Friday, July 25, 2025
Friday, July 25, 2025
Home » औषधे

आर सी एच कुटुंब कल्याण कार्यक्रमातर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये करिता औषधे खरेदी करण्यासाठी अनुदान वितरीत करण्याबाबत पत्र दिनांक २६-०९-२०१७

अनुदान वापरासबंधी मार्गदर्शक सुचना :-
स्त्री नसबंदी (फक्त बीपीएल / एससी/एसटी लाभार्थ्यांसाठी) प्रती केस रु.१०००/- व स्त्री नसबंदी (फक्त दारिद्ररेषेवरील लाभार्थ्यांसाठी) प्रती केस रु.६५०/- अनुदान देण्यात येते. या अनुदानापैकी रु.१००/- औषध व मलमपटटी करिता उपयोगात आणले जातात. तर पुरुष नसबंदी लाभार्थ्यासाठी प्रती केस रु.१५००/- अनुदान देण्यात येते. या अनुदानापैकी रु.५०/- औषध व मलमपटटी करिता उपयोगात आणले जातात.
चालु वर्षी म्हणजेच वर्ष २०१७-१८ मध्ये स्त्री नसबंदी शस्त्रक्रियासाठी प्रती लाभार्थी रु.१०/- व पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी रु.५/- प्रमाणे देण्यात येणाऱ्या अनुदानाची १० टक्के रक्कम जिल्हा व मनपास्तरावर औषधे खरेदीसाठी अनुदान वितरीत करण्यात येत आहे.
जिल्हा व मनपानिहाय केसेसेनिहाय अनुदान वाटपाची यादीः-
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैदयकिय आरोग्य अधिकारी, मनपा यांचेस्तरावर वितरीत करावयाचे स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया यांचे अनुदान वाटपाचा तक्ता पुढीलप्रमाणे अनुदानाचे वाटप जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक, वैदयकिय आरोग्य अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या अपेक्षित पातळीनूसार निश्चीत करण्यात आलेले आहे. यामध्ये स्त्री नसबंदीसाठी प्रती केस १० रुपये व पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रती केस ५ रुपये या दराने अनुदान वितरीत करण्यात येत आहे.

औषध भांडाराची कार्यप्रणाली व सनियंत्रण, आरोग्य सेवा संचालनाय मुंबई यांचे पत्र २३-०९-२०१३

अ) सर्वसाधारण बाबी
१) जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी केवळ एकच औषध भांडार कार्यरत राहील ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालयासाठी यापूढे स्वंतत्र औषधी भांडार कार्यरत ठेवू नये.
२) औषध भांडारात औषधांची मांडणी व्यवस्थीत करावी व बिनकार्डस् माहीती भरुन अद्ययावत उपलब्ध असावेत.
3) औषध भांडारात Vital औषधाचा साठा किमान तीन महिने पुरेल एवढा असावा त्यात मुख्यत्वे करुन ASV ARV & Emergency medicines चा समावेश असावा.
४) औषधांचे Stock book & Expiry date register तसेच daily tablet register परिपुर्ण व अद्ययावत असावे.
५) औषध भांडारांत प्रवेश नियंत्रित असावा. जेणेकरुन औषधाच्या चोरीस व गैरवापरास आळा बसु शकेल.
६) औषध भांडारात इंटरनेट सुविधेसह संगणक असावा. सध्या कार्यरत असलेल्या मे. निलेटो यांनी विकसीत केलेल्या ड्रग्ज इनव्हेंटरी सिस्टीमचा नियमितपणे वापर पुढील आदेशापर्यंत चालू ठेवावा. या प्रणालीत आपल्या संस्थेचा औषध साठा नियमितपणे अद्ययावत केला जात आहे याची खात्री नियमितपणे संस्थाप्रमुखांने व जिल्हा प्रमूखाने करावी. जेणेकरुन औषधवाबतची माहीती त्वरीत वरिष्ठांना उपलब्ध होऊ शकेल.
७) कालबाह्य व अप्रमाणित औषधांसाठी वेगळी जागा किंवा रॅक उपलब्ध असावी व सदर जागेत ठळक अक्षरात कालबाहय औषधे व अप्रमाणित औषधे ” असा फलक तयार 11 करुन ठेवण्यात यावे.
८) उपलब्ध औषधांचे नियोजन FEFO (First Expiry, First Out) या पध्दतीने करावे.
९) औषधांचे पार्सल ४८ तासांच्या आत उघडले जाईल याची दक्षता घ्यावी.
१०) अग्नीरोधक उपकरण उपलब्ध असावे. तसेच कर्मचारी त्यांचा वापर करण्याबाबत प्रशिक्षित असावेत.

