Wednesday, September 10, 2025
Wednesday, September 10, 2025
Home » शेत पाणंद रस्ते योजना

शेत / पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.  योजना तयार करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. महसूल व वन विभाग 01-08-2025
202508011127380419…

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुधारणा करुन शासन मंजुरीप्राप्त आराखड्यातील शेत/ पाणंद रस्त्यांची कामे पुर्ण करण्याबाबत.. 09-02-2024 202402091633442216

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत सन॒ २०२२-२३ या वर्षाच्या आराखड्यास मान्यता देणेबाबत नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक 03.03.2022

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत सन २०२१-२२ वर्षाच्या नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 25.01.2O22


२. अटी/शर्ती-

१) परिशिष्ट "अ" मध्ये नमूद शेत/पाणंद रस्त्यांचे कामे उपरोक्त "वाचा" येथील शासन निर्णयातील तरतुदीनुसार करण्यात येतील.
२) परिशिष्ट “अ” मध्ये नमूद शेत / पाणंद रस्त्यांची कामे सुरु करण्यापुर्वी सदर शेत/पाणंद रस्त्यांचा समावेश महसुल विभागाच्या संबंधित गाव नकाशामध्ये असल्याबाबत खातरजमा करावी.
३) आराखड्यात समावेश असलेली कामे सुरु करण्यापुर्वी सदर कांमांकरीता संबंधित ग्रामपंचायतीने ठराव केला असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.
४) उक्त शेत/पाणंद रस्त्यांच्या कामामुळे कोणत्याही खाजगी जमिनीवर अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
५) तसेच सदर शेत/पाणंद रस्त्यांच्या कामांकरीता कोणतेही भुसंपादन "मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजने" अंतर्गत अनुज्ञेय असणार नाही.
६) सदर शेत / पाणंद रस्त्यांची कामे मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातुन राज्य रोहयोमधुन पुरक कुशल अनुदान उपलब्ध करुन पुर्ण करण्यात येतात. त्यामुळे सदर योजनांसंदर्भात केंद्र शासन व राज्य शासन यांच्याव्दारा वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे पालन करण्यात येईल.
७) एखाद्या विवादग्रस्त शेत/पाणंद रस्त्यासंदर्भात मा. न्यायालयाचे मनाई आदेश / जैसे-थे आदेश असल्यास अशा प्रकरणी मा. न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
८) अन्य योजनेंतर्गत शेत/पाणंद रस्त्यांचे काम मंजुर असल्यास अशी कामे पुन्हा मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजनेंतर्गत अनुज्ञेय असणार नाहीत.
संकेतांक क्र. २०२२०१२५१५१७०६८६१६
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

विविध योजनांच्या अभिरणामधून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत / पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबत नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक ११-११-२०२१

