महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ( १४ फेब्रुवारी २०१७ पर्यत सुधारित ) The Maharashtra General Provident Fund Rules
महाराष्ट्र सर्वसाधारण निधी नियम १९९८ सामान्य प्रशासन विभाग दि 19/12/2015
प्रमुख पाजपाडून तूल करण्यात यईल.
३६ ब. भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याबाबतची कार्यपद्धती -
(अ) प्रत्येक वर्षी एप्रिल व ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये महालेखापाल कार्यालयाला एक अर्ध-वार्षिक विवरण सादर करण्यात येईल. प्रत्येक वर्गणीदाराला ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी अग्रिम रकमा किंवा काढलेल्या रकमा (ना-परतावा) दर्शविणारे पहिले अर्धवार्षिक विवरणपत्र प्रत्येक वर्षाच्या एप्रिल महिन्यात आणि एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या आगाऊ रकमा किंवा काढलेल्या रकमा दर्शविणारे दुसरे अर्धवार्षिक विवरणपत्र प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात महालेखापाल कार्यालयाला सादर करण्यात येईल. ही विवरणे परिशिष्ट "फ" मध्ये नमूद केलेल्या नमुन्यात दर्शविण्यात येतील. सर्व विभाग प्रमुख, आपापल्या कार्यालय प्रमुखांनी महालेखापाल कार्यालयास विहित कालमर्यादेत ही विवरणे सादर केली असल्याची खातरजमा करतील.
(ब) वर्गणीदारास मंजूर केलेली परतावायोग्य आगाऊ रक्कम किंवा काढावयाची रक्कम ही, वर्गणीदाराच्या खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा अधिक असणार नाही. आहरण व संवितरण अधिकारी किंवा मंजुरी प्राधिकारी अशा प्रत्येक प्रकरणाची शहानिशा करतील. अशा कोणत्याही प्रकरणात अनियमितता आढळून आल्यास, तिला जबाबदार असलेल्या व्यक्ती विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
(क) वर्गणीदाराचा भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम प्रदानासाठीचा अर्ज महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी, आहरण व संवितरण अधिकारी किंवा मंजुरी प्राधिकारी, त्या अर्जामध्ये वर्गणीदाराचा पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, निवृत्तीचा प्रकार नमूद केला असल्याची पडताळणी करील. शिवाय तो, वर्गणीदारास त्याच्या सेवानिवृत्ती लगतच्या शेवटच्या १२ महिन्यांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या अग्रिम रकमांचे विवरण विहित रकान्यात नमूद करील. जर सेवानिवृत्तीच्या दिनांका लगतच्या शेवटच्या बारा महिन्यांमध्ये अग्रिम मंजूर करण्यात आले नसेल तर, मंजुरी प्राधिकारी विहित रकान्यामध्ये "निरंक" असे नमूद करील.
५ (ड) आहरण व संवितरण अधिकारी भविष्य निर्वाह निधीच्या अनुसूच्यांमध्ये तसेच महालेखापाल कार्यालयाशी केल्या जाणाऱ्या सर्व पत्रव्यवहारामध्ये स्वतःचे नाव, पदनाम, दूरध्वनी क्रमांक, फॅक्स क्रमांक, ई-मेल पत्ता नमूद करील.