महाराष्ट्रातील सर्व आरोग्य संस्था मधून रुग्णांना आवश्यक औषध यादी मधील सर्व औषधे मोफत देण्याबाबत सार्औवजनिक आरोग्षय विभाग शासन निर्णय ०७-०५-२०१३

१) आवश्यक औषध यादीतील सर्व औषधे ही राज्य किंवा जिल्हा स्तरावरुन पुरविण्यात येतील. रुग्णांना उपचार देताना फक्त आवश्यक औषघ यादीतील (EDL) औषधेच वापरावीत. २) औषध यादीतील औषधे कमी पडल्यास तसेच क्वचित प्रसंगी यादी बाहेरील औषधे घेण्याचे आवश्यक झाल्यास रुग्ण कल्याण समिती निधी, P.L.A. निधी आणि आरोग्य संस्थांना स्थानिक स्तरावर औषधे घेण्यासाठी वितरीत करण्यात आलेल्या १० टक्के निधीमधून औषधे घ्यावीत. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णांना बाहेरुन औषधे लिहून देण्यात येऊ नयेत. ३) सर्व आरोग्य संस्थांमध्ये दर्शनी भागात निळया बॅकग्राऊंडवर पांढऱ्या अक्षरामध्ये या रुग्णालयात रुग्णांना बाहेरुन औषधे लिहून दिली जात नाहीत असे आढळल्यास दुरध्वनी क्र. १०४ वर दुरध्वनी करुन रुग्णाचे नांव, रुग्णालयात आल्याची तारीख व वेळ, बाहेरुन औषध लिहून देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव (माहिती असल्यास) आणि आरोग्य केंद्राचा पत्ता याची माहिती द्यावी. शक्य असल्यास बाहेरुन लिहून दिलेल्या औषधाचे नाव सांगावे असा बोर्ड लावण्यात यावा. ४) संचालक, आरोग्य सेवा यांनी बाहेरुन औषधे लिहून देण्याची पध्दती पूर्णपणे बंद करण्यासंदर्भात सर्व जिल्यांची बैठक घेऊन शेवटच्या आरोग्य केंद्रापर्यंत याबाबत माहिती जाईल याची दक्षता घ्यावी. ५) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आणि रुग्णालयांच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी बाहेरुन औषध लिहून दिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी कळविण्यात यावे व त्याची लेखी पोहोच घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची पोहोच घेण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची राहील तर रुग्णालयांचे बाबतीत ही जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची राहील.

औषध खरेदी करण्यासाठी दर ठरविण्याबाबत, म सहसंचालक मुंबई यांचे पत्र दि ११/०२/२०१३

१) विभागीय / जिल्हा स्तरावर खरेदी करण्यासाठी संचालनालयाचे खरेदीचे दर तसेच BMC, DMER, ESIC व DGS&D यांचे दर विचारात घ्यावेत. उपरोक्त संस्थांपैकी ज्या संस्थेचे दर वैध आहेत त्यांना ई-मेल द्वारे पुरवठा करण्यास तयार आहात काय व असल्यास ७ व्या दिवशी संध्याकाळी ५ वाजे पर्यंत लखी होकार देण्यात यावा असे कळविण्यात यावे. सातव्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होकार आलेल्या पुरवठादारांपैकी न्युनत्तम दर असणा-या पुरवठादारास खरेदी आदेश देण्यात यावेत.
२) वैध दरकरार उपलब्ध असणा-या सर्वच पुरवठाधारकांनी पुरवठा करण्यास नकार दिल्यास किंवा औषधे व साधन सामुग्री उपरोक्त कोणत्याही दरकरारावर उपलब्ध नसल्यास व सदर बाबींची खरेदी स्थानिक खरेदी प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. ही खरेदी अंदाजीत वार्षिक किंमत रु.५०,०००/- पेक्षा कमी असल्यास त्यांची खरेदी दरपत्रके मागवुन व खरेदीची अंदाजीत वार्षिक किंमत रु.५०,०००/- पेक्षा जास्त ४ जिल्हा स्तरावर निविदा मागवुन खरेदी करण्यात यावी

३) ज्या औषध व साधन सामुग्रीचे आरोग्य सेवा संचालनालयाचे दरकरार केलेले अशा बाबी फक्त आरोग्य सेवा संचालनालयाच्या दरकरारावरच खरेदी याव्यात.
४) औषधे, साधन सामुग्री, उपकरणे ई. खरेदी करतांना जिल्हयाची गरज, स्तरावरुन करण्यात येणारा पुरवठयाचा कालावधी ई. बाबी विचारात घ्याव्यात. केलेली औषधे विनावापर राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

46624

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.