Saturday, October 25, 2025
Saturday, October 25, 2025
Home » अनुकंपा नियुक्ती

अनुकंपा नियुक्ती

0 comment 6.6K views

या post मध्ये, आम्ही आपणाला अनुकंपा संबधित शासन निर्णय माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या सहकारी यांना शेअर करु शकता

अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना व लिपिक-टंकलेखक परीक्षा-२०२३ च्या शिफारशींच्या अनुषंगाने नियुक्ती देताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अकंपा-१२२५/प्र.क्र.१९४/म.लो.आ. हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : ११ सप्टेंबर, २०२५

अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक: अकंपा-१२२५/प्र.क्र.१९४/म.लो.आ. हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : २२ ऑगस्ट, २०२५

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. १७ जुलै, २०२५ अन्वये निश्चित केलेले “अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण” जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत…
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. अकंपा-२०२५/प्र.क्र.४४२/आस्था-७बांधकाम भवन, मर्झबान पथ, २५, फोर्ट, मंत्रालय, मुंबई ४००००१ तारीख:- ३१ जुलै, २०२५

अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: अकंपा- १२२५/प्र.क्र. १२१/म.लो.आ. हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : १७ जुलै, २०२५

महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) श्रेणी-अ, श्रेणी-ब व श्रेणी-क या संवर्गातील कार्यरत दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती बाबत.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन परिपत्रक क्र. एमसीओ-२०२४/प्र.क्र.३३१/नवि-१४ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : ०७ जुलै, २०२५
.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

सदर तरतुदी ह्या जिल्हा परिषदा/ नगरपालिका / महानगरपालिका / महामंडळे / प्राधिकरणे / व्यापारी उपक्रम व इतर तत्सम आस्थापनावरील कर्मचा-यांना थेट लागू होणार नाहीत. त्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील.

3. (१) अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ शासकीय कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुज्ञेय राहील:-

3.1 (आ) सेवा नियमित केलेल्या परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले कर्मचारी. (शासन निर्णय, दि. १०.७.२००९)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे. तिचे कर्मचारी पूर्णतः ग्रामपंचायतीचे कर्मचारी असून शासनाचे किंवा जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाहीत. सदर अधिनियमातील कलम ६१ अन्वये ग्रामपंचायतीच्या उत्पन्नानुसार कर्मचारी नेमण्याचे, त्यांचे वेतन निश्चित करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला व सरपंचाना आहेत. सबब ग्रामपंचायतीत कामाला असताना कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना ग्रामपंचायतीमध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्त करुन घेण्याचा सर्वस्वी निर्णय ग्रामपंचायत घेऊ शकते.

शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे click करा (ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांकः व्हीपीएम-२०१६/प्र.क्र.१७६/पंरा-३ दि 02-08-2017.

कोतवाल कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करणेबाबत. 07-10-2024 202410071545581119

3.2 (अ) शासकीय सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांनाच अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय, दि. २२.०८.२००५) साठी येथे क्लिक करा

3.2(आ) गट अ/ब/क/ड मधील शासकीय अधिकारी अथवा कर्मचा-यास नक्षलवादी/ आतंकवादी/ दरोडेखोर/समाज विघातक यांच्या हल्यात/कारवाईत मृत्यू आल्यास अथवा शासन सेवेत कार्यरत असतांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडल्यास अशा अधिका-यांच्या व कर्मचा-यांच्या कुटुंबियातील पात्र व्यक्तीस, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना, त्यांचे नाव अनुकंपाधारकांच्या सामान्य प्रतीक्षा सूचीमध्ये न घेता, त्यांची वेगळी यादी करुन पद उपलब्ध असल्यास, रिक्त पदांच्या ५ % मर्यादेची (१० % शासन निर्णय दि. 01-03-2014) अट शिथील करुन त्यांना सर्व प्राथम्याने अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी.  (शासन शुध्दीपत्रक दि. १७.०९.२०१२) शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे click करा

3.2(इ) गट अ/ब/क/ड मधील जे शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी नक्षलवादी आतंकवादी/ दरोडेखोर/समाजविघातक यांच्या हल्यात/कारवाईमध्ये कायमस्वरुपी जायबंदी झाले आहेत व त्यांनी स्वतःहून शासकीय सेवा सोडून देण्याची लेखी अनुमती दिली आहे अशा अधिकारी/कर्मचा- यांच्या पात्र कुटुंबियातील एका व्यक्तीस अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या ५ % (१० % शासन निर्णय दि. १ मार्च, २०१४) मर्यादेमध्ये प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी. (शासन निर्णय, दिनांक १७.७.२००७) शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे click करा