शासन निर्णय :-
१. विविध योजनांच्या अभिसरणामधून "पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना" राबविण्यासाठी निर्गमित केलेला वाचा क्र.१ येथील दि. २७/१२/२०१८ चा शासन निर्णय व वाचा क्र. (२) ते (५) येथील शासन शुध्दीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.
२. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून "मी समृध्द तर गाव समृध्द" आणि "गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द" ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत/पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतुक करण्याकरीता, बारमाही वापराकरीता शेत/पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत/पाणंद रस्ते तयार करण्याकरिता "मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना" राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
"मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना" कार्यक्षमतेने राबविण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.
१९८७ अन्वये ग्रामीण भागातील रस्त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.
1) एका गावावरुन दुसऱ्या गावास जाणारे रस्ते
ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते (गाव नकाशामध्ये दोन भरीव रेषाने दाखविले असून या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही.) ग्रामीण गाडीमार्ग (गाव नकाशामध्ये तुटक दुबार रेषाने दाखविले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जाते त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शविलेले आहे, अशा रस्त्यांची नोंदणी साडेसोळा ते एकवीस फूट आहे.)
पाय मार्ग (गाव नकाशामध्ये तुटक रेषेने दर्शविले असून ज्या भूमापन क्षेत्रामधून जातो त्यामध्ये पोट खराब म्हणून दर्शविलेले आहे अशा रस्त्यांची रुंदी सव्वा आठ फूट आहे.)
ii) शेतावर जाण्याचे पाय मार्ग व गाडी मार्ग
हे रस्ते नकाशावर दर्शविलेले नाहीत. परंतु, वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसिलदारांना दिलेले आहेत. त्यानुसार वहिवाटीचे विहित असलेले रस्ते.
इतर ग्रामीण रस्ते
४. या योजने अंतर्गत पुढीलप्रमाणे शेत/पाणंद रस्त्यांची कामे घेता येतील.
1) अस्तित्वातील शेत/पाणंद कच्च्या रस्त्यांचे मजबुतीकरण करणे.
ii) शेत/पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करुन कच्चा व पक्का रस्ता एकत्रितपणे करणे.
५. राज्यातील सर्व शेत/पाणंद रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे (जिल्हा परिषद आणि शासन) मापदंडाप्रमाणे बांधण्यात यावेत. यात फक्त जागेच्या उपलब्धतेप्रमाणे रुंदीमध्ये फरक पडेल. मात्र रस्त्यांची उंची, खडीचे आकार, खडीच्या परताची जाडी, रस्त्याच्या दोन्ही बाजूचे निचऱ्यासाठीचे नाले, रस्त्यांच्या बाजूला वृक्ष लागवड, गुणवत्तेची चाचणी इत्यादी सर्व बाबी मानक मापदंडाचे असावे.
६. "मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते योजना", मनरेगा व राज्य रोहयो या दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश मागेल त्याला अकुशल रोजगार उपलब्ध करुन देणे असा असून त्यासोबतच ग्रामीण भागात सामूहिक उत्पादक मत्ता व मुलभूत सुविधा निर्माण करणे हे ही तेवढेच महत्वाचे उद्दीष्ट आहे. मनरेगा अंतर्गत केंद्र शासना मार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो. मात्र विविध कामे करताना अकुशल : कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० या प्रमाणात राखणे आवश्यक असल्यामुळे ज्या कामावर हे प्रमाण राखले जाऊ शकत नाही अशी कामे विशेषतः रस्त्याची कामे हाती घेण्यास अडचणी येतात आणि शेत/पाणंद रस्त्यांची तर प्रचंड मागणी आहे आणि गरजही आहे ही बाब विचारात घेवून प्रत्येक रस्त्याच्या कामावर अकुशलः कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० राखण्यासाठी राज्य रोहयोतून पूरक कुशल निधी उपलब्ध करुन
देण्यात येईल.
७. या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे प्रस्तावित दर्जाचे रस्ते खालील नमुना अंदाजपत्रकाप्रमाणे तयार करण्यात यावेत. तथापि ज्या ज्या वेळी DSH बदलेल त्याप्रमाणे अंदाजपत्रक बदलेल.
शेत/पाणंद रस्ते हे सुध्दा अन्य महामार्ग रस्ते एवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शेत/पाणंद रस्ते तयार करणे आवश्यक ठरते. यास्तव उच्च गुणवत्तेसह रस्त्यांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद/शासन आणि वन जमीन असल्यास वन विभागाद्वारे तयार करण्यात येऊन त्यास तांत्रिक मान्यता देण्यात यावी. शेत/पाणंद रस्ता तयार करण्यासाठीचे मापदंड निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यानच्या कालावधीत ग्राम विकास विभागाने ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी विहित केलेले मापदंड लागू राहतील.
शेत/पाणंद कच्चा रस्ता मजबुतीकरण करताना दोन्ही बाजूने चर खोदून त्यामधून निघणारी माती/मुरुम ही शेत/पाणंद रस्त्यामधील भागात टाकण्यात येऊन त्यावर व्यवस्थित रोलरने दबाई करावी. रस्त्याचा भाग हा काळ्या मातीतून जात असल्यास भरावावर किमान ३०० मि.मी. जाडीचा कठीण मुरुम टाकण्यात यावा व त्यावर रोलरने व्यवस्थितरित्या पाणी शिंपडून दबाई करावी. स्थानिक भौगोलिक स्थितीचा विचार करता जर मुरुमीकरण करून पक्का रस्ता बारमाही वापराकरिता तयार होणार असेल तर तसा पक्का रस्ता तयार करण्यात यावा अन्यथा मुरुमावर खडीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खडीची एकूण जाडी २२५ मि.मी. असावी. त्यातील खालच्या थराच्या खडीची जाडी १५० मि.मी. असावी व त्या खडीचा आकार ग्रामीण रस्ते संहिता (Rural Road Manual) नुसार Grading 1 (७५mm to ४.७५mm) असावी व वरील थराच्या खडीची जाडी ७५ मि.मी. असून त्या खडीचा आकार Grading II (५३mm to ४.७५mm) असावी. सदर खड़ी ही जवळपासच्या खदानीतून उपलब्ध होणारी असावी. खडी ही योग्य आकारमानाची फोडून घ्यावी व त्यानंतरच वापरावी. प्रत्येक Layer मधील खडी पसरविल्यानंतर योग्य प्रकारे कोरडी व त्यानंतर पाणी मारुन रोलरने दबाई करावी. वेगवेगळ्या कामातून उपलब्ध होणाऱ्या दगड/माती/मुरुम यांचा कल्पकतेने वापर करताना दगड हा काळा व वजनदार असावा त्तो दगड योग्य आकारमानाचा फोडून घ्यावा. शक्यतो दगड फोडल्यानंतर १०० टक्के वापर होईल हे बघावे. शक्यतो काळ्या मातीचा भराव करणे टाळावे. भरावात वापरण्यात येत असलेला मुरुम कठीण असावा व खडीकरणासाठी ३०% पर्यंत पकडीसाठी वापरण्यात येणारा मुरुम हलका असावा.
CD Work- नळकांडी पुल बांधताना शक्यतो सिमेंट पाईपचा वापर करावा तथापि सिमेंट पाईप टाकल्यानंतर दोन्ही बाजूने किमान M-१० काँक्रिटच्या मिती (Head Wall) असाव्यात त्यामुळे रस्त्याचा पचणार नाही व CD Work चे आयुष्य वाढेल. शक्यतो पाणंद रस्त्यासाठी मुरुमी रस्तेच पुरेसे
आहेत. खडीचे रस्ते बांधकाम केल्यास पुढील २-३ वर्षात त्यावर डांबरीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा वाहतुकीमुळे खडी रस्त्यावर पसरुन रस्ता वाहतुकीस योग्य राहणार नाही. माती मुरुमाचा भराव करताना रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने उतार (Camber) देणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचणार नाही.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

