Thursday, September 4, 2025
Thursday, September 4, 2025
Home » मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ शासन निर्णय

मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ शासन निर्णय

0 comment 591 views

नोंदणी अधिनियम,१९०८ चे कलम ८२ ची योग्य व प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत.. CR क्रमांक:- NO.KA.4/CR621/2013/2806, दिनांक:- 30-11-2013

नोंदणी अधिनियम, १९०८ हा कायदा पक्षकारांमधील व्यवहारांचे प्रित्यर्थ निष्पादित दस्तांची नोंदणी करण्यासाठी अर्हता व कार्यपध्दती विहित करतो. सदर अर्हता आणि कार्यपध्दतीची पूर्तता होत नसेल तर दस्तऐवजाची नोंदणी करता येत नाही. स्थावर मिळकतीच्या वाढत्या किंमतीमुळे व नफेखोरीच्या प्रवृत्तींमुळे काही व्यक्ती जो दस्तऐवज नोंदणी करण्यास पात्र नाही तो पात्र असल्याचे भासविण्याकरिता तसेच विहित तरतुदींची पूर्तता/पालन होत नसतांनाही तसे होत असल्याचे भासविण्याकरिता बनावट तथ्यांचा/कागदपत्रांचा/व्यक्तींचा वापर करुन दुय्यम निबंधकांची दिशाभूल करतात व दस्त नोंदणी पूर्ण करुन घेतात असे अलिकडच्या काळातील काही प्रकरणांमध्ये दिसून आले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित दुय्यम निबंधकांचा प्रथमदर्शनी कोणताही दोष नसतो. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर अथवा निदर्शनास आणून दिल्यानंतर दुय्यम निबंधक, संबंधित पक्षकारांविरुध्द नोंदणी अधिनियम, १९०८ चे कलम ८२ अन्वये अपराध केल्याबाबत कलम ८३ मधील तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया सुरु करु शकतात. मात्र काही दुय्यम निबंधक या तरतुदीचा वापर करीत नाहीत

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.

मुद्रांक शुल्क चुकविणेवर नियंत्रण ठेवणेबाबत.. CR क्रमांक:- NO.KA.16/RESEARCH /CR.1 /11/594, दिनांक:- 20-05-2011

तरी वरील सर्व बाबींचा विचार करुन, रुपये शंभरचे आतील दर्शनी मुल्यांचे मुद्रांकावर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
यास्तव सर्व जिल्हा निबंधक, मुद्रांक जिल्हाधिकारी, सहजिल्हा निबंधक, दुय्यम निबंधक यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, त्यांनी आपले अधिपत्याखालील सर्व मुद्रांक विक्रेत्यांना पुढीलप्रमाणे सूचना द्याव्यात.-
१) मुद्रांक विक्रेत्याने मुद्रांक खरेदीसाठी आलेल्या प्रत्येकांस मुद्रांकाचा वापर कोणत्या दस्तऐवजासाठी केला जाणार आहे, याची प्रथम चौकशी करावी.
२) चौकशीमध्ये संबंधित दस्तऐवजाला रु.१०० पेक्षा अधिक मुद्रांक शुल्क देय आहे, असे आढळून आल्यास खरेदीदारांस याबाबतची कल्पना द्यावी व या कारणास्तव रुपये १०० पेक्षा कमी मुल्याचे मुद्रांक शुल्क देणे गैर असल्याचे नम्रपणे सांगून कमी मुल्याचे मुद्रांक देण्यास असमर्थता दर्शवावी. जय यथास्थित वरिष्ठ अधिका-यांकडे हा वाद गेलाच, तर त्यांनी देखील संबंधितांना वस्तुस्थितीची 1. जाणीव करुन द्यावी व त्यांनी त्यांचे म्हणणे न सोडल्यास, मुंबई मुद्रांक अधिनियम, १९५८ चे कलम ३३ प्रमाणे कारवाईची जाणीव करुन द्यावी.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

चुकवीलेल्‍या मुद्रांक शुल्‍काचा शोध घेण्‍याकरिता बक्षिस योजना बंद करण्‍याबाबत. GR क्रमांक:- मुद्रांक 2001/307/प्र.क्र.160/म-1, दिनांक:- 03-08-2009

दस्‍त मुद्रांकित करण्‍याच्‍या यंत्राने मुद्रांकित केलेल्‍या रकमेवरील मनैतीची निश्चिती करणेबाबत. GR क्रमांक:- क्र मुद्रांक 2008/प्रक्र 247/म1, दिनांक:- 07-08-2008

संस्थांना दस्त मुद्रांकित करण्याच्या यंत्राने मुद्रांकित केलेल्या रकमेवर देण्यात येणा-या मनौतीबाबत शासनाने घेतलेल्या आढाव्यानुसार दस्त मुद्रांकित करण्याच्या यंत्राने केलेल्या मुद्रांकाच्या रकमेवर १% मनौती ऐवजी ०.५% दराने मनौती देण्यात यावी असा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार यापुढे उपरोक्त मनौतीची रक्क्म ०.५% दराने शासनातर्फे देय राहील.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 कलम 67व कलम 68 मधील कार्यवाही व अधिकार विषद करणेबाबत. GR क्रमांक:- क्र मुद्रांक 2007/प्रक्र44/म1, दिनांक:- 23-07-2008

शासन निर्णय :-
१) कलम ६७ चे प्रयोजनार्थ, तपासणीसाठी किंवा दस्त अटकाविणेसाठी प्राधिकृत करण्यात येणारी व्यक्ति ही, नोंदणी व मुद्रांक विभागातील राजपत्रित वर्ग-२ चे पद धारण करणा-या अधिका-यापेक्षा कमी दर्जाची नसावी.
२) कलम ६८ चे प्रयोजनार्थ, जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करावयाचा अधिकारी हा नोंदणी व मुद्रांक विभागातील राजपत्रित वर्ग-२ चे पद धारण करणा-या अधिका-यापेक्षा कमी दर्जाचा नसावा.
३) कलम ६७ प्रमाणे तपासणी पूर्वी अथवा कलम ६८ प्रमाणे कोणत्याही स्थळाला भेट देण्यापूर्वी, जिल्हाधिकारी यांनी, संबंधित व्यक्ति अथवा संस्था यांना भेटीचे कारण स्पष्ट करणारी १५ दिवस अगाऊ नोटीस द्यावी लागेल. दरम्यानचे कालावधीत संबंधित व्यक्तिने अथवा संस्थेने स्वतः, संबंधित दस्त हजर केल्यास भेट देण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. अन्यथा कलम ६७ व ६८ खालील अधिकाराचा वापर करुन अभिलेख, विलेख किंवा दस्तऐवज ताब्यात घेऊन आवश्यकता असल्यास अटकाविता येतील.
४) कलम ६७ प्रमाणे किंवा कलम ६८ प्रमाणे तपासणीसाठी किंवा दस्त अटकविणेसाठी संबंधित अधिकारी कार्यालयीन वेळेत संबंधित स्थळाला भेट देईल.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

पारदर्शकता:- शासकीय निर्णय आणि परिपत्रके थेट शासकीय संकेतस्थळावरून प्राप्त करून घेतलेली असल्याने त्यात कोणताही बदल केलेला नाही असे वेबसाइट स्पष्टपणे नमूद करते. तसेच ह्या संकेतस्थळाचा कोणताही व्यावसायिक हेतु नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

80814

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.