3.2 ( F) अनुकंपा धोरण गट अ व गट ब मधील शासकीय कर्मचारी यांना लागु करने बाबत  साप्रवि शा नि, अकंपा-१२२१ /प्र क्र ११२/का ८ दि २७/०९/२०२१ साठी येथे क्लिक करा

3.3(अ) राज्य शासनांतर्गत कोणत्याही गट-क आणि गट-ड मधील सरळ सेवेच्या पदांवर त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील विहीत शैक्षणीक अर्हता असल्यास अशी नियुक्ती देता यईल. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४शासन निर्णय दि. २८.०३.२००१) शासन निर्णय मिळविण्यासाठी येथे click करा

3.3 (आ) ह्या नियमानुसार नियुक्ती मिळण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेस बसण्याची आवश्यकता नाही  (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४शासन निर्णय, दि. २१.११.१९९७)

3.3 (इ) लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदाखेरीज अन्य गट-क मधील कार्यकारी पदांवर नियुक्ती देण्यात यावी, मात्र अशी नियुक्ती ही त्या पदांसाठी सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवा भरतीची तरतुद आहे अशाच पदांवर देण्यात यावी. (शासन निर्णय, दि. २०.१२.१९९६)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

4 (अ) अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी खालील नमूद केलेले नातेवाईक पात्र राहतील व त्यापैकी एका पात्र नातेवाईकास नियुक्ती अनुज्ञेय राहील.

4.(१) पती/पत्नी.

4.(२) मुलगा/मुलगी (अविवाहीत/विवाहीत), मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा/मुलगी( अविवाहीत /विवाहीत)

4(३) दिवंगत शासकीय कर्मचा-याचा मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून

4(४) घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण,

4 (५) केवळ दिवंगत अविवाहीत शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण (शासन निर्णय,दि. २६.१०.१९९४शासन निर्णय दि. १७.११.२०१६)

4(आ) मृत अधिकारी/कर्मचा-यांच्या पति/पत्नी ने कोणाची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करावी याबाबत नामांकन देणे आवश्यक राहील. मृत अधिकारी/कर्मचा-यांचे पती/पत्नी हयात नसल्यास त्याच्या/तिच्या सर्व पात्र कुटुंबियांनी एकत्रित येऊन कोणाची नियुक्ती करावी याबाबत नामांकन करावे.(शासन निर्णय, दि. १७.०७.२००७)

अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदी मध्ये सुधारणा – विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरविणे बाबत  साप्रवि शा नि, अकंपा-१०१३/प्रक्र ८/आठ, दि २६/०२/२०१३

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

5(अ) अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरिता मासिक उत्पन्नाची,ठोक रकमेची मर्यादा यापुढे राहणार नाही. (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४)

5(आ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना असे प्रस्ताव शासन सेवेतील रोजगारावर असलेली मर्यादा, या योजनेच्या मागील भूमिका लक्षात घेऊन जो कर्मचारी मृत झाला आहे त्याच्या कुटुंबियांना तात्काळ उदभवणा-या आर्थिक पेचप्रसंगावर मात करण्याच्या उद्देशाने विचारात घ्यावेत.(शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४)

5 (इ) दिवंगत शासकीय कर्मचा-याचा नातेवाईक पूर्वीच सेवेत असेल तथापि तो त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना आधार देत नसेल तर अशा प्रकरणात त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे किंवा कसे हे ठरविताना नियुक्ती प्राधिका-यांनी अत्याधिक दक्षता घ्यावी.

यासंदर्भात नियुक्ती प्राधिका-याने मिळणा-या निवृतीवेतनाची रक्कम, कुटुंबातील व्यक्तींची संख्या, त्याची मालमत्ता/दायित्व, गंभीर आजारामुळे अथवा अपघातामुळे मृत झाला असल्यास त्यासाठी करण्यात आलेला वैद्यकीय खर्च, कुटुंबातील मिळवत्या व्यक्ती इत्यादी बाबी विचारात घेणे अपेक्षित आहे.(शासन निर्णय, दि.२६.१०.१९९४)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

दिनांक 31-12-2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी पात्र समजले जाणार नाही. (शासन निर्णय, दि. २८/३/२००१)

7(अ) आस्थापना अधिका-याने अनुकंपा तत्वावर नियुक्तीच्या योजनेची माहिती (योजनेचा उद्देश, पात्र नातेवाईक, अर्ज करण्याची मुदत, शैक्षणिक अर्हता, टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत, अर्ज विहीत नमून्यात भरणे इ. माहिती) (शासन निर्णय, दि. २३.०८.१९९६ शासन परिपत्रक दि.५.२.२०१०)

7(ब) दिवंगत शासकीय कर्मचा-याचा पात्र वारसदार सज्ञान नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज करु शकेल मात्र तो सज्ञान झाल्यावर त्याने असा अर्ज करणे अपेक्षित आहे (शासन निर्णय, दि. २०.०५.२०१५)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

