Friday, July 25, 2025
Friday, July 25, 2025
Home » दुय्यम सेवापुस्तक  

दुय्यम सेवापुस्तक  

0 comment

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती ) नियम १९८१ नियम ४५ नुसार सेवापुस्तक व सेवा पट यांची पडताळणी प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यात कार्यालय प्रमुख यांनी करावे.

सेवापुस्तकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचा-यांना देण्याबाबत वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक २३-०७-२०१३

महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम ३६ व ३७ मध्ये काही अपवाद वगळता प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यासंबंधात विहित नमून्यात सेवा पुस्तक / सेवा पट विनामूल्य दोन प्रतीमध्ये ठेवण्याची तसेच सेवापुस्तकाची एक प्रत कार्यालय प्रमुखाच्या अभिरक्षेत ठेवण्याबाबत व त्यामध्ये सर्व नोंदी यथोचितरीत्या करुन त्या साक्षांकित करण्याची व दुसरी प्रत संबंधित शासकीय कर्मचाऱ्याला देण्याबाबत व त्यामध्ये नोंदी घेऊन त्या साक्षांक्षित करण्याबाबत वरील नियम ३६ खालील सूचनामध्ये तरतूद करण्यात आली आहे. तसेच सेवाभिलेख सुस्थितीत ठेवण्याबाबत वरील नियमातील नियम ३५-४९ मध्ये तरतूद करण्यात आली आहे. सेवापुस्तक/सेवापट हा जतनीय दस्तऐवज असल्याने उपरोक्त तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत संदर्भाधिन शासन परिपत्रक दि. २८.४.१९८७ व दि.११.११.१९९७ अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, बऱ्याच कार्यालयाकडून सेवा पुस्तकाची / सेवा पटाची दुसरी प्रत कर्मचाऱ्यांना देण्यात येत नाही. तसेच दुसरी प्रत उपलब्ध करुन दिली तरी ती वेळोवेळी अद्ययावत व साक्षांकित करुन कर्मचाऱ्यांना देण्यात येत नसल्याचे तसेच सेवाअभिलेख सुस्थितीत ठेवली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास / दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबास निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्तीवेतनविषयक लाभजसे, निवृत्तीवेतन, वेतन थकबाकी रजा रोखीकरण इत्यादि लाभ प्रदान करण्यास विलंब होतो, तसेच सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ जसे, कालबध्द पदोन्नती इ. लाभ मिळण्यास विलंब होतो. यास्तव हे लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्याकडून मा. लोक आयुक्त / उप लोक आयुक्त यांचेकडे तक्रारी दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सेवापुस्तकाचे संगणकीकरण करण्याबाबत मा. उप लोकआयुक्त यांनी स्वाधिकारे सुरु   केलेल्या चौकशी प्रकरणी अलीकडेच झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना सेवापुस्तकाची दुय्यम प्रत देण्याबाबत वित्त विभागाने आदेश काढावेत, असे निर्देश दिले आहेत. ही बाब विचारात घेऊन खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१. प्रत्येक नियुक्ती प्राधिकाऱ्याने त्यांच्या अधिपत्त्याखालील शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तकाची / सेवा पटाची दुसरी प्रत अद्यापि दिली नसल्यास त्यांना सेवा पुस्तकाची / सेवा पटाची दुसरी प्रत विनामूल्य देण्यात यावी व त्यामध्ये मूळ सेवापुस्तकातील नोंदीनुसार नोंदी घेऊन व साक्षाकिंत करुन देण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम ३६ खालील सूचनानुसार कार्यवाही करण्यात यावी. तसेच यापुढे त्यांच्या अधिपत्त्याखालील कर्मचाऱ्यांकडून सेवा पुस्तकाची / सेवा पटाची दुसरी प्रत प्रत्येक वर्षाच्या माहे फेब्रुवारी महिन्यात घ्याव्या आणि त्यामध्ये आवश्यक त्या नोंदी मूळ सेवा पुस्तकानुसार / सेवा पटानुसार घेऊन व त्या साक्षांकित करुन देण्याबाबत कार्यालय प्रमुखाने नियोजनात्मक आखणी करुन हे काम कालबध्दरित्या पूर्ण करण्यात यावे.
२. प्रत्येक कार्यालय प्रमुखाने त्यांच्या अधिपत्त्याखालील कर्मचाऱ्याच्या मूळ सेवा पुस्तकात /सेवा पटात वेळच्या वेळी नोंदी घेऊन त्या साक्षांकित करण्याची दक्षता घ्यावी.
३) सेवा पुस्तक / सेवा पट हा जतनीय दस्तऐवज असून मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ५२ खालील परिशिष्ट १७ नुसार सेवा पुस्तक / सेवा पट हे प्रदीर्घ कालावधीपर्यंत जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. यास्तव सर्व कार्यालय प्रमुख, प्रशासकीय अधिकारी/पर्यवेक्षीय अधिकारी व संबंधित कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयातील सेवाभिलेख सुस्थितीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम ३५ ते ४९ मधील तरतूदींचे यापुढे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी. तसेच वरील तरतूदीचे पालन होत नसल्याची बाब नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आल्यास त्यांनी संबंधित कसूरदार अधिकारी/ कर्मचारी यांचेवर जबाबदारी निश्चित करुन त्यांचेविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करावी.
२. सर्व कार्यालय प्रमुखांनी / प्रशासकीय अधिकाऱ्यांनी/पर्यवेक्षीय अधिकाऱ्यानी वरील सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी तसेच प्रशासकीय विभागांनी/कार्यालयानी सदर परिपत्रकाची प्रत कार्यालयातील सूचना फलकावर लावून वा अन्य मार्गाने सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

