तालुका जिल्हा महानगरपालिका,विभागीय मंत्रालय स्तरावरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत एकत्रित आदेश सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २६-०९-२०१२
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी / अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून “लोकशाही दिन” जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येत असतो. लोकशाही दिनाच्या कार्यपध्दतीबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये शासनाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना विहित केलेल्या आहेत. लोकशाही दिनासंदर्भात सर्व सूचना एकत्रितपणे निर्गमित कराव्यात व त्यासंबंधीची कार्यपध्दती सुलभ व्हावी, तसेच “लोकशाही दिन” हा तालुका स्तरावर देखील राबविण्यात यावा, ही बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. लोकशाही दिनासंबंधी यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेली परिपत्रके अधिक्रमित करून, सर्व स्तरांवरील लोकशाही दिनाच्या कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे एकत्रित मार्गदर्शक तत्वे विहित करण्यात येत आहेत :
३. “लोकशाही दिन” जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त स्तर / विभागीय आयुक्त स्तर व मंत्रालय स्तरावर राबविण्यात यावा.
४. यापुढे “लोकशाही दिन” तालुका स्तरावर देखील राबविण्यात यावा.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
लोकशाही दिन व मुख्यालय दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २९-१२-१९९९ अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
लोकशाही दिनाची अंमलबजवाणी जिल्हा पालक सचिवांची नेमणूक सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक २९-१२-१९९९
जी कामे क्षेत्रिय कार्यालयाकडूनच होणे आवश्यक आहे, अशा कामांसाठी नागरि-कांकडून आलल्या अर्जावर व निवेदनावर त्वरित न्याय मिळावा या दृष्टीने प्रत्येक रहिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन पाळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित जिल्हयातील प्रमुख अधि-का-यांनी उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारावीत व एक महिन्याचे आत अर्जदारांना अंतिम उत्तर धावे, असे ठरवून देण्यात आले आहे. अशा प्रकारे लोकशाहि दिन पाळल्यास नागरिकांचे स्थानिक पातळीवरील प्रश्न ब-याच प्रराणात सोडविले जातील असा शासनास विश्वास वाटतो.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….