत्तिवेतन प्राधिकृत करेपर्यंतच्या कालावधीसाठी विहित तरतुदींनुसार व्याज देण्यात येईल.

(२) विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या निवृत्तिवेतनाचे/कुटुंब निवृत्तिवेतनाच्या प्रत्येक प्रकरणावर मंत्रालयातील संबंधित प्रशासकीय विभाग स्वाधिकारे विचार करील, आणि निवृत्तिवेतन/कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्यातील विलंब हा प्रशासकीय कारणांमुळे झाला याबद्दल विभागाची खात्री झाली असेल, तर तो विभाग यथास्थिति, महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई/नागपूर यांचेकडून या संबंधातील अनुज्ञेयता अहवाल प्राप्त करून घेऊन, व्याज प्रदान करील. व्याज प्रदान करण्यासाठी वित्त विभागाकडे मान्यतेसाठी शिफारस करण्याची यापुढे आवश्यकता राहणार नाही.

(३) जेथे प्रशासनिक कारणामुळे निवृत्तिवेतनावर/कुटुंब निवृत्तिवेतनावर व्याजाचे प्रदान प्राधिकृत करण्यात आले असेल, अशा सर्व प्रकरणात मंत्रालयातील प्रशासकीय विभागाने जबाबदारी निश्चित करून विलंबास जबाबदार असल्याचे आढळून आलेल्या अधिकाऱ्यांसहित शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध अथवा कर्मचाऱ्यांविरुद्ध संबंधित प्रशासकीय विभाग जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करील आणि निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्ती वेतनाचे विलंबास जबाबदार असल्याचे आढळून आलेल्या अधिकाऱ्यांसहित, शासकीय कर्मचाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून देय झालेल्या व्याजाची रक्कम वसूल करील.

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या गट विमा बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबत 30-9-2009

१. महाराष्ट्र राज्य कर्मचारी गट विमा योजना १९८२ अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना / कुटुंबियांना गट विमा योजनेच्या रक्कमा अदा करण्यास झालेला विलंब हा कर्मचा-यांच्या चुकीमुळे / प्रशासकीय कारणास्तव / प्रशासकीय चुकीमुळे झाला याबाबतीत प्रत्येक प्रकरणी चौकशी करुन ठरवावे. जर एका प्रकरणात विलंब एकापेक्षा अधिक कारणामुळे झाला असल्यास कोणत्या कारणामुळे किती विलंब झाला हे ठरवावे.

२. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अनुज्ञेय ठरणाऱ्या सर्व प्रकारच्या रक्कमांच्या बाबतोत संबंधित कर्मचाऱ्याची चूक नसल्यास इतर कोणत्याही कारणामुळे विलंब झाल्यास त्यांना विलंबाकरिता शासन निर्णयानुसार व्याज अनुज्ञेय राहिल अशी स्पष्ट तरतूद केली पाहिजे. जरी काही प्रकरणात विलंब हा प्रशासकीय कारणास्तव झालेला नसेल किंवा त्याकरिता सुस्पष्टपणे जबाबदारी ठरवता येत नसेल किंवा मात्र विलंब कर्मचा-यांच्या चूकीमुळे झालेला नसेल तरी त्या कर्मचाऱ्याला विलंबार्कारता व्याज अनुज्ञेय ठरले. जर एखाद्या प्रकरणात काही काळाचा विलंब हा संबंधित कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे झाला असल्यास अशा प्रकरणी तो कर्मचारी विलंबास जबाबदार असेल तो कालावधी वगळून उर्वरित काळासाठी व्याज देण्यात यावे.

३. प्रशासकीय चूकीमुळे विलंब ईगला असल्यास विलंबास जबाबदार त्या त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवावी व त्यांचेकडून रक्कम वसूल करण्यात यावी.

४. वर नमूद केलेल्या शिफारस क्र. तीनची कार्यवाही ही स्वतंत्रपणे करावी. संबंधित कर्मचाऱ्यांना देण्याच्या व्याजाच्या रक्कमेचा सदर चौकशीशी संबंध असू नये.

५. ज्या प्रकरणात विलंब झालेला आहे त्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याकडून विलंबाबाबत मागणी अर्जाची वाट न पाहता, सक्षम प्राधिकारी यांनी विलंबाच्याबाबतीत अहवाल प्रशासकीय विभाग किंवा सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठवून त्यात विलंबाच्या बाबतीत प्रत्येक टप्प्यावर विलंब कोणत्या कारणामुळे झालेला आहे हे नमूद करुन व्याज अनुज्ञेय आहे की नाही याबाबत स्पष्ट अभिप्राय घ्यावे व प्रशासकीय किंवा सक्षम प्राधिकारी यांनी व्याजाबाबत निर्णय घ्यावा व याबाबत जबाबदारी ठर्रावण्याचे स्वतंत्र आदेश धावं.