(इ) कार्यालय प्रमुखाच्या बाबतीत, वर्गणीदार म्हणून सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या रकमेच्या अंतिम प्रदानासाठी केलेला त्याचा अर्ज, त्याच्या स्वतःच्या सहीने महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्याऐवजी त्याला वरिष्ठ असलेल्या प्राधिकाऱ्याच्या सहीने पाठविण्यात येईल. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
गट ड च्या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे संगणकीय प्रणाली द्वारे ठेवणे तसेच कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीमधुन अग्रिम म्हणून रक्कम काढन्याची प्रकरणे ऑनलाइन पढ़तींने तयार करण्याबाबत वित्त विभाग दि 28/08/2014
दिनांक ०१/०९/२०१४ पासून पुढे गट ड च्या सर्व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवणे, अग्रीम मंजूर करणे इत्यादी करीता विकसीत करण्यात आलेल्या संगणक प्रणालीच्या वापरास शासन निर्णय दि.२२/०८/२०१४ च्या शासननिर्णयान्वये शासन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार यापुढे सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी गट ड च्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे संगणकीय प्रणालीद्वारेच ठेवणे आणि अग्रीमाबाबतची सर्व कार्यवाही संगणक प्रणालीमार्फतच करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय दि.२७/०८/२०१४ रोजीचा शासन निर्णय याद्वारे अधिक्रमित करुन दि.२२/०८/२०१४ रोजीच्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.
१. शासन निर्णयाच्या परिच्छेद ३ मधील दुसऱ्या ओळीतील दि.०१/०८/२०१४ ऐवजी दि.०१/०९/२०१४ असा वाचावा.
२. गट ड भविष्य निर्वाह निधी ही प्रणाली वापरण्याच्या कार्यपद्धतीबाबत सदर शासन -निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक ४ येथील पाचव्या व सहाव्या ओळीतील -दि.३१/०३/२०१३ ऐवजी दि.३१/०३/२०१४ असा वाचावा.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारासाठी ठेव सलंग्न विमा योजनेमधे सुधारणा ग्राम विकास विभाग दि 07-08-2013
वर्गणीदाराने मृत्यूलगतपूर्वीच्या ३ वर्षामधील जास्तीत जास्त कालावधी ज्या वेतनश्रेणीतील पदावर व्यतीत केला असेल त्या वेतनश्रेणीस वरीलप्रमाणे निश्चित केलेली किमान मर्यादा त्या वर्गणीदारास लागू होईल.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या 6 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा भविष्य निर्वाह निधीमधे जमा करण्यात येणारा जून २०१३मधील अंतिम हप्ता मार्च २०१४ मधे जमा करण्या संबधी वित्तविभाग दि 23/05/2013
२. उपरोक्त दि.२२ एप्रिल, २००९च्या अधिसूचनेतील नियम क्र.१५ नुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी प्रदानाची पद्धत विषद करण्यात आली आहे. सदर नियमानुसार दि.१ जानेवारी, २००६ ते दि.३१ मार्च, २००९ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत शासकीय कर्मचारी वेतनाची थकबाकी मिळण्यास पात्र असल्यास, सदर रक्कम पुढील पाच वर्षात समान हप्त्यात भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याचे निदेश आहेत. यासंबंधीच्या सुस्पष्ट / तपशीलवार सूचना
शासन निर्णय क्रमांकः वेपुर १२१३/प्र.क्र.१९/सेवा-९ परिपत्रक वित्त विभाग, क्र. वेपुर १२०९/ प्र.क्र.६९/ सेवा-९, दि.२९ एप्रिल, २००९ अ.क्र.१४ नुसार देण्यात आल्या आहेत.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
भविष्य निर्वाह निधीतील वर्गणीच्या /प्रदानांच्या गहाळ रकमाच्या लेखांकन तातडीने करणेबाबतभविष्य निर्वाह निधी दि 21-10-2012
दरवर्षी वर्गणीदारांना पाठविल्या जाणा-या भविष्यनिर्वाह निधीच्या वार्षिक लेख्यांमध्ये वर्गणीच्या/ प्रदानांच्या गहाळ रकमांची नोंद असते व त्याबाबत तात्काळ पूर्तता करण्याच्या सूचनाही सदर लेख्यामध्ये दिलेल्या असतात. तसेच वर्षातून दोनवेळा महालेखापालांच्या कार्यालयाकडून गहाळ रकमांची सूची सर्व आहरण व संवितरण अधिका-यांकडे कार्यवाहीस्तव पाठविण्यात येते. तथापि, संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून याबाबत पुढील कार्यवाही केली जात नाही. तसेच वर्गणीदारांकडूनही याबाबतचा पाठपुरावा केला जात नसल्यामुळे सन २००७ च्या आधीपासूनच्याही गहाळ रकमांच्या नोंदी न झाल्याचे महालेखापालांनी शासनाच्या निदर्शनास आणले आहे.