सेवा पुस्तक दुसरी प्रत वित्त विभाग, परिपत्रक क्र सेवाप-१०८७/४७४/सेवा-९ दि २८/४/१९८७

सेयर पुस्तक किंवा सेवा पत्र [ Service Rolls] अद्यावत ठेवाचे व त्याची दुसरी प्रत कर्मचा-यात प्राची अशी तरतूद महाराष्ट्र नागरी तेषा [तेवेच्या सर्पताधारण शर्ती) नियम, १९८१ च्या नियम २६ मध्ये मध्ये करण्यात आली आहे. परंतु बन्याथ कार्यालयांत तेषा पुस्तक / तेवा पत्रकाधी दूसरी प्रत कर्मचा-यास, विशेषतः चतुर्थ श्रेणीच्या कर्मचा-यांत देण्यात येत नाही, असे शासनाच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. रजा, वेतनातील वाद, निवृत्तिवेतन, निलंबन, बडतर्फी, शिक्षा, इत्यादी महत्त्वाच्या तेषा विषयक बाबींची नोंद तेवापुस्तकात असते व त्याबाबत कर्मचा-यांनी अत्यंत जागरखाने आवश्यक असते. ही गोष्ट लक्षात घेता, तेवा पुस्तक / सेवा पत्रकाची तरी मृत कर्मचा-यांत देण्याच्या व ती अद्यावत ठेवण्याच्या बाबतीत नियमांतील तरतुदीचे महत्त्व दिसून येईल. म्हणून प्रत्येक कार्यालयाने ज्या कर्मचा-यांना सेवा पुस्तकाची / पत्रकापी दूसरी प्रत अजून दिलेली नसेल तर तशी ती विनामूल्य प्राची. तलेय कर्मचा-यांकडील ह्या दूत-या प्रत्ती ठराविक कालांतराने त्यांच्याकडून घ्याव्यात आणि मूक सेवा पुस्तकातील नोंदीनुतार कर्मचा-यांत अद्यावत व ताधानित करून याव्यात, या बाथतीत तक्रारीत जागा राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

46990

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.