विविध योजनांच्या अभिसरणामधून “पालकमंत्री शेतपाणंद रस्ते योजना” राबविणेबाबत (शुध्दीपत्रक)नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक 16.09.2020

विविध योजनांच्या अभिसरणामधून "पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना" च्या  शासन शुध्दीपत्रक दि.१२ ऑक्टोबर, २०१८ मधील परिच्छेद ३ मध्ये "परिच्छेद क्र.३ (ब) (ii) असा कच्चा रस्ता तयार करण्याकरीता टायर असलेले बॅकहो लोडर व एक्सकॅव्हेटर (७०HP पेक्षा अधिक क्षमता असलेले जेसीबी इत्यादी अर्थमूव्हर) याकरीता १०० तास प्रति किलोमीटर व चेन असलेले एक्सकॅव्हेटर (२०० HP पेक्षा अधिक क्षमता असलेले पोकलेन इत्यादी अर्थमुव्हर) करीता ४० तास प्रति किलोमीटर अनुज्ञेय राहील. या पेक्षा प्रति किलोमीटर अधिक तास लागत असल्यास तालुकास्तरीय समितीची मान्यता आवश्यक राहील."
ऐवजी
"परिच्छेद क्र.३ (ब) (iii) असा कच्चा रस्ता तयार करण्याकरीता टायर असलेले बॅकहो लोडर व एक्सकॅव्हेटर (७०HP पेक्षा अधिक क्षमता असलेले जेसीबी इत्यादी अर्थमूव्हर) याकरीता १०० तास प्रति किलोमीटर किंवा चेन असलेले एक्सकॅव्हेटर (२०० HP पेक्षा अधिक क्षमता असलेले पोकलेन इत्यादी अर्थमुव्हर) करीता ४० तास प्रति किलोमीटर अनुज्ञेय राहील. या पेक्षा प्रति किलोमीटर अधिक तास लागत असल्यास तालुकास्तरीय समितीची मान्यता आवश्यक राहील." असे वाचावे.
संकेतांक क्र. २०२००९१६१५५६२९२४१६
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत,पाणंद रस्ते योजना राबविणेबाबत (शुध्दीपत्रक). नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक 09.09.2019

विविध योजनांच्या अभिसरणामधून “पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना” च्या शासन निर्णय दि.२७/०२/२०१८ मधील परिच्छेद ६ “निधीची उपलब्धता” मधील नमुद बाबी नतंर “राज्य रोजगार हमी योजनेचा निधी” याचा समावेश करण्यात येत आहे.

संकेतांक क्र. २०१९०९०९१५१५११४०१६

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

विविध योजनांच्या अभिसरणातून पालकमंत्री शेत / पाणंद रस्ते योजना राबविण्याबाबत ( शुद्धिपत्रक) नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक ०६-०२-२०१९

शासन शुध्दीपत्रक क्रमांक-रोहयो-२०१७/प्र.क्र.२७९/रोहयो-१०अ, दिनांक १२ ऑक्टोबर, २०१९ निर्गमित करण्यात आले आहे. तथापि, दि.२७ फेब्रुवारी, २०१८ च्या शासन निर्णयात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :-
१. परिच्छेद क्र.३ (ब) भाग-ब-शेत/पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करुन कच्चा रस्ता तयार करणे.
ज्या ठिकाणी शेतक-याची सहमती आहे, अशा ठिकाणी अर्थमुव्हर उत्खनन यंत्राच्या साहाय्याने योग्य आखणी करुन दोन्ही बाजूने चर खोदून त्यामधून निघणारी माती/मुरुम शेत/पाणंद रस्त्यामधील भागात टाकण्यात यावी. तसेच चरात खोदून निघालेली माती/मुरुम योग्य प्रमाणात पसरवून रस्त्यांचा कच्चा भराव तयार करण्यात यावा. असा कच्चा रस्ता करण्याकरीता प्रति किलोमीटर जास्तीत जास्त रु.५०,०००/- इतका खर्च अनुज्ञेय राहील. यापेक्षा अतिरिक्त रक्कम असल्यास शेतक-यांनी लोकसहभागातून ती उत्खनन यंत्रधारकास परस्पर अदा करावी. लोकसहभागातून रक्कम उभारण्याकरीता सीएसआर/एनजीओ यांची मदत घेता येईल.

ऐवजी
"परिच्छेद क्र.३(ब) ज्या ठिकाणी शेतक-याