एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.
१) उद्देशः राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटी सुविधेद्वारे देशभरातील कोणत्याही रास्तभाव दुकानातून अन्नधान्य उचलण्याची सोय उपलब्ध करून देणे.
२) राष्ट्रीय पोर्टेबिलीटी व्याख्या:- अ) स्वगृही राज्य (Home State):- शिधापत्रिका ज्या राज्याने वितरीत केली आहे ते राज्य. आ) गंतव्य राज्य (Destination State):- स्वगृही राज्याव्यतिरीक्त ज्या राज्यामधून अन्नधान्याची उचल करण्यात येईल ते राज्य. इ) केंद्रीय विक्री किंमतः तांदूळ रू.०३/-, गहू रू.०२/- व भरडधान्य रु.०१/- (सन २०२३ मध्ये १ जानेवारी, २०२३ पासून एक वर्ष कालावधीकरीता मोफत) ई) अन्नधान्य प्रमाणः- > अंत्योदय अन्न योजनाः प्रति शिधापत्रिका ३५ कि.ग्रॅ. > प्राधान्य कुटुंब योजनाः- प्रति व्यक्ती प्रति महिना ५ कि.ग्रॅ. उ) ऑटोमेटेड रास्तभाव दुकानः ऑनलाईन परिपूर्ण कार्यान्वित ई-पॉस मशीन उपलब्ध असलेले रास्तभाव दुकान. ऊ) अन-ऑटोमेटेड रास्तभाव दुकानः ई-पॉस मशीन उपलब्ध नसलेले रास्तभाव दुकान. ऋ) पोर्टेबिलिटी लाभार्थी:- काणत्याही राज्यातील असा लाभार्थी जो राष्ट्रीय पोर्टेबिलीटी योजनेंतर्गत गंतव्य राज्यातून अन्नधान्य उचल करण्यास ईच्छुक आहे.
३) एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता:-
1. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ घेणार सर्व लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेसाठी पात्र आहेत. (ज्या रास्तभाव दुकानांमध्ये मानवी पद्धतीने (un-automated) घान्य वाटप करण्यात येते, त्या रास्तभाव दुकानातील लाभार्थी व राज्य योजनेतील लाभार्थी एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसतील.)
॥. शिधापत्रिकेतील कमीत कमी एक लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक शिधापत्रिकेसोबत संलग्न असावा.
iii. लाभार्थ्यांकडे एक पेक्षा अधिक शिधापत्रिका नसावी. (लाभार्थ्याचे नाव इतर शिधापत्रिकांमध्ये समाविष्ट असल्यास असा लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसेल)
iv. शिधापत्रिकेमधील एकही लाभार्थ्यांचे इतर दुसऱ्या शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट नसावे.
४) ई-पॉस मशीनवर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतरच लाभार्थ्याला एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत अन्नधान्याचा लाभ देण्यात येईल.
५) एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत लाभार्थ्यांने अन्नधान्य उचल करण्याची कार्यपद्धतीः- i. ज्या लाभार्थ्यांला एक देश एक शिधापत्रिका योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे असा लाभार्थी गंतव्य राज्यातील (Destination State) कोणत्याही रास्तभाव दुकानांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वगृही राज्याने वितरीत केलेली शिधापत्रिका घेऊन जाईल. शिधापत्रिकाजवळ नसल्यास शिधापत्रिकेचा बारा अंकी क्रमांक असणे आवश्यक आहे. ii. रास्तभाव दुकानदार लाभार्थ्यांकडील शिधापत्रिकेतील माहितीद्वारे स्वगृही राज्यातील (Home State) अन्नधान्याची माहिती ई-पॉस मशीनवर प्राप्त करेल. लाभार्थ्यांला स्वगृही राज्यानूसार (Home State) अनुज्ञेय अन्नधान्य तपशील ई-पॉस मशीनवर प्राप्त झाल्यानंतर बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करून अन्नधान्य वितरीत करण्यात येईल.
६) एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरीत करत असतांना रास्तभाव दुकानादारांनी त्यांचा दुकानांशी संलग्न शिधापत्रिकामधील लाभार्थ्यांप्रमाणेचे एक देश एक शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्राधान्याने अन्नधान्य वितरीत करावे. एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना अन्नधान्याचा लाभ नाकारण्यात येऊ नये. ७) एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरीता केंद्र शासनाने मेरा राशन (Mera Ration) मोबाईल अॅप्लिकेशन विकसीत केले आहे. सदर मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांना अनुज्ञेय अन्नधान्याचा तपशील, जवळील रास्तभाव दुकान तसेच शिधापत्रिकेबाबत माहिती उपलब्ध आहे.
८) एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत अन्नधान्याचे प्रमाण व किंमतः– i. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत निर्धारीत प्रमाण व केंद्रीय विक्री किंमतीप्रमाणे गहू, तांदूळ व भरडधान्य वितरीत करण्यात येईल. ii. सार्वजनिक वितरीत व्यवस्थेंतर्गत गंतव्य राज्यात (Destination State) निर्धारीत केलेल्या अन्नधान्य प्रमाणानूसार (गहू, तांदूळ, भरडधान्य) एक देश एक शिधापत्रिका योजनेतर्गत लाभार्थ्यांला अन्नधान्याचा लाभ देण्यात येईल. iii. सार्वजनिक वितरीत व्यवस्थेंतर्गत गंतव्य राज्यात गहू ऎवजी गव्हाचे पीठ लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येत असेल तर पोर्टेबिलीटीद्वारे लाभार्थ्याना गव्हाचे पीठ वितरीत करण्यात येईल व त्याकरीता गंतव्य राज्याने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे लाभार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येईल.
९) अनुज्ञेय अन्नधान्याची उचल:- i. राष्ट्रीय पोर्टेबिलीटी अंतर्गत ज्या शिधापत्रिकेमध्ये एक सदस्य आहे, ती शिधापत्रिका वगळून इतर शिधापत्रिकेमधील काही सदस्य स्वगृही राज्यात वास्तव्यास असतील तेव्हा लाभार्थी अशा शिधापत्रिकेवर अनुज्ञेय संपुर्ण अन्नधान्य गंतव्य राज्यातील (Destination State) रास्तभाव दुकानामधून एकाच व्यवहारात उचल करू शकत नाही. सदर सुविधा स्वगृही राज्यातील शिधापत्रिकेतील इतर सदस्यांनाही अन्नधान्याचा लाभ मिळावा याकरीता करण्यात आली आहे. ii. राष्ट्रीय पोर्टेबिलीटी अंतर्गत ज्या शिधापत्रिकेमध्ये एकपेक्षा जास्त सदस्य आहेत, अशा शिधापत्रिकेवर लाभार्थी एका व्यवहारामध्ये अनुज्ञेय अन्नधान्याच्या ५० % अन्नधान्य उचल करू शकतात, तथापि, दोन अन्नधान्य उचलीच्या व्यवहारांमध्ये ७ दिवसाचे अंतर असावे.
१०) रास्तभाव दुकानांना एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत लाभार्थ्याने उचल केलेल्या अन्नधान्याची प्रतिपुर्ती करण्याची पद्धत खालीलप्रमाणे:- i. जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी/उपनियंत्रक शिधावाटप यांनी एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत आपल्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ज्या रास्तभाव दुकानांमधून वारंवार लाभार्थ्यांकडून अन्नधान्याची उचल करण्यात येत आहे, अशा रास्तभाव दुकानांचे मागील ३ महिन्याचे विश्लेषण करावे. विश्लेषणाअंती ज्या रास्तभाव दुकानांमधून एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत रास्तभाव दुकानाद्वारे नियतनापेक्षा अधिक धान्य वितरीत करण्यात आले आहे, अशा रास्तभाव दुकानांना महिन्याच्या सुरूवातीला अधिकचे नियतन एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत मंजूर करावे. तथापि, विश्लेषणाअंती सर्व रास्तभाव दुकानांसाठी आवश्यक असलेले अधिकचे नियतन विचारात घेऊन जिल्हाचे एकत्रित नियतन हे जिल्हयांच्या एकूण मंजुर नियतनापेक्षा जास्त होत असल्यास तेवढ्या अतिरीक्त नियतनाची मागणी शासनास करण्यात यावी. ii. एक देश एक शिधापत्रिका योजनेंतर्गत वितरीत अन्नधान्याचे विश्लेषण करण्याकरीता आंतरराज्य पोर्टेबिलिटी व्यवहारांची माहिती केंद्र शासनाच्या www.impds.nic.in या संकेतस्थळावर तसेच राज्यांतर्गत पोर्टेबिलिटी व्यवहारांची माहिती https://mahaepos.gov.in या संकेतस्थळावरील Portability details मध्ये उपलब्ध आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी/उपनियंत्रक शिधावाटप यांनी कार्यालयातील तांत्रिक कर्मचारी यांच्यामदतीने सदर संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून विश्लेषण करावे. ११) सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी/उपनियंत्रक शिधावाटप यांनी एक देश एक शिधापत्रिका योजनेची तसेच केंद्र शासनाच्या मेरा राशन (Mera Ration) मोबाईल अॅप्लिकेशनबाबत जनजागृती मोहिम हाती घेऊन लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहचवावी. १२) एक देश एक शिधापत्रिका योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी दुबार (duplicate) शिधापत्रिका वगळणे आवश्यक आहे. दुबार शिधापत्रिकांवर कार्यवाही (deduplication)) करण्याबाबत शासनाच्या दि.१५.०५.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. सदर कार्यवाहीअंती वगळण्यासाठी शिफारस असलेल्या शिधापत्रिका प्रथमतः शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमधून वगळण्याची कार्यवाही करावी. सदर कार्यवाही करतांना लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
संकेताक २०२३०७०४१७१७१७०५०६
- आदिवासी विकास विभाग
- आरोग्य अधिनियम पुस्तक
- आरोग्य कर्मचारी दालन
- आरोग्य कार्यक्रम शासननिर्णय
- आरोग्य योजना
- आरोग्य विभाग पदनिर्मिती
- आरोग्य संख्या शास्त्र
- आरोग्य सेवा
- इतर योजना
- उपयुक्त नमुने
- एक्सेल फॉर्मुला
- कर्मचारी व्यक्तिगत उपयोगी दालन
- कायदे व नियम
- कार्यालयीन संहीता
- कृषी विभाग योजना
- गृह विभाग
- गृह-पोलिस
- ग्रा प अधिनियम
- ग्रा पं शासननिर्णय
- ग्रामपंचायत विभाग योजना
- ग्रामविकास
- ग्रामविकास सेवा
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा-घरकुल
- जिल्हा परिषद-पंचायत समिती
- तंत्रज्ञान शिक्षण
- नोकरी विषयी
- पाणी पुरवठा विभाग
- पॉवर पॉईंट
- प्रशासकीय नमुने
- बांधकाम विभाग
- बांधकाम विभाग
- महसूल
- महसूल योजना
- महसूल सेवा
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
- महाराष्ट्र विकास सेवा
- महाराष्ट्र विकास सेवा
- महिला व बाल कल्याण विभाग योजना
- मे न्यायालय निर्णय
- मे न्यायालय निर्णय
- मोटार वाहन विभाग
- लाभार्थीसाठी प्रस्ताव
- लेखाविषयक
- वित्त आयोग
- विभागनिहाय शासननिर्णय
- वैद्यकीय अधिकारी
- शासकीय पुस्तक-अधिनियम
- शासकीय योजना
- शिक्षण विभाग
- शिक्षण सेवा
- संकीर्ण
- समाजकल्याण विभाग योजना
- सार्वजनिक आरोग्य
- सार्वजनिक बांधकाम
- सेवा प्रवेश: अर्हता, निकष
- सेवाप्रवेश नियम
- सेवाविषयक
Leave a Reply