१. औषधे व औषधी साहित्य भांडार व्यवस्थापन :-
सविस्तर व अधिकृत माहितीसाठी दिनांक १४-१०-२०२४ Pdf down load करून घ्यावी..
अ) सर्वसाधारण बाबी :-
1 )औषध भांडारात औषधांची मांडणी Category wise करावी व बिन कार्डस् माहिती भरून अद्ययावत उपलब्ध असावेत.
2) औषध भांडारात Essential Medicine औषधांचा साठा तीन महिने पुरेल एवढा असावा. त्यात मुख्यत्वे करून ASV, ARV & Emergency Medicines चा समावेश असावा.
3) औषधांचे Stock Book, Expiry Date Register तसेच Daily Tablet Register परिपूर्ण असावे.
4) औषध भांडारामध्ये प्रवेश नियंत्रित असावा जेणेकरून औषधांच्या चोरीस व गैरवापरास आळा बसू शकेल.
5) औषध भांडारात इंटरनेट सुविधेसह संगणक असावा, जेणेकरून औषधांबाबतची माहिती त्वरीत वरिष्ठ कार्यालयास सादर करणे सोयीचे होईल.
6) सद्यस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रूग्णालये आणि आरोग्य संस्थांमधील उपलब्ध औषधीसाठ्याचे नियंत्रण करणेसाठी ई-औषधी प्रणाली विकसीत करण्यात आलेली आहे. त्यासाठी विभागांतर्गत सर्व रूग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत Login Credential देण्यात आलेले
आहेत. सदर प्रणालीचा अवलंब करून प्रत्येक रूग्णालय व आरोग्य संस्थेमध्ये राज्यस्तर व जिल्हा स्तरावरून पुरवठा केल्या जाणा-या तसेच स्थानिक स्तरावरील खरेदी मार्फत प्राप्त सर्व औषधींच्या नोंदी ई-औषधी प्रणालीमध्ये घेणे व त्या अद्ययावत करणे आवश्यक आहे.
7) औषध निर्माण अधिकारी यांनी नियमितपणे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक/ वैद्यकिय अधिक्षक/वैद्यकिय अधिकारी यांनी आठवड्यातून एक वेळा ई-औषधी प्रणालीमध्ये लॉग ईन करून ई-औषधी प्रणाली अद्ययावत असल्याची खातरजमा करावी.
8) कालाबाह्य व अप्रमाणित औषधांसाठी वेगळी जागा किंवा रॅक उपलब्ध असावी व सदर जागेत ठळक अक्षरांत कालबाह्य औषधे व अप्रमाणित औषधे असे फलक तयार करून ठेवण्यात यावेत.
9) उपलब्ध औषधांचे नियोजन FEFO (First Expiry, First Out) या पद्धीतीने करावे.
10) औषधांचे पार्सल ४८ तासांच्या आत उघडले जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
11) अग्नीरोधक उपकरण उपलब्ध असावेत तसेच सदरील अग्नीरोधक उपकरण हाताळण्याबाबत कर्मचारी
प्रशिक्षित असावेत. Maharashtra Fire Prevention and Life Safety Measures Act २००६ नुसार फायरऑडीट करून आवश्यक कार्यवाही करणे.
12) औषध भांडारात पुरेशा प्रमाणात पंखे, वातानुकूलित यंत्रणा, फार्मास्युटिकल रेफ्रिजरेटर, डिप फ्रिजर, बॉटल कुलर्स उपलब्ध असावेत. १४.
१३. मुख्य विद्युत पुरवठा स्त्रोत नियमितपणे होत नसल्यास, तेथील शीत कक्ष व रेफ्रिजरेटरसाठी सौर जनक (जनरेटर) किंवा इतर पर्यायी सुविधेचा अवलंब करावा व जनरेटर मशीन व्यवस्थितरीत्या चालू रहाणेसाठी महिन्यातून किमान एक वेळ जनरेटरचा वापर करावा.
