जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायतींचे सरपंच यांना प्रशिक्षणासाठी जिल्हयाबाहेर जावे लागते, कामानिमित्त बाहेर गेल्यावर स्वतःची ओळख पटविताना होणारी अडचण तसेच प्रसंगानुरुप उपयोगी पडावे, यासाठी त्यांना खालील अटींच्या अधिन राहून ओळखपत्र देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर विहित नमुन्यातील ओळखपत्र देण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. १) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेतील संबंधित सर्व जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य यांना, तसेच गट विकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत सरपंचांना स्वतःच्या स्वाक्षरीत सोबतच्या नमून्यात ओळखपत्रे द्यावीत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्राम पंचायत सरपंचांसाठी देण्यात येणा-या ओळखपत्राच्या रंगामध्ये समानता नसावी, यास्तव जिल्हा परिषद सदस्यांच्या ओळखपत्राचा रंग पिवळा, पंचायत समिती सदस्यांच्या ओळखपत्राचा रंग सफेद तर ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या ओळखपत्राचा रंग आकाशी निळा असावा.
२) जिल्हा परिषद सदस्यांनी आपले फोटो मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्यांनी गट विकास अधिका-यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावेत. सरपंचांनी आपले फोटो गट विकास अधिका-यांकडे जमा करावेत.
३) या ओळखपत्रावर संबंधित जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा.
४) ओळखपत्र ज्या कालावधीसाठी देण्यात येईल, तो कालावधी ओळखपत्रावर ठळक नमूद करावा. ओळखपत्र सर्वसाधारणपणे ३x४ सें. मी. आकारापेक्षा मोठे नसावे.
५) जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांची नोंदवही जिल्हा परिषद कार्यालयात ठेवण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतींच्या सरपंचांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांची नोंदवही पंचायत समिती कार्यालयात ठेवण्यात यावी.
६) सदस्यत्वाचा कालावधी संपल्यावर किंवा इतर कारणांमुळे पद रिक्त झाल्यास जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत सदस्य यांनी ओळखपत्र संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तात्काळ जमा करणे बंधनकारक राहील. तसेच कालावधी संपल्यावर किंवा इतर कारणांमुळे पद रिक्त झाल्यास जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांकडून ओळखपत्र जमा करुन घेण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील. आणि सरपंचांकडून ओळखपत्र जमा करुन घेण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. सदस्यांकडून ओळखपत्र जमा केल्याबाबतची नोंद ओळखपत्र नोंदवहीत त्वरीत घेण्यात यावी.
७) संबंधित अधिका-यांची मुदत संपताच त्यांना देण्यात आलेले ओळखपत्र अवैध ठरेल. तसेच मुदत पूर्तीनंतर देण्यात आलेल्या ओळखपत्राचा दुरुपयोग केल्यास संबंधित पदाधिकारी कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.
८) ओळखपत्र तयार करण्यासाठी येणारा खर्च जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून करावा.संकेतांक २०१४०२१११५०४५०२३२०
ओळखपत्र: सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य
234
previous post