8(अ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यापूवी संबंधितांकडून कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. (शासन निर्णय, दि. २३.०८.१९९६)

8आ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यापूर्वी संबंधिताकडून दिवंगत कर्मचा-यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. (शासन निर्णय, दि. १७.११.२०१६)

या लेखात, आम्ही आपणाला अनुकंपा संबधित शासन निर्णय माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या सहकारी यांना शेअर करु शकता

9 अ) अनुकंपा तत्वावर नियुक्ती ही कुटुंबातील एकाच पात्र नातेवाईकास अनुज्ञेय असल्याने (शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४) कुटुंबातील इतर सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

9 आ) ज्या शासकीय कर्मचा-यांना वैयक्तिक कायद्यानुसार एकापेक्षा जास्त लग्न करण्यास प्रतिबंध नसेल अशा कर्मचा-याच्या एकापेक्षा जास्त पत्नी हयात असल्यास, ज्या पत्नीला किंवा तिच्या मुलाला/मुलीला अनुकंपा तत्वावर नियुक्ती द्यायची आहे त्या व्यतिरिक्त अन्य पत्नीचे देखील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. (शासन निर्णय, दि. २३.०८.१९९६)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

10 (अ) अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र नातेवाईकाने शासकीय अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या मुदतीत संबंधित नियुक्ती प्राधिका-याकडे विहीत नमून्यात परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे.(शासन निर्णय, दि२२/८/२००५ शासन परिपत्रक, दि.०५.०२.२०१०)

10 (आ) सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचा-यांच्या कुटुंबातील अज्ञान वारसदाराच्या बाबतीत एकाने सज्ञान म्हणजे १८ वर्षाचा झाल्यावर एक वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी परिपूर्ण अर्ज सादर करणे आवश्यक आहे. (शासन निर्णय, दि. ११/९/१९९६ शासन परिपत्रक, दि. ०५.०२.२०१०)

10 (इ) पात्र वारसदारास विहीत १ वर्षाच्या मुदतीनंतर २ वर्ष इतक्या कालावधिपर्यंत (मृत्यूच्या दिनांकापासून ३ वर्षापर्यंत) तसेच दिवंगत शासकीय कर्मचा-यांच्या अज्ञान वारसदाराच्या बाबतीत तो उमेदवार सज्ञान झाल्यानंतर विहीत १ वर्षाच्या मुदतीनंतर २ वर्षापर्यंत (सज्ञान झाल्यानंतर ३ वर्षापर्यंत) अर्ज सादर करण्यास विलंब झाल्यास असा विलंब क्षमापित (शासन निर्णय, दि. २०.०५.२०१५)

10  (ई) जोपर्यंत अनुकंपा नियुक्तीकरीता आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उमेदवारांकडून प्राप्त होत नाहीत तोपर्यंत त्यांचे नांव प्रतीक्षासूचीमध्ये समाविष्ट करता येणार नाही. (शासन परिपत्रक, दि. ५/२/२०१०)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना अनुकंपा नियुक्ती देणे बाबतः बेपत्ता झालेला शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय ठरेल. ( शासन निर्णय क्रमांक: अकंपा-१२२२/प्र.क्र.९६/का-८ दि:19/09/2022)

11(अ) किमान वयोमर्यादा- १८ वर्ष (शासन निर्णय, दि. ११.०९.१९९६)

11(आ) कमाल वयोमर्यादा वयाच्या ४५ वर्षा पर्यंत च्याच उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असेल. त्यामुळे प्रतिक्षा सूचीतील उमेदवारांना वयाच्या ४५ वर्षांपर्यंत नियुक्ती न मिळाल्यास त्यांची नावे वयाची ४५ वर्ष पूर्ण होताच आवश्यक ती नोंद घेऊन प्रतीक्षासूचीतून काढून टाकण्यात यावीत. (शासन निर्णय, दि २२.०८.२००५ शासन निर्णय दि. ६.१२.२०१०)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

12 (अ) पात्र नातेवाईकाची शैक्षणिक अर्हता व निम्न वयोमर्यादेनुसार त्याला गट-क किंवा गट-ड मधील पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय राहील. (शासन निर्णय, दि. २६/१०/१९९४)

12 (आ) संबंधीत पदांसाठी विहीत शैक्षणिक पात्रता आणि निम्न वयोमर्यादा याबाबतच्या अटी या नेमणूकांसाठी कटाक्षाने पाळण्यात येतील. (शासन निर्णय, दि. २६/१०/१९९४)

12(इ) तथापि, दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी शैक्षणिक पात्रते व्यतिरिक्त इतर अटी पूर्ण करीत असल्यास तिच्या बाबतीत गट-ड मध्ये नेमणूकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करण्याचे अधिकार संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याला असतील. (शासन निर्णय, दि. २६/१०/१९९४)

12   (प )  गट-ड च्या प्रतिक्षासूचीतून गट-क च्या प्रतिक्षासूचीत नाव वर्ग करणेबाबत :- गट-ड च्या प्रतिक्षासूचीवरील उमेदवाराने गट-ड च्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्यापूर्वी जर गट-क पदासाठी आवश्यक असणारी वाढीव शैक्षणिक अर्हता प्राप्त केली व त्यानुसार त्याने गट-क च्या प्रतिक्षासूचीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज केल्यास, त्याचे नाव गट- ड च्या प्रतिक्षासूचीतून वगळून गट-क च्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करावे. यासाठी गट-ड च्या प्रतिक्षासूचीतील उमेदवार गट-क साठीची शैक्षणिक अर्हता धारण केल्याच्या आवश्यक त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह परिपूर्ण अर्ज ज्या दिनांकास नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे करेल त्या दिनांकास त्याचे नाव गट-क च्या प्रतिक्षासूचीत समाविष्ट करण्यात यावे व गट-ड च्या प्रतिक्षासूचीतून त्याचे नाव वगळण्यात यावे. (शासन निर्णय क्रमांक: अकंपा-१२२२/प्र.क्र.९६/का-८ दि:19/09/2022.)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना व लिपिक-टंकलेखक परीक्षा-२०२३ च्या शिफारशींच्या अनुषंगाने नियुक्ती देताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः अकंपा-१२२५/प्र.क्र.१९४/म.लो.आ. हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दिनांक : ११ सप्टेंबर, २०२५

13 (अ) अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना विहीत वेगमर्यादेचे टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासन निर्णय, दि. ०६.१२.२०१० अन्वये ६ महिने असलेली मुदत वाढवून ती २ वर्ष इतकी करण्याची मुभा

६ महिन्याच्या कालावधित सदर प्रमाणपत्र सादर न केल्याने ज्या उमेदवारांच्या लिपीक- टंकलेखक पदावरील सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत त्यांनाही लिपीक-टंकलेखक पदावरील नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षात सदर प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा (शासन निर्णय, दि. २०.०५.२०१५)

13 (आ) कोणत्याही कारणास्तव दोन वर्षापेक्षा अधिक मुदतवाढ अनुज्ञेय असणार नाही. हा कालावधी संपताच नियुक्ती संपृष्टात आणावी. (शासन निर्णय, दि. २३/०८/१९९६)

शासन निर्णय क्रमांक: अकंपा-१२२१/प्र.क्र. ९८/का-८ दि:23-06-2021. अन्वये  दि 08-09-1997 चा शासन निर्णय अधिक्रमीत करुन, अनुकंपा तत्वावर लिपिक टंकलेखक पदावर नियुक्त कर्मचाऱ्याने टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा अनुकंपा तत्वावर लिपिक-टंकलेखक, गट-क या पदावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याने, नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. तथापि, दोनवर्षाच्या विहित मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर न केल्यास, त्याची सेवा समाप्त न करता, अशा कर्मचाऱ्यास विहित मुदतीनंतर टंकलेखन प्रमाणपत्र सादर करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहणार नाही.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

अनुकंपा तत्वावर गट-क मधील लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर टंकलेखनाची विहीत वेग मर्यादेची परीक्षा पास होऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्या सेवा संपृष्टात आणल्या आहेत, अशा उमेदवारांचा गट-ड मधील नियुक्तीसाठी पदांची उपलब्धता विचारात घेऊन नव्याने नियुक्ती देण्याबाबत विचार करण्यात यावा. मात्र अशा रीतीने गट-ड मधील पदावर नियुक्ती स्विकारल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत गट-क मधील पदासाठी त्याचा विचार करता येणार नाही, ही बाब त्यांना नियुक्तीपूर्वी स्पष्ट करावी. (शासन निर्णय, दि.०८.०९.१९९७) (शासन निर्णय , दि, 23-6-21

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions-GR) आणि परिपत्रके (Circulars-CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी,कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

माहिती तंत्रज्ञान संचालनालय, यांच्याकडून शासन सेवेतील गट-क मधील (वाहन चालक वगळून) संबंधित पदाकरीता महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/व वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम, १९९९ च्या नियम ३ अन्वये आवश्यक अर्हता म्हणून अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

15 अ) D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C.’ किंवा ‘O’ स्तर किंवा ‘A’ किंवा ‘B’ किंवा ‘C’ स्तर पैकी कोणतेही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा,

15ब) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र संगणक ज्ञानाची वरील किमान अर्हता अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या वेळी धारण करीत नसलेल्या उमेदवारांना सदर अर्हता गट-क मधील पदावर (वाहन चालक वगळून) अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.( शासन निर्णय, दि. २४.०९.२००१)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

