दिव्यांगजनांचासमावेश अंत्योदयअन्नयोजने मध्येकरण्या करिता केंद्र 21.1.2021
अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष आहेत. त्यानुसार दिव्यांग लाभार्थी व्यक्तींची अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी म्हणून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे निकषामध्ये तरतूद आहे. १) ज्या कुटुंबाचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा अपंग किंवा ६० वर्षे वयावरील वृध्द आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही अथवा सामाजिक आधार नाही. २) एकटे राहात असलेले दुर्धर आजारग्रस्त / अपंग / विधवा / ६० वर्षावरील वृध्द, ज्यांना कौटुंबिक वा सामाजिक आधार अथवा कायम स्वरूपी उत्पन्नांचे साधन उपलब्ध नाही. ४. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत प्राधान्य गटातील कुटुंबाना सवलतीतील अन्नधान्याचा लाभ मिळण्याबाबत पात्रता निकष दि. १७.१२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे. त्यानुसार दारिद्र रेषेखालील (पिवळी) सर्व शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समावेश करण्यात आलेले आहे. तसेच दारिद्रय रेषेवरील (केशरी) शिधापत्रिकाधारकांपैकी ग्रामिण व शहरी भागातील अनुक्रमे रूपये, ४४०००/- व रू. ५९०००/- पर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या शिधापत्रिकांचादेखील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तीकडे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यामध्ये समावेश होण्याकरीता संबंधिताकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकांवरील एकूण सदस्यांचा समावेश राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत दिलेल्या लाभार्थ्यांच्या इष्टांकामध्ये समाविष्ट आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मधील तरतुदीनुसार अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांकरिता प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह ३५ किलो व प्राधान्य कुटुंबांतील लाभार्थ्यांकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो एवढे अन्नधान्य अनुज्ञेय आहे. राज्यात सुरु असलेल्या शिधापत्रिकांच्या आधार सिडींगच्या कामकाजातील आकडेवारीनुसार शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांमध्ये १ अथवा २ सदस्य असलेल्या शिधापत्रिकांचा समावेश आहे. अशा शिधापत्रिकांना १ अथवा २ सदस्यांसाठी प्रतिमाह ३५ किलो अन्नधान्य दिले जाते. वर नमूद केल्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत प्रत्येक व्यक्तीकरिता ५ किलो अन्नधान्याचे दिलेले प्रमाण विचारात घेता. अशा १ अथवा २ सदस्य असलेल्या अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांकरिता जे ३५ किलो अन्नधान्य दिले जात आहे ते आवश्यकते पेक्षा जास्त असल्याने तेवढ्या अन्नधान्याचो त्या शिधापत्रिकाधारकाकडून उचलही केली जात नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नधान्य उचली अभावी व्यपगत होत आहे. या अनुषंगाने अशा १ व २ सदस्यांच्या शिधापत्रिका जर प्राधान्य कुटुंबांच्या लाभार्थ्यामध्ये वर्ग करण्यात आल्या तर त्यांना आवश्यक तेवढे अन्नधान्य मिळेल आणि त्यांच्या शिधापत्रिकांवर वितरीत होणारे सुमारे २५ ते ३० किलो अन्नधान्य प्राधान्य कुटुंबांतील किमान एका कुटुंबाकरिता दिले जाऊ शकेल. प्राधान्य कुटुंबांतोल जास्त सदस्य असलेल्या कुटुंबांना जर अंत्योदय अन्न योजनेची शिधापत्रिका दिली तर निश्चितच अशाप्रकारे प्राधान्य कुटुंबांतील लाभार्थ्यांच्या निर्माण झालेल्या वाढीव इष्टांकामध्ये जास्तीत जास्त वंचित लाभार्थी समाविष्ट होतील. म्हणजेच, केंद्र शासनाकडून प्राप्त होत असलेल्या एकूण अन्नधान्यामध्ये राज्यातील लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त व्यक्तींना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ मिळेल.
