मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी ११ महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत योजनेंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून ११ महिने असा असेल. तसेच, ज्या उमेदवारांचा ६ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे, अशा उमेदवारांना पुढील ५ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल. सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून ५ महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल. सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यासाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित ५ महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच, अशा प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यास कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवल्यास सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी त्यांचे रावरुन निर्णय घ्यावा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी ११ महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत संदर्भाधीन दि. १०.०३.२०२५ चा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १ नंतर पुढील उप परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहेत:-
(१) सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही.
(२) या योजनेंतर्गत आस्थापना/उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येत आहे. तथापि, सदर प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापनेत कायमस्वरुपी नोकरीचा हक्क राहणार नाही.
-
893
-
297
-
1.1K
-
372
-
618
-
346
-
747
-
533
-
1.7K