गट-क मधील पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र असणा-या कर्मचा-याला पदाच्या उपलब्धते अभावी गट-ड मधील पदांवर नियुक्ती दिल्यास पद उपलब्ध होताच गट-क मधील पदावर त्याला नियुक्ती देण्यात यावी. अशी नियुक्ती सरळसेवा नियुक्तीने भरण्यात येणा-या पदांवरील समजण्यात यावी (शासन निर्णय, दि. २३.०८.१९९६)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

17 (अ) अनुकंपा नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय  कडील सामायिक प्रतीक्षा सूची बरोबरच संबंधित नियुक्ती प्राधिका-यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राकरिता गट-क व गट-ड करीता प्रतिक्षासूची ठेवण्याची दुहेरी प्रतीक्षासूचीची कार्यपध्दती अंमलात आणावी. (शासन निर्णय, दि २२.०८.२००५)

17(आ) गट-क व गट-ड मधील पदांवरील नियुक्तीसाठी सक्षम नियुक्ती प्राधिकारी (कार्यालय किंवा विभाग प्रमुख इत्यादी) त्यांच्या कार्यक्षेत्रातील उपलब्ध गट-क व गट-ड च्या रिक्त पदांवर पदांसाठी विहीत अटी व शर्ती पूर्ण करणा-या उमेदवारांना त्यांच्याकडील प्रतीक्षा सूचीतील क्रमानुसार नियुक्ती करु शकतील. (शासन निर्णय, दि २२.०८.२००५शासन परिपत्रक दि.05.02.2010)

17(इ)बृहन्मुंबईतील नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्याकडील गट-क च्या प्रतीक्षासूची/नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासन विभाग यांना कळवावे. (शासन निर्णय, दि २२.०८.२००५)

17 (ई) जिल्हाधिका-यांकडे समन्वयाच्या कामासाठी ठेवलेल्या सामायिक प्रतीक्षासूचीत जिल्हातील विविध कार्यालयांकडून येणारी नवीन नावे मूळ कार्यालयांच्या प्रतीक्षासूचीत समाविष्ट केलेल्या दिनांकानुसार गट-क व गट-ड च्या सामायिक प्रतीक्षासूचीत समाविष्ट करावीत. (शासन निर्णय, दि २२.०८.२००५)

17(उ) ज्या कार्यालयात अनुकंपाधारक नियुक्तीच्या प्रतीक्षेत नाहीत, परंतु गट-क किंवा गट-ड मध्ये रिक्त पदे उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांच्याकडे वर्षात रिक्त झालेल्या/होणा-या गट-क व गट-ड मधील पदांपैकी विहीत केलेल्या ५ टक्के पदे (१०% शासन निर्णय दि. १.३.२०१४)

मागणीपत्रे पाठविताना संबंधित कार्यालयाने त्यांच्याकडे संबंधित पदांवर नियुक्ती देण्यासाठी अनुकंपा धारक त्या कार्यालयास उपलब्ध नाहीत असे प्रमाणित करावे. (शासन निर्णय, दि २२.०८.२००५)

17(ऊ) सर्व जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक ६ महिन्यांनी जानेवारी आणि जुलै मध्ये त्यांच्याकडील सामायिक प्रतीक्षासूचीचा आढावा घेऊन दरम्यानच्या कालावधित नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांची नावे वगळून त्यांच्याकडील सामायिक प्रतीक्षासूची अद्ययावत करतील. (शासन निर्णय, दि २२.०८.२००५)

17(ए) जिल्हाधिकारी कार्यालयांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालयात उपलब्ध होणाऱ्या पदांवर नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सामायिक प्रतिक्षासूचीतील अनुकंपा धारकांची नियुक्तीसाठी शिफारस करावी. (शासन परिपत्रक दि.०५.०२.२०१०)

17(ए) शासन निर्णय, दि. २२.०८.२००५ नुसार प्रतिवर्षी रिक्त होणा-या पदांच्या ५ % (१० % शासन निर्णय दि.१.३.२०१४) पदे अनुकंपा नियुक्तीने भरावयाची आहेत. नियुक्ती प्राधिका- यांकडे असलेल्या विभागाच्या/कार्यालयाच्या प्रतीक्षासूचीवरील उमेदवारांसाठी अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी रिक्त जागा उपलब्ध असल्यास त्यानुसार नियुक्ती करावी. (शासन परिपत्रक दि.०५.०२.२०१०)

17(ओ) गट ड करीता नियुक्ती प्राधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र एकापेक्षा अनेक जिल्हयात असल्यास वरीलप्रमाणेच कार्यपध्दती अनुसरण्यात यावी. (शासन परिपत्रक दि.०५.०२.२०१०)