14) औषध भांडारातील औषधी व औषधी साहित्यांचा वाळवी, किटक व अन्य उपद्रवी जीवांपासून होणारा उपद्रव टाळण्याकरीता आवश्यकतेनुसार नियमितपणे औषध भांडाराची साफसफाई करून वर्षातून किमान एकदा पेस्ट कंट्रोल करून घ्यावे तसेच इतर आवश्यक त्या उपाययोजना करून ध्याव्यात.
ब) औषध भांडारातील प्रमाणपत्रे व इतर नोंदी :-
Pharmacy Officer चे Maharashtra Pharmacy Council कडील नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध असावे. औषध भांडारासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक असणा-या परवानग्या व नोंदणी प्रमाणपत्रे उपलब्ध असावीत. तसेच स्टेट एक्साईज डिपार्टमेंटकडील स्पिरीट खरेदीसाठी लागणारे लायसन्स उपलब्ध असावे.
अन्न व औषध प्रशासनाकडून तपासल्या जाणा-या औषधांचे रेकॉर्ड तसेच सदोष आढळलेल्या औषधांबाबत कलेल्या कार्यवाहीची नस्ती उपलब्ध असावी.
रूग्णालयाकडून औषधे, कन्झुमेबल्स, डिस्पोजेबल्स, लॅब मटेरीयल्स व रिएजंट्स खरेदी केले असल्यास Bill Register and Purchase Order Register, Supply Orders उपलब्ध असाव्यात.
क) इतर बाबी :-
औषध भांडारामध्ये उपलब्ध असलेली औषधे, कन्झुमेबल्स, डिस्पोजेबल्स, लॅब मटेरीयल्स व रिएजंट्स यांची यादी बाह्यरूग्ण विभाग, वॉर्डस्, प्रयोगशाळा, शस्त्रक्रिया गृह, रक्तपेढी येथे नियमितपणे तपासणी करावी.
रूग्णालयातील विविध कक्षांना औषधे, कन्झुमेबल्स, डिस्पोजेबल्स, लॅब मटेरीयल्स व रिएजंट्स च्या वाटपाच्या दिवसांचे वेळापत्रक ठरवून त्याप्रमाणे वाटप करावे व स्टॉक रजिस्टर व इंडेट बुक अद्ययावत असावे.
औषधे प्राप्त झाल्यावर प्रमाणित देयके कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी सादर करावीत.
औषध भांडारातील रिकामे कॅन्स व बॉक्सेस यांची विल्हेवाट विहीत पद्धतीने होईल, याची दक्षता घ्यावी.
रूग्णांना वैद्यकिय अधिका-यांनी लिहून दिलेली औषधे, औषध वितरण विभाग (बाह्यरूग्ण) कडून बरोबर दिले
किंवा. कसे ? याबाबत वैद्यकिय अधिकारी/ निवासी वैद्यकिय अधिकारी (चिकित्सा) यांनी रँडम तपासणी
करावी.
काल बाह्य / अप्रणीत तसेच खराब झालेल्या औषधे, औषधी साहित्याची विल्हेवाट लावणेबाबत Regarding the disposal of expired/unusable as well as damaged medicines and medicinal supplies

- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उद्योग विभाग
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कायदे व अधिनियम
- कार्यालयीन मार्गदर्शिका
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- कृषी सेवा
- गृह अधिनियम
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जि प- पं. स अधिनियम
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- न.पा- मनपा- नगररचना
- नगरविकास विभाग
- नोकरी विषयी
- नोंदणी व मुद्रांक
- पशूसंवर्धन विभाग
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- भूजल सर्वेक्षण
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महसूल- अधिनियम
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र नागरी सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- महिला व बालविकास विभाग
- महिला व बालविकास विभाग
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- वित्तीय अधिनियम
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- वैद्यकीय अधिनियम
- शालेय शिक्षण
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- शैक्षणिक अधिनियम
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सामान्य प्रशासन
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Error: Contact form not found.