अंत्योदय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांचे समावेशन करण्याबाबत यापूर्वी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या विविध शासन निर्णय / परिपत्रकान्वये अंत्योदय अन्न योजनेची शिधापत्रिका देण्याकरिता वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. त्याप्रमाणे मा. न्यायालयाने दिलेल्या सूचनांनुसार आदिम व आदिवासी जनतेला सामावून घेण्याकरिता सर्व आदिवासींना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. असे असले तरी राज्यातील ज्या अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांमध्ये १ अथवा २ सदस्य आहेत, त्या शिधापत्रिकांचा प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांमध्ये समावेश करताना मा. न्यायालयांच्या आदेशांन्वये दिलेल्या सूचनांचा भंग होणार नाही, याबाबत काळजी घेणे आवश्यक राहील. अंत्योदय अन्न योजनेतील ज्या शिधापत्रिका विभक्त करण्यात आल्या आहेत, त्यांच्याबाबतीत सदर कार्यवाही प्राथम्याने होणे आवश्यक आहे. अशाप्रकारे कार्यवाही केल्यास ज्या अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकांमध्ये १ अथवा २ सदस्य आहेत, अशा सर्व शिधापत्रिका जरी प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्य शिधापत्रिकांमध्ये वर्ग होऊ शकल्या नाहीत, तरी जास्तीत जास्त शिधापत्रिका वर्ग होऊ शकतील. असे करताना व नमूद केल्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाचा भंग होणार नाही व काही शिधापत्रिकांमध्ये जाणीवपूर्वक १ व २ सदस असलेल्या शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका देण्या याव्यात.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अंत्योदयअन्न योजना निवडीचे निकष 17.6.2013
अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरीता केंद्र शासनाने व राज्य शासनाने वेळोवेळी वरीलप्रमाणे ज्या सूचना दिल्या आहेत त्या विचारात घेऊन इष्टांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. २) केंद्र शासनाने दिनांक १६ मार्च, २००४ व १९ नोव्हेंबर, २००४ च्या पत्रान्वये राज्य शासनास सूचना दिल्या होत्या की अंत्योदय अन्न योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची नावे बीपीएल यादीत नसली तरी सुद्धा त्या पात्र लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका देण्यात याव्यात व त्याचवेळी त्यांची नावे बीपीएलच्या यादीत समाविष्ट करण्यात यावीत. तथापि केंद्र शासनाने संबंधित राज्य शासनास मंजुर केलेल्या एकूण बीपीएल व अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांच्या इष्टांकाच्या मर्यादेतच सदर लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी.
३) अंत्योदय अन्न योजनेच्या वाढीव शिधापत्रिका वितरीत करतांना अंत्योदय अन्न योजनेच्या इंष्टांकाच्या मर्यादेत वाढ होत असेल तर पूर्वी निवडलेल्या लाभार्थ्यांची पात्रतेकरीता पडताळणी करून जे अपात्र आढळून येतील त्यांचा समावेश बीपीएल लाभार्थ्यांच्या यादीमध्ये करावा. त्याचप्रमाणे बीपीएल लाभार्थ्यांच्या इष्टांकाच्या मर्यादेत वाढ होत असेल तर जास्त उत्पन्न असणाऱ्या बीपीएल लाभार्थ्यांचा समावेश एपीएल (केशरी) लाभार्थ्यांच्या यादीमध्ये करावा. ४) अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका आदिम जमातीच्या कुंटुंबांना वितरित करण्यासाठी आवश्यकता भासल्यास विशेष शिबिरांचे आयोजन करावे. तसेच यासाठी आवश्यकता भासल्यास स्थानिक सामाजिक संस्थांची मदत घेण्यात यावी. ५) ग्रामीण भागात प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांची निवड निश्चित झाल्यावर संबंधीत ग्रामसभेची त्या यादीस मान्यता घ्यावी. ज्या ग्रामसभा लाभार्थ्यांच्या यादीस मंजुरी देणार नाहीत, अशा ग्रामसभांना मंजुरी देण्याची पुन्हा विनंती करण्यात यावी. अशी विनंती केल्यानंतरही त्यांनी मंजुरी दिली नाही तर त्याचे कारण नमुद करून पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी स्तरावर घोषित करण्यात यावी. ६) कोणताही पात्र लाभार्थी अंत्योदय अन्न योजनेच्या लाभा पासून वंचित राहणार नाही, याचीही दक्षता घेण्यात यावी.
संकेताक २०१३०७१७१०५६११२९०६
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….