अनुकंपा तत्वावर नियुक्त्या जलदगतीने होण्यास सहाय्य्यभुत म्हणून अनुकंपा नियुक्तीची प्रमाणित कार्यपधती प्रसिद्ध करणेबाबत   साप्रवि शा नि, अकंपा-१२२१ /प्र क्र१८६ /का ८  दि २६/०८/२०२१

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

सर्व जिल्हाधिकारी/नियुक्ती प्राधिकारी  यांनी त्यांच्या कार्यालयातील अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षासूचीवर (सामायिक/स्वतंत्र) असलेल्या उमेदवारांची नावे व इतर माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्र ‘ङ’ मधील नमून्यात कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करावी (शासन परिपत्रक, दि. 15-05-2010)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

19(अ) शासन निर्णय दि. २२.०८.२००५ अन्वये विहीत करण्यात आलेल्या अनुकंपा नियुक्तीसाठी गट-क आणि गट-ड मध्ये प्रती वर्षी रिक्त होणा-या ५% मर्यादेमध्ये वाढ करुन ती गट-क व गट-ड मधील प्रती वर्षी रिक्त होणा-या पदांच्या १०% इतकी करण्यात आली आहे. (शासन निर्णय, दि. ०१.०३.२०१४)

19() अनुकंपा तत्वावरील पदे सन २०१२ या भरती वर्षापासून गट-क आणि गट-ड मधील प्रती वर्षी रिक्त होणा-या पदांच्या १०% मर्यादेत भरण्याची कार्यवाही (शासन पूरक पत्र, दि. ०२.०५.२०१४)

19(इ) शासन निर्णय, दि.०१.०३.२०१४ अन्वये अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीवर्षी रिक्त होणा-या पदांच्या १०% ची असलेली मर्यादा दि.०१.०३.२०१५ पासून पुढे २ वर्ष (दि २८.०२.२०१७ पर्यंत) चालू होती. सदर १०% च्या मर्यादेस दि.०१.०३.२०१७ पासून पुढे दोन वर्ष (दि. २८.०२.२०१९ पर्यंत) मुदतवाढ देण्यात आली आहे.

तथापि शासन निर्णय, वित्त विभाग दि.०२.०६.२०१५ व दि.२३.०९.२०१५ अन्वये पदभरतीवर असलेले निबंध विचारात घेता, प्रस्तुत निबंध असेपर्यंत गट-क व गट-ड संवर्गातील एका वर्षात भरण्यास मान्यता असलेल्या रिक्त पदांच्या १०% पदे ही अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावीत.(शासन निर्णय, दि. २८.१०.२०१५ व दि.०३.०५.२०१७, साप्रवि शा नि, अकंपा-१२१८/प्र क्र०१/आठ, दि १५/०२/२०१८ व दि ११/०९/२०१९)

अनुकंपा तत्वावर २० टक्के पदे भरण्याच्या मर्यादेस दि ३१/१२/२०२४ पर्यंत मुदत वाढ देणेबाबत  शासन निर्णय दि २२/१२/२०२१

19 () निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली, ह्या कार्यालयात शासन सेवेत असताना दिवंगत झालेल्या गट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत. (शासन निर्णय, दि. 03-11-2008)

19(उ) कार्यालयामध्ये रिक्त पदांची संख्या १० पेक्षा कमी असल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी अनुसरावयाची कार्यपध्दतीः

नियुक्ती प्राधिका-यांकडे त्याच्या नियंत्रणाखालील कार्यालयात गट-क व गट-ड मध्ये प्रतिवर्षी २० किंवा त्या पटीत किंवा त्यापेक्षा अधिक पदे रिक्त होत असतील, तर त्यांनी प्रचलित नियमाप्रमाणे ५% (१०% शासन निर्णय, दि.०१.०३.२०१४) नुसार पदे अनुकंपा नियुक्तीने भरावीत.

त्याखेरीज बृहन्मुंबईतील गट-ड वर्गाच्या अनुकंपा नियुक्ती- आस्थापनांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांना करावी. (शासन निर्णय, दि. ०१.०१.२००८)

19(ऊ) अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी दि २२.०८.२००५ पूर्वी प्रतिक्षासूचीत असलेल्या पात्र उमेदवारांना शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात

19(ऊ) १. शासकीय कार्यालयातील आस्थापनेवर गट-क व गट-ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षासूचीमधील, दि.२२.८.२००५ पूर्वीच्या उमेदवारांना दि. २२.०८.२००५ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेली रिक्त पदांच्या ५% ची मर्यादा (१०% शासन निर्णय, दि.०१.०३.२०१४) लागू राहाणार नाही.