३. भविष्य निर्वाह निधी अग्रिमाच्या/प्रदानाच्या गहाळ रकमांचे प्रमाण कमी करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर निर्देश उक्त संदर्भ क्र.१ येथील दिनांक ३१/१०/२००७ च्या शासन परिपत्रकाद्वारे देण्यात येऊनही त्यातील निर्देशांनुसार संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडून तसेच कार्यालय प्रमुखांकडून आवश्यक कार्यवाही होत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे
४. भविष्य निर्वाह निधी अग्रिमाच्या/प्रदानाच्या गहाळ रकमांची नोंद संबंधित वर्गणीदारांच्या खात्यांमध्ये नियमितपणे होत नसल्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या वर्गणीदाराचे लेखे विहीत वेळेत प्रमाणित करणे शक्य होत नाही, ज्यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या अंतिम प्रदानास विलंब होतो व शासनास त्यावर व्याज प्रदान करावे लागते. ही अनियमितता व परिणामी होणारा विलंब टाळण्यासाठी या परिपत्रकान्वये पुन्हा सूचित करण्यात येते की, उक्त संदर्भ क्र. १ येथील दिनांक ३१/१०/२००७ च्या शासन परिपत्रकातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
महाराष्ट्र सर्वसाधारण निधी व अंशदायी भविष्य निर्वाह निधी भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग gpf दि 31.03.2012-fd
क्रमांक भनिनि. २०११/प्र.क्र. २/सेवा-६. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणा-या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणा-या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर २०११-२०१२ या वित्तीय वर्षाच्या दिनांक १ एप्रिल २०११ ते ३० नोव्हेंबर २०११ या कालावधीकरिता ८ टक्के (आठ टक्के) व दिनांक १ डिसेंबर २०११ पासून ८.६ टक्के (आठ पूर्णांक सहा दशांश टक्के) असा व्याजाचा दर ठरविण्यात आला आहे :-
(१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
(२) पटवा-यांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
(३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश),
(४) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद).अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्याबाबत माहिती वेबसाईट वर उपलब्ध असण्याबाबत भविष्य निर्वाह निधी दि 30-11-2011
सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांच्या सन २०१०-११ या वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या प्रधान लेखाकार कार्यालयातर्फे वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्मचारी किंवा आहरण व संवितरण अधिकारी वर्गणीदाराचा जन्मदिनांक, GPF Series आणि खाते क्रमांक नोंदवून भविष्य निर्वाह निधी खात्याबाबतची माहिती वेबसाईटवर पाहू शकतात. ही माहिती पुढील वर्षाच्या जमा रकमा अपलोड होईपर्यंत संपूर्ण वर्षभर पाहता येईल. सक्षम प्राधिका-यांनी वर्गणीदारास भविष्य निर्वाह निधी खात्यातून अग्रिम मंजूर करताना कर्मचा-याच्या वैयक्तिक खात्यातील जमा रक्कम पाहता येईल. जर एखादया कर्मचा-यास भविष्य निर्वाह निधीची वर्षिक स्लीप प्राप्त झाली नसेल तर, अशा कर्मचा-यास वरील वेबसाईटवरुन त्याची प्रत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराना संगणक विकत घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम (ना परतावा) काढण्यास मंजूरी देण्याबाबत भविष्य निर्वाह निधी नियम क्र १६ मधे सुधारणा भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 6.9.2011
राज्य शासनाने उक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांना महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम क्र.१६ नुसार सेवेची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक संगणक संच खरेदी करण्यासाठी काही अर्टीच्या अधीन राहून निधीमधून रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. सदर अटींमध्ये अट क्र.४ येथे वर्गणीदार ज्या पदावर कार्यरत आहे, त्या पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार संगणक वापराचे ज्ञान आवश्यक नाही, अशा पदांवरील वर्गणीदारांना संगणक अग्रिम अनुज्ञेय होणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे ज्या वर्गणीदारांच्या पदांच्या सेवा प्रवेश नियमानुसार संगणक वापराचे ज्ञान आवश्यक नाही, असे भविष्य निर्वाह निधी वर्गणीदार नियमातील सदरच्या तरतुदीनुसार निधीमधून रक्कम काढण्यास पात्र ठरत नव्हते. तथापि, सध्याचे युग हे संगणक युग आहे. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या स्वतःसाठी व त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसाठी संगणक वापराचे ज्ञान असणे व त्यामुळे घरी संगणक असणे ही बाब आवश्यक व गरजेची झालेली आहे.
