निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या केलेल्या तक्रारी याबाबत करावयाची कार्यवाही सा प्र वि परिपत्रक शा कप २०१५/प्र क्र ५/१८ (रवका) दि २५/०२/२०१५
(१) ज्या तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव व पत्ता नमुद केलेला नाही अशा निनावी तक्रारीमध्ये कोणत्याही स्वरूपाची तक्रार/माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये. अशा तक्रारी दफ्तरी दाखल करण्यात याव्यात.
(२) ज्या तक्रारीमध्ये असंबध्द (vague) आरोप आहे अशा तक्रारीदेखील तक्रारदाराची तपासणी न करता दफ्तरी दाखल करण्यात याव्यात.
(३) ज्या तक्रारीमध्ये पडताळणी करता येवू शकेल असे आरोप केलेले आहेत अशा तक्रारीचे संबंधात प्रशासकीय विभाग/मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी. अशा प्रकरणी सक्षम प्राधिका-याच्या मान्यतेने सदरहू तक्रार तक्रारदाराकडे पाठवून ती त्यांने स्वतः केली आहे काय याबाबत खात्री करून घेण्यात यावी. तक्रारदाराकडून १५ दिवसामध्ये प्रतिसाद मिळाला नाही तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे व तद्नंतर १५ दिवसांची प्रतिक्षा केल्यानंतर देखील माहिती प्राप्त न झाल्यास सदरहू तक्रार खोटया नावाची (Pseudonymous) तक्रार असल्याचे नमुद करून दफ्तरी दाखल करण्यात यावी.
(४) तक्रारदाराने आपण स्वतः तक्रार केल्याचे मान्य केल्यास अशा तक्रारीवर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील अर्जदाराचे नाव व पत्ता झाकुन तक्रारीची छायांकित प्रत काढुन ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवावी व पुढील कार्यवाही करावी.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या अर्जावरील कार्यवाही सा प्र वि परिपत्रक क्र शाकप १००१/९४८/१८ प्र क्र ५५/०१/१८ रवका दि २९/०७/२००३
निनावी व खोटया सहीने प्राप्त झालेल्या सर्वच अर्जाबाबत चौकशी करण्याची आवश्यकता नाही. जर अशा अर्जामध्ये पडताळणीच्या समर्थनास उपयुक्त अशा विशिष्ट प्रसंगाचा किंवा चौकशी योग्य मुद्दयांचा उल्लेख करण्यात आला असेल आणि ते चौकशी करण्याकरिता सार्वजनिकदृष्टया पुरेशे महत्वाचे असतील तर त्या प्रसंगाबाबत किंवा मुद्दयांबाबत चौकशी करण्यात यावी. सदर चौकशी करताना कोणती कार्यवाही अवलंबावी याबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: शाकाप-१०८५/५८/१८ (र.व का.), दि.७ मे, १९८५, शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकाप-१०९६/८५०/१८ (र.व का.), दि. २७ डिसेंबर, १९९६ व शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: शाकाप-१०९८/५८/प्र.क्र.५/९८/१८ (२.व शाकाप-१०९८/५८/प्र.क्र.५/९८/१८ (र. व का.), दि.३ जुलै, १९९८ अन्वये मार्गदर्शन करण्यात आले होते.
२. प्रशासनातील अधिका-यांना / कर्मचा-यांना त्रास देण्याच्या हेतूने निनावी किंवा खोटया नावाने तक्रारी नाराज झालेल्या व्यक्तींकडून केल्या जातात ही सध्याची वस्तुस्थिती आहे. अधिका-यांस /कर्मचा-यांस पदोन्नती मिळण्याच्या दरम्यान निनावी / खोटया नावाने तक्रारी केल्या जातात. परिणामी त्यास पदोन्नती मिळण्यास अडचणीचे ठरते तसेच त्याच्या नितीमूल्यांचे खच्चीकरण केले जाते असे निदर्शनास आले आहे.
- भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमे अंतर्गत शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाच्या संबंधित अधिका-याचे पदनाम, कार्यालयाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक इत्यादी तपशीलाचे फलक लावण्यात आलेले आहेत. ज्या शासकीय सेवकांबाबत भ्रष्टाचाराबाबत ठोस तक्रार असेल अशा बाबतीत तक्रारदार त्या कार्यालयांशी संपर्क साधू शकतो ही भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी केलेली व्यवस्था लक्षात गोगा निनावी अर्ज तसेच अर्ज खोटया नावाने करण्यात आलेला आहे असे चौकशीअंती आढळून आल्यास असेही अर्ज कोणतीही कार्यवाही न करता ते दप्तरी दाखल करण्यात यावेत.
- अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या अर्जावरील कार्यवाही सा प्र वि परिपत्रक शा कप १०९८/५८/१८ प्र क्र ५/९८/१८ रवका दि ३/०७/१९९८
निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या अर्जावर फुल्ल्या प्रकारे कार्यवाही करावी, याबाबतच्या स्पष्ट सूचना, उपरोल्लिखित दिनांक ७ मे, १९८५ च्या परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. सदरहू सूचनांचा पुनस्चार, उपरोल्लिखित दिनांक २७ डिसेंबर, १९९६ च्या परिपत्रकान्वये करण्यात आला आहे.
२. नुकत्याच भा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिका-यांसाठी असलेल्या राज्यस्तरीय संयुक्त विचार विनिमय समितीच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये सदरहू शासन आदेशाचे पालन होत नाही, असा मुधा उपस्थित झाला होता.
३. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या बाबतीत शासन कटीबध्द आहे व याकरिता शासनाने भ्रष्टाचार निर्मूलनाच्या संदर्भात श्वेतपत्रिकेचा मसुदाही जाहीर केलेला आहे व त्यावर वेगळयाने कार्यवाही सुरु आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाकरिता सर्व प्रकारची कार्यवाहते पूर्ण शक्तीने करताना शासकीय कर्मचा-यांवर विनाकारण अन्याय होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे आणि एका परिने भ्रष्टाचार निर्मूलनाचाच तो एक भाग आहे. या धोरणाच्या अनुबंगाने जालील आदेश देण्यात येत आहेत.
१] अ] निनावी व खोट्या सहीने प्राप्त झालेल्या सर्वच अर्जाबाबत चौकशी करण्याची आवश्यकता नाही. जर अशा अर्जामध्ये पडताळणीच्या समर्थनास उपयुत्त अशा विशिष्ट प्रसंगाचा किंवा चौकशी योग्य मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला असेल आणि ते चौकशी करण्याकरिता सार्वजनिक दृष्ट्या पुरेसे महत्त्वाचे असतील तरच त्या प्रसंगाबाबत किंवा मुद्दयाबाबत चौकशी करण्यात यावी.
ब] असे सर्व चौकशी योग्य प्रसंग किंवा मुद्दे अगोदर ठरविण्यात यावेत व अशा चौकशी योग्य वरविण्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाची किंवा मुद्द्याची चौकशी करण्यात यावी. सर्व अर्जाची प्रत चौकशीकरिता पाठविण्यात येऊ नये.
क] असे प्रसंग किंवा मुद्द्यांबाबत चौकशी कशी करावी, याबाबतसुध्दा संबंधित विभागांनी स्पष्ट निदेश दयावेत. सर्व मंत्रालयीन विभागांनी यासाठी सोबतच्या विवरणपत्र-१ चा वापर करावा.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या अर्जावरील कार्यवाही सा प्र वि परिपत्रक शा कप १०९६/८५०/१८ दि २७/१२/१९९६
निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या अर्जावर कुठल्या प्रकारे कार्यवाही करावी, याबाबतच्या स्पष्ट सूचना शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः शाकाप 1085/58/18 (र. व का.), दिनांक 7 में, 1985 अन्दये देण्यात आलेल्या आहेत. असे असूनही बहुतांशी दप्तर दाखल करण्यायोग्य तक्रारींची चौकशी होत असल्याने संबंधित अधिका-यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी तक्रार नुकत्याच मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली, भहाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिका-यांसाठी असलेल्या राज्यस्तरीय, संयुक्त विचार विनिमय समितीच्या प्रतिनिधीबरोबर झालेल्या बैठकीच्या वेळी करण्यात आली होती.
सदर परिपत्रकातील सूचनांनुसार निनावी व खोट्या सहीने आलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याची सर्व संबंधितांनी कृपया दक्षता घ्यावी. अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी.
निनावी व खोट्या सहीने शासनाकडे आलेल्या अर्जावरील कार्यवाही सा प्र वि शाकप १०८५/५८/१८ (रवका) दि ७/५/१९८५
निनावी व खोट्या सहीने पाठविलेल्या अर्जाची विल्लेवाट लावण्याचे आदेश “शासनास करावयाचे अर्ज तयार करणे, सादर करणे व त्यांची विल्हेवाट लावणे यासंबंधी शासनाचे सुधारलेले नियम (ओवृत्ती 1983)” या पुस्तिकेतील नियम 3-अ आणि 3-ब अन्वये दिलेले आहेत. हे नियम खालीलप्रमाणे आहेत :-
3 (अ) प्रत्येक अर्जावर अर्जदाराने (जर तो संयुक्त अर्ज, असेल तर अर्जदारांनी), अर्जाच्या खरेपणाबद्दल संही केली पाहिजे. अर्जदारास जर सही करता येत नसेल तर त्याने अर्जाच्या खारेपणाबद्दल आंगठ्याच्या ठसा उमटवला पाहिजे (संयुक्त अर्ज, असल्यास, अर्जदारांनी आंगठ्याचे ठसे, उमटवले पाहिजेत). ज्यावेळी निनावी अर्जात पडताळणी करण्यास समर्थ असलेल्या विशिष्ट प्रसंगाचा उल्लेख केलेला असेल आणि ते अन्वेषण करावयासाठी सार्वजनिकदृष्ट्या पुरेसे महत्वाचे असतील त्यावेळी असे निनावी अर्ज, वगळून इतर निनावी अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार करण्यात येणार नाही आणि ते दफ्तदाखाल करण्यात येतील.
3 (ब) जेव्हा सही केलेला अर्ज, हा खोट्या सहीने केलेला अर्ज, असहे असे सिध्द होईल तेव्हा तो निनावी अर्जाप्रमाणेच निकालात काढण्यात येईल.
- शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, निनावी व खोट्या सहीने अर्ज, झाले तरीही चौकशी सुरू करण्यात येते. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये पुष्कळ निष्ठाहीनता (demoralisation) होते. या विषयाबद्दल असा खुलासा करण्यात येत आहे की, निनावी व खोट्या सहीने केलेल्या अर्जागर चौकशीचे आदेश देण्यापूर्वी वरिष्ठ अधिका-यांनी अर्जाचा विचार करुन आदेश दिले पाहिजेत. या आदेशांमध्ये चौकशी करण्याचे कारण स्पष्टपणे दर्शविले पाहिजे. मंत्रालयामध्ये असे आदेश सह सचिव किंवा त्यांचेवरील वरिष्ठ अधिकारी यांनी, घ इतरत्र विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुखा यांनीच निर्गमित केले पाहिजेत.
- अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….