19(ऊ)२. प्रतीक्षासूचीवर असलेल्या दि.२२.०८.२००५ पूर्वीच्या उमेदवारांना शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या/होणाऱ्या पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती, आदेशाच्या दिनांकापासून तीन वर्षात टप्प्याटप्प्याने देण्यात यावी. तीन वर्षात टप्प्या-टप्प्याने नियुक्ती करताना दि.२२.०८.२००५ पूर्वीच्या प्रतीक्षायादीतील उमेदवारांपैकी ५०% उमेदवारांची नियुक्ती पहिल्यावर्षी, २५% उमेदवारांची नियुक्ती दुसऱ्या वर्षी व उर्वरित २५% उमेदवारांची नियुक्ती तिसऱ्या वर्षी करण्यात यावी.

19(ऊ) ३. अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उपरोक्त (अनुक्रमांक (ऊ) (१) व (२) मधील) आदेशाची अंमलबजावणी करताना दि.२२.०८.२००५ पूर्वीच्या उमेदवारांना तीन वर्षात टप्या-टप्याने नियुक्ती देण्याकरिता नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे तितकी पदे उपलब्ध नसल्यास, त्यांनी अशा उमेदवारांना, सामायिक प्रतीक्षा सूचीतून अन्य कार्यालयात नियुक्ती देण्याची विनंती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी.

सरळसेवेने गट-क व गट-ड ची रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिरात देण्यापूर्वी दि.१.१.२००८दि.२३.४.२००८ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आल्याची खात्री करुन उर्वरीत पदांकरीता जाहिरात देण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकारी यांची संमती मिळवणे आवश्यक राहील.

जाहिरात देण्याकरीता प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यावर दि.२२.०८.२००५, दि.१.१.२००८दि.२३.४.२००८ च्या शासन निर्णयातील तरतुदींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या उमेदवारांना अनुकंपा नियुक्तीकरीता त्यांच्या जिल्ह्यात रिक्त असलेली पदे भरण्याकरीता जिल्हाधिकारी शिफारस करतील (शासन परिपत्रक, दि.०५.०२.२०१०)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी वर्षभरात रिक्त होणाऱ्या पदांच्या ५% (१०% – शासन निर्णय, दि.०१-०३-२०१४) पदे अनुज्ञेय असून, दि.१३.०६.२००३ च्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्ती करतांना मागासवर्ग/ अमागासवर्ग अशा भेदाभेद न करता प्रतिक्षासूचीवरील ज्येष्ठतेनुसार नियुक्ती देण्याचे निदेश देण्यात आले आहेत. दि. २३.०४.२००८ च्या शासन निर्णयान्वये दि. २२/०८/२००५ पूर्वीच्या प्रतिक्षासूचीवरील उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी ५% (१०% शासन निर्णय, दि.०१.०३.२०१४) अट नाही.

20 अ) मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या पदावर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराची नियुक्ती करता येणार नाही.

20 ब) प्रतीक्षासूचीत कनिष्ठ क्रमांकावर मागास प्रवर्गाचा उमेदवार असला तरी त्यास जेष्ठता क्रम डावलून खुल्या प्रवर्गाच्या जेष्ठ उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी आरक्षित पदावर नियुक्ती देता येणार नाही.

20 क) सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळविताना त्यामधील आरक्षित पदे किती आहेत व ती कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत, याचा स्पष्ट उल्लेख करावा. (शासन निर्णय दि.13-10-2010)      

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

कर्मचा-याच्या मृत्यूनंतर त्याच्या पात्र कुटुंबियांचे नांव अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षासूचीमध्ये घेतल्यानंतर त्याच्याऐवजी अन्य पात्र वारसदाराचे नाव प्रतीक्षासूचीमध्ये घेतले जात नाही. म्हणजेच प्रतीक्षासूचीमधील नाव बदलण्याची तरतूद सध्याच्या धोरणात नाही. परंतु प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचेच निधन झाल्यास प्रतीक्षासूचीतील उमेदवाराऐवजी त्याच्या कुटुंबातील अन्य पात्र वारसदाराचे नाव अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षासूचीमध्ये मूळ उमेदवाराच्या प्रतीक्षासूचीतील दिनांकाला घेतले जाईल. [मात्र नव्या उमेदवाराचे वय सदर दिनांकाला १८ वर्षापेक्षा जास्त असावे. जर नव्या उमेदवाराचे वय मूळ उमेदवाराच्या प्रतीक्षासूचीतील दिनांकास १८ वर्षापेक्षा कमी असेल तर, नव्या उमेदवाराचे नाव त्याला ज्या दिवशी १८ वर्ष पूर्ण होतील त्या दिनांकास घेण्यात यावे. (शासन निर्णय दि. २०/०५/२०१५)]