२. उपरोक्त परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीमधून संगणक खरेदी करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याबाबतची संदर्भाधिन शासन निर्णयातील अनु, क्र. ४ येथील अट या शासन निर्णयान्वये काढून टाकण्यात येत आहे. परिणामी, ज्या वर्गणीदारांच्या पदाच्या सेवाप्रवेश नियमा नुसार संगणक वापराचे ज्ञान आवश्यक नाही अशा वर्गणीदारांना देखील (उदा. वर्ग-४ चे कर्मचारी) भविष्य निर्वाह निधीतून संगणक अग्रिम आता अनुज्ञेय राहाते.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
स्वियेत्तर सेवेतील शासकीय कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीत जमा करावयाच्या वर्गणी बाबत कार्य पढ़ती भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 18.7.2011
पत आह.
१) स्वीयंतर संबंतील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निवाह निधी खात्यात जमा करावयाच्या सर्व रकमा संबंधीत स्त्रीयंतर नियोक्त्यांने. भविष्य निर्वाह निधी लेखांकनासाठी विहित केलेल्या परिपूर्ण अनुसूचीसह थेट महालेखापाल १/२, मुंबई/नागपूर यांच्या कार्यालयात रेखाकिंत धनाकर्षाव्दारे अथवा स्थानिक रेखाकिंत धनादेशाव्दारे जमा करावी.
२) वरील कार्यपध्दतीचा अवलंब न करता अशा रकमा चलनाव्दारे बँकेत (कोषागाराशी निगडीत बँक) भरणा केल्यास चलनावर खातेदाराचा संपूर्ण तपशिल नमूद करावा. त्याचप्रमाणे चलनासोबत सर्व तपशील भरलेली भविष्य निर्वाह निधी खात्याच्या लेखांकनास विहित केलेली अनुसूची जोडण्याची दक्षता घ्यावी. हया तपशिलाअभावी रकमा खातेदाराच्या खात्यात उशीराने जमा झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत कायर्यालयाची तसेच संबंधीत कर्मचाऱ्याची राहील.
२. वरील कार्यपध्दतीचे संबंधीत स्वीयेतर नियोक्ता कार्यालयानी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेवरील व्याज दराबाबत भविष्य निर्वाह निधी दि 30.4.2011
१ एप्रिल, २०११ नंतर निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्यासंबंधात महालेखापाल कार्यालयाने, संबंधीत कर्मचाऱ्याच्य निवृत्तीच्या वेळी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीवर प्रचलीत असलेल्या व्याजदरानुसार त्याच्या भविष्य निर्वाह निधी खाती जमा असलेल्या रकमेवर व्याजाची परिगणना करुन त्याला अंतिमतः प्रदान करावयाची रक्कम प्राधिकृत करावी. तद्नंतर अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागार कार्यालयाने संबंधीत निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याकडून खालीलप्रमाणे वचनपत्र (Undertaking) प्राप्त करुन घेऊन त्यास भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचे प्रदान करण्यात यावे.
वचनपत्र
" व्याजदरातील सुधारणामुळे जर प्रचलीत व्याजदरापेक्षा व्याज दर कमी करण्यात आल्यास, या कमी करण्यात आलेल्या व्याजदराच्या परिणामस्वरुप शासनास देय ठरणारी रक्कम अंशदात्यास निवृत्तीवेनावर अनुज्ञेय असलेल्या महागाई वाढीमधून वसूल करण्यात येईल."अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
भविष्य निर्वाह निधी वर्गणी ची रक्कम नियत वयोमानानुसार सेवानिवृतो लागत पूर्वीच्या शेवटच्या 3 महिन्यात न भरन्याबाबत भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि-27.10.2010
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामधील सेवानिवृत्ती लगतपूर्वीच्या शेवटच्या ३ महिन्यांमध्ये भविष्य निर्वाह निधीची वर्गणी वसूल न करण्याबाबतच्या (महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमाच्या नियम ७ (४) तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सदर
तरतुदीचे पालन न केल्यामुळे अंतिम प्रदानास विलंब झाल्यास व शासनास त्यावर व्याज प्रदान करणे भाग पडल्यास याबाबत विभागप्रमुखांनी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करुन अतिरिक्त प्रदानाच्या व्याजाची वसुली त्यांच्याकडून करावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
भविष्य निर्वाह निधी वर्गणी दाराना खाते क्रमांक देण्याबाबत भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 30.4.2010
शिक्षण सेवक, कंत्राटी ग्रामसेवक, कंत्राटी कृषी सहाय्यक सेवक या पदावर नियुक्त्या करण्याचे व अशा पदधारकांना सेवेत नियमित करण्याबाबतचे धोरण संबंधीत विभागांनी ठरविले आहे. त्यास अनुसरुन व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमातील तरतूदीनुसार संबंधीत विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांकडून पात्र कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार करुन घेण्याची कार्यवाही केली जाते. महालेखापालांनी सूचित केल्यानुसार पात्र वर्गणीदारांचे अर्ज वेळवर व आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याबाबत संदर्भाधिन परिपत्रकान्वये सूचित केले आहे. या विभागाच्या क्र. पीएफआर २००५/४९३/प्र.क्र.६३/०५/ १३-अ, दि.३१.१०.२००५ च्या अधिसूचनेनुसार दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह
निधी योजना लागू होणार नाही. त्यांना वित्त विभागाच्या दि.३१.१०.२००५ च्या अधिसूचनेनुसार परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे याचाही उल्लेख संदर्भाधिन परिपत्रकात केलेला आहे.
वर नमूद केलेल्या पदांवर दिनांक ३१.१०.२००५ रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे वर्गणीदार होता येईल किंवा कसे याबाबत संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यासंदर्भातील त्यांच्या आदेशांच्या व धोरणांच्या (कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या देणे, तद्नंतर सेवेत नियमित करणे इत्यादी) अनुषंगाने तपासून योग्य ती कार्यवाही करावी व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना तात्काळ योग्य त्या सूचना द्याव्यात. वर नमूद केलेल्या संघटनेच्या पत्राची प्रत शालेय शिक्षण विभाग तसेच ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचेकडे पुढील कार्यवाहीस्तव सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. उर्वरित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी देखील अशास्वरुपाच्या प्रकरणात तपासून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित करावे.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
ज्या भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराना भ नि नि खाते क्रमांक देण्यात आलेला नाही अशाना भविष्य निर्वाह निधी वर्गणीदार खाते क्रमांक देण्याबाबत भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 13.4.2010
२. त्यास अनुसरुन नमूद करण्यात येते की, वित्त विभागाच्या क्रमांक: अंनियो-१००५/१२६/ सेवा-४,
दिनांक ३१.१०.२००५ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत दाखल होपायः आसकीय कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली असून सदर शासन निर्णयान्वये या कर्मचाऱ्यांना सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू होणार नाही. त्यामुळे दिनाक १.११.२००५ नंतर शासनसेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र दिनांक ३१.१०.२००५ रोजी व तत्पूर्वी सेवेत दाखल झालेल्या परंतु ज्या कर्मचाऱ्यांना अद्यापही भविष्य निर्वाह निधी वर्गणीदार खाते क्रमांक देण्यात आलेला नाही, अशा वर्गणीदारांचे अर्ज संपूर्णपणे भरुन महालेखापाल कार्यालयास त्वरित पाठवावेत असे सर्व विभागप्रमुखांना सूचित करण्यात येत आहे. विभागप्रमुखांनी या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
अनुदानित संस्थेच्या कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधिच्या वर्गणीची रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्याबाबत भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 25-8-2009
संदर्भः शासन निर्णय क्र. संकीर्ण-१००८/प्र.क्र.७१/कोषा प्र-५, दि. २२/०९/२००८
शुध्दिपत्रक :- वरील संदर्भाधिन शासन निर्णयातील परिच्छेद क्र. '३' यात जिल्हा परिषदेच्या संदर्भात देण्यात आलेल्या सुचना याद्वारे वगळण्यात येत आहेत.
गट ड च्या कर्मचा-याचे भविष्य निर्वाह लेखे व्यवस्थित ठेवणेबाबत भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 7.11.2007
काही कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी गट 'ड' च्या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे बिनचूक ठेवित नाहीत, त्यांच्या खात्यात अनुज्ञेय थकबाकीच्या रकमा वेळच्यावेळी जमा करीत नाहीत, कर्मचा-यांना दरवर्षी पासबूके अद्ययावत करून दिली जात नाहीत, व्याजाची परिगणना बरोबर केली जात नाही, अग्रिमांची अथवा काढलेल्या रकमांची नोंद व्यवस्थितरित्या घेतली जात नाही. परिणामी कर्मचारी अथवा शासनाचे नुकसान होण्याची शक्यता राहते.
३.उपरोक्त बाबी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता असून शासनाकडून याबाबत गंभीर दखल घेण्यात येत आहे. अशा अनियमिततांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कार्यालय प्रमुख व विभागप्रमुख यांना अशा सूचना देण्यात येत आहेत की, दि. १२/३/१९६४ च्या शासन परिपत्रकातील सूचनांनुसार कार्यपध्दती अनुसरून गट 'ड' च्या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे बिनचूक ठेवण्यात येऊन नियतकालिक विवरणपत्रे महालेखापाल कार्यालयाकडे वेळेवर पाठविण्याची काळजी घ्यावी. आहरण व संवितरण अधिका-यांनी केवळ देयक लेखापालावर विसंबून न राहता त्यांनी या कामात स्वतः लक्ष घालून भविष्य निर्वाह निधी लेखे बिनचूक ठेवले जात आहेत, याची खातरजमा करून घ्यावी.
४. सर्व मंत्रालयीन विभागांना व विभागप्रमुखांना विनंती करण्यात येते की, वरीलप्रमाणे कार्यवाही होत नसल्याचे आढळून आल्यास किंवा याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांचे विरूध्द शिस्तभंगाची कार्यवाही करावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
विष्य निर्वाह निधी वर्गणीच्या / प्रदनाच्या गहाळ रक्क्माचे लेखाकंन करण्याबाबतची कार्यपद्धति भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग सामान्य प्रशासन विभाग दि 12-10-2007
महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ च्या नियम २५ (१) मधील तरतुदीनुसार भ.नि.नि खाती नियमित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दि 26-07-2006
सेवेतून काढून टाकलेल्या / बडतर्फ केलेल्या भनिनि वर्गणीदारांना सेवेत पुनःस्थापित केल्यानंतर त्यांचा जुना भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम: क्र. २५ (१) मधील तरतुदीचे सर्वप्रथम काटेकोरपणे पालन करावे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
भविष्यनिर्वाह निधिच्या रक्कमेतुन शासनाला येने रकमा /शासन नुकसान यांची वसूली न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दि 21-01-2006
सेवानिवृत्त होणा-या वर्गणीदारांकडून त्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम प्रदानाच्या रकमेतून शासनास येणे असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रकमांची वसूली करण्यात येऊ नये.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
भविष्यनिर्वाह निधितून अग्रिम मंजूर करताना /रक्कम काढून घेण्यास मंजूरी देताना मूळ वेतनात मूळ वेतनाच्या 50 टक्के इतके महागाई वेतन विलीन करून अग्रिमाची / रक्कमेची परीगणना करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दि 05-07-2005
शासकीय कर्मचा-यांना महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमानुसार अग्रिम (परतावा रक्कम) मंजूर करताना किंवा निधीतून रक्कम काढण्यास (ना-परतावा) मंजूरी देताना, मूळ वेतनात महागाई वेतन (Dearness pay ) विलीन करून ( मूळ वेतन + महागाई वेतन ) त्यानुसार अग्रिम / ना-परतावा रक्कम परिगणित करणे
भविष्यनिर्वाह निधितील वर्गणीची रक्कम नियत वयोमाना नुसार सेवा निवृती लगत पूर्वीची शेवटच्या 3 महिन्यात न भरने बाबत दि 01-02-2005
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या प्रकरणी सेवानिवृत्ती लगत पूर्वीच्या ३ महिन्यात भविष्य निर्वाह निधीची वर्गणी वसुल न करण्याबाबत सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ च्या नियम ७ ( ४ ) चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराना संगणक विकत घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम (ना परतावा) काढण्यास मंजूरी देण्याबाबत भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 07-07-2004
हाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमामधील नियम क्रमांक १६ नुसार वर्गणीदाराच्या सेवेची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक संगणक संच खरेदी करण्यासाठी खालील अटींच्या अधिन राहून निधीतून रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येत आहेअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांसाठी ठेव संलग्न विमा योजनेमध्ये सुधारणा भविष्य निर्वाह निधी वित्तविभाग दि 01-12-2003
भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या कुटुंबियांना विशेष सामाजिक सुरक्षा मिळावी आणि शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील बचत वाढविण्यास उत्तेजन मिळावे या हेतूने ठेव संलग्न विमा योजना, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावलीतील नियम ३० मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
पत्रव्यवहार करणे सोईचे व्हावे म्हणून आहरण व संवितरण अधिका-यांनी अर्जावर संपूर्ण पत्ता लिहावा.
गट-ड च्या शासकीय कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे विहीत नमुन्यात ठेवून तसा अहवाल सादर करणेबाबतअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
ठेव संलग्न विमा योजनेची रक्कम विनाविनंब मिळंण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर करावयाच्या कार्यवाहीसाठी कालमर्यादा विहित करणे. सामान्य प्रशासन विभाग दि 21-11-1992
ठेव संलग्न विमा योजनेच्या वित्तीय मर्यादिमध्ये वाढ करण्यात आली आहे. सदर योजनेनुसार वर्गणीदाराच्या कुटुंबियांना विनविलंब लाभ मिळावा म्हणून सदर योजनेनुसार मिळणारी रक्कम लवकरात लवकर प्रदान करण्यासाठी खालीलप्रमाणे जास्तीत जास्त कालमर्यादा विहित करण्यात येत आहेअधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........
कर्मचाऱ्याच्या (वर्गणीदाराच्या) नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास, त्या विलंबाच्या कालावधीसाठी व्याज देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
भनिनि रकमांचे वर्गीकरण सामान्य प्रशासन विभाग दि 09-03-1976
महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे जिल्हा परिषद नमुना
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- नोकरी विषयी
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Leave a Reply