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या अर्जित रजा अर्धवेतनी रोख सम तुल्य रकमेवर व्याज देण्याबाबत 20-06-1996

(1) शिल्लक अर्जित/अर्धवेतनी रजेच्या संबंधातील रजा वेतनाच्या सममूल्य रोख रकमेच्या प्रदानासाठी झालेला विलंब प्रशासकीय कारणास्तव/प्रशासनिक चुकीमुळे किंवा संबंधित कर्मचा-यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणामुळे झालेला आहे असे स्पष्टपणे प्रस्थापित होत असेल अशा प्रकरणी विलंबाच्या कालावधीसाठी व्याज देण्यात येईल.

(2) व्याज प्रदानारठी विलंबाचा कालावधी ..
(अ) नियमित प्रकरणी (विभागीय चौ तशीची प्रकारणे वगळून) शासकीय कर्मचा-याच्या सेवानिवृत्तिच्या /से समाप्ती/मृत्युच्या दिनांपासून एक महिन्यानंतरचा असेल.
(ब) निलंबनाधीन असताना नियत अयमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या व अर्जित/अर्धबेतनी रणेच्यां संयंत्रातील रजा वेतनाची रागमूल्य रोख रक्कम रोखून ठेवण्यात आली आहे अशा प्रकरणी
(i) संबंधित कर्मचा-यःची विभागीय चौकशीअंती पूर्णपणे निर्दोष मुक्तता झाली असल्यास व त्याचे निलंबन असमर्थनीय ठरविण्यात आले असल्यास त्याच्या सेवानिवृत्तिच्या विनापासून एक महिन्यानंतर असे
(ii) संबंधित कर्मचारी दोषी ठरता असल्यास व त्याचे निलंबन समर्थनीय ठरविण्यात आले असल्यारा विभागीय चौकशीसंबंधातील अंतिग आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यानंतरचा असेल.
(III) विभानीय चौकशी सुरू असताना मृत्यु पावलेल्या कर्मचा-यांच्या प्रक्रणी विभागीय चौकशी संपुष्टात आणणा-या आदेशाच्या दिनांकापासून एक गहिन्यानंतरथा असेल.

(3) विलंबाच्या कालावधीसाठी सर्वसाधारण विष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर लागू असलेल्या ब्याज दराप्रमाणे व्याज देण्यात याये. (सध्या हा दर बाईक 12% नाषिक चक्रयाढीने आहे).
(4) व्याज प्रदानाच्या प्रत्येक प्रकरणावर संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्वाधिकारे विचार करील आणि रोख सममूल्य प्रथन करण्यातील विलंब हा प्रशासकीय कारणास्तव झालेला आहे यांबद्दल खात्री पटल्यावर व्याजाचे प्रदान करील.
“(5) व्याज द्यावयाचे आहे अशा सर्व प्रकरणी विलंवाची जबाबदारी निश्चित करून, संबंधित जबाबदार कर्मचा-याविरध्द (अधिकारी धरून) शिस्तभंगाची कारवाई स्वतंत्रपणे करण्यात यावी. मात्र अशी कारवाई पूर्ण होईपर्यन्त व्याजाचे प्रदान रोखून ठेवण्यात येऊ नये
(6) शिस्तभंगाची कारवाई वेळेवर आणि योग्य रितीने होत आहे याची खातरजमा करून मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी या शासन निर्णयाच्या सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात तिगाही अहवाल वित्त विभागाकडे
हे आदेश दिनांक 1 एप्रिल, 1996 पासून अंमलात येतील. या दिनांकापूर्वी सेयानिवृत्त/सेवा समाप्त झालेल्या किंया सेवेत असताना मृत्यु पावलेल्या शाशकीय कर्मचा-यांच्या प्रकरणी शिल्लक अर्जित/अर्धवेतनी रजेच्या संबंधात रजा वेतनाच्या अगमूल्य रोख रकमेच्या प्रानासाठी, सेवानिवृत्तिच्या/सेवा समाप्तीच्या/मृत्युच्या दिनांकापासून एक महिन्यापेक्षा जास्त विलंब झाला असल्यास व देनांक 1 एप्रिल, 1996 पर्यंत रजेच्या रोख सममूल्याचे प्रदान करण्यात आले नसेल अश्शत प्रकरणी देखील हे आदेश लागू राहतील. तथापि, व्याजाचे प्रदान, सेवानिवृत्तिच्या/सेवा खुमाप्तीच्या/मृत्युझ्या दिनांकापासून एक महिन्यानंतरच दिनांक किंवा 1 एप्रिल, 1996 या पैकी जो नंतरचा दिनांक असेल, त्या दिनांकापासून देय राहील.

वेतन महागाई भत्ता इतर पूरक भत्ते तसेच वेतनवाढी व आगावू वेतन वाढ व्याज प्रदान २२-११-१९९४

विलंबाने प्रदान करण्यात आलेल्या गट विमा योजना बचत निधी रकमेवर व्याज देण्याबाबत 27-05-92

[एक) नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना त्यांच्या सेवानिवृत्ती घ्या दिनांका-पासून अथवा राज्य शासनाकडील त्यांची सेवा संपुष्टात आलेल्या कर्मचा-यांना त्यांची सेवा संपुष्टात आल्यांच्या दिनांकापासून किंवा सेवेत असताना अकाली निधन पावलेल्या कर्मचा– यांच्या वारसांना/कुटुंबियांना संबंधित कर्मचा-यांच्या मृत्यूच्या दिनांकापासून गट विमा योजनेच्या साभाची रक्कम सर्व आवश्यक धादींची पूर्तता करून तीन महिन्यांच्या आत देण्यात यावी:

[दोन] सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचा-याविरुध्द विभागीय न्यायिक कार्यवाही प्रर्लवित असली तरी गट विमा योजनेची प्रदेय रक्कम सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत देण्यात यावी;

[तीन] वरील बाब क्रमांक १ व २ येथे नमूद केल्याप्रमाणे तेवानिवृत्त कर्मचा-यांना किंवा राज्य शासनाकडील सेवा सेवा संपुष्टात आलेल्या कर्मचा-यांना किंवा सेवेत असताना निधन पावलेल्या कर्मचा-याध्या वारसांना किंवा कुटुंबियांना त्यांचा वैयक्तीक दोष नसताना प्रशासकीय चुकीमुळे गट विमा योजनेची रक्कम तीन महिन्याच्या आत प्रदान करण्यात न आल्यात या कालावधीनंतरच्या विलंब कालाधीकरीता बचत निधीवर ज्या दराने व्याज दिले जाते त्या दराने व्याज अनुज्ञेय राहील,

[चार] बाब क्रमांक ३ अनुसार विलंब कालावधीसाठी व्याज अनुज्ञेय असले तरी अशा प्रत्येक प्रकरणी संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाशी विचारविनिमय करूनय अंतिम निर्णय घ्यावाः

[पाच) गट विमा योजनेची प्रदेय रक्कम प्रदान करण्यात प्रशासकीय चुकीमुळे विलंब झाला असल्यास या चुकीस जबाबदार असणा-या कर्मचारी/अधिका-याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात पाची व या प्रकरणी देय असलेली व्याजाची रक्कम या जबाबदार कर्मचारी/अधिकारी यधि-कडून वसूल करण्यात यावी. मात्र, विलंब कालावधीसाठी देय असलेली व्याजाची रक्कम ही गट विमा योजनेच्या प्रदेय रकमेबरोबरच, या प्रकरणात करण्यात येणा-या कार्यवाहीच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता तात्काळ देण्यात यावी.

[सहा] एखाद्या प्रकरणी एकापेक्षा अधिक वारसांनी विम्याच्या रकमेवर हक्क दाखल केलेला असल्यास, जर विम्याची रक्कम रोखून ठेवण्यात आली असेल तर अशा प्रकरणी आपोआप व्याज देय ठरणार नाही. अते प्रत्त्येक प्रकरण गुणवत्तेनुसार वित्त विभागाच्या संमतीने तपासून अंतिम निर्णय घेण्यात यावा.
२) या आदेशाच्या दिनांकापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या/सेवा समाप्त झालेल्या शासकीय कर्मचा–यांच्या किंवा सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचा-यांच्या वारसांना/कुटुंबियांना गढ़ विमा योजनेच्या प्रदानासाठी निवृत्तीच्या/सेवा तमाप्तीच्या मृत्यूच्या दिनांकापासून तीन महि-न्यापेक्षा अधिक विलंब झाला असेल व हे आदेश निर्गमित होण्याच्या दिनाकापर्यन्त त्यांना रकमेचे प्रदान करण्यात आलेले नसेल अशा प्रकरणीदेखील है आदेश लागू राहतील. तथापि, अशा प्रकरणी व्याजाचे प्रदान हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांक किंवा निवृत्तीच्या/सेवा समाप्तीच्या /मृत्यूच्या दिनांकापासून तीन महिन्याचा कालावधी यापैकी जो नंतरचा दिनांक असेल त्या दिनांका-पर्यन्त देय राहतील.
३. ‘नियम वयोमान किंवा इतर कारणास्तव सेवानिवृत्ती/सेवा समाप्ती/मृत्यूची जी प्रकरणे है आदेश निर्गमित करण्याच्या अगोदर अंतिमतः निकालात काढलेली आहेत ती पुन्हा सुरु करण्यात येऊ नयेत.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

52990

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.