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

22 (अ) प्रचलित अनुकंपा नियुक्ती योजनेतील अटी व शर्ती तसेच पात्रतेचे निकष शिथील करुन एक खास बाब म्हणून दि. २६.११.२००८ ते २९.११.२००८ या कालावधित शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांपैकी एकाच व्यक्तीस त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेऊन गट-क व गट-ड प्रमाणेच शासन सेवेतील गट-ब किंवा गट-अ मधील सरळसेवेच्या कोट्यातील प्रथम टप्प्यावरील पदांवर नियुक्ती देण्यास शासन मान्यता देत आहे. (शासन निर्णय, दि. २०.०१.२००९)

22(आ) अनुकंपा तत्वावरील नियुक्ती संदर्भातील इतर तरतूदी कायम राहतील. त्यामुळे शहीद झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्ती सज्ञान असल्यास त्यांनी पोलीस अधिकारी/कर्मचारी शहीद झाल्याच्या दिनांकापासून एका वर्षात अर्ज करणे आवश्यक राहील. तसेच त्यांच्या पात्र कुटुंबियांपैकी कोणीही व्यक्ती सज्ञान नसल्यास त्या कुटुंबियांमधील पात्र व्यक्तीने सज्ञान झाल्यानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहील.

तथापि पात्र कुटुंबियांतील ज्यांना गट-ब किंवा गट-अ पदावरील नियुक्तीकरिता अर्ज करावयाचा आहे, त्यांच्याबाबतीत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा २५ वर्षापर्यंत राहील. (शासन निर्णय, दि. २०.०१.२००९ व दि.१३.११.२००९) आयोगाच्या कक्षेतील गट-ब किंवा गट-अ पदावर नियुक्ती देण्यापूर्वी अशा प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहील. (शासन निर्णय दि. २०.०१.२००९)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यकक्षेतील “अनुकंपा नियुक्ती” या विषयाशी संबंधीत कोणताही प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणण्यापूर्वी तो सामान्य प्रशासन विभागाला दाखविणे व अशा कोणत्याही प्रस्तावामध्ये सामान्य प्रशासन विभागाच्या अभिप्रायांचा समावेश मंत्रिमंडळ टिप्पणीमध्ये करणे सर्व प्रशासकीय विभागांना याद्वारे बंधनकारक करण्यात येत आहे. (शासन परिपत्रक, दि. ०५.०३.२०११)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निर्णयानुसार अनुकंपा तत्वावरील नियुक्ती हा कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचा “वारसा हक्क” होत नाही. तसेच विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय राहत नाही. (शासन निर्णय, दि. २२.०८.२००५)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ अन्वये अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत शासकीय कर्मचा- यांच्या विधवांना केवळ गट-ड मधील पदावर नियुक्ती करावयाची असल्यास शैक्षणिक अर्हता शिथील करण्याबाबतची तरतुद आहे. याव्यतिरिक्त अन्य कोणतीही अट शिथील करण्यास शासन सक्षम नाही असा स्पष्ट उल्लेख शासन निर्णय, दि. २६.१०.१९९४ मध्ये करण्यात आला आहे.

केवळ गट-ड मधील नियुक्तीसाठी कर्मचा-यांच्या विधवांना शैक्षणिक अर्हतेत जी शिथीलता दिली जाते ती वगळता अन्य कोणत्याही अटी व शर्ती शिथिल करण्याचे प्रस्ताव विभागांनी विचारात घेऊ नयेत. (शासन परिपत्रक, दि. २९.१०.२००३)

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

अनुक्रमांक ३. (१२) (इ) मध्ये नमूद केलेल्या अटी व्यतिरिक्त कोणत्याही अटी शिथील करण्याची शक्ती शासनाकडे राहणार नाही.

कंत्राटी ग्रामसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती  ग्राविवि. शानि अकंपा-२०१४/प्रक्र    २६/आस्था-९/ दि २०/०८/२०१५ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

जिल्हा परिषद सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणे बाबत  ग्रावि व जलसंधारण वि शा नि क्र नोटीस-२००९/ प्रक्र १५५/ आस्थ-९ दि ०६/०७/२०१०

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दती. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 20-01-2016 सांकेतांक क्रमांक 201601201535561421 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक-विपसू-२००७/(१५७/०७)/माशि-२ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२. दिनांक :- १० एप्रिल, २००७. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मान्यताप्राप्त खाजगी शाळेंतील शिक्षकेत्तर पदे सुधारीत आकृतीबंधाच्या अधीन राहून केवळं तात्पुरत्या स्वरुंपात भरण्यास मंजूरी देणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 06-02-2004 20081218115747001 अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या खाजगी ( अनुदानित व विनाअनुदानित) शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 31-12-2002 सांकेतांक क्रमांक 20090423121902001

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

आपला अमुल्य अभिप्राय नोंदवावा

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे. या post मध्ये, आम्ही आपणाला अनुकंपा संबधित शासन निर्णय माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या सहकारी यांना शेअर करु शकता पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते.
,
You Might Be Interested In

You may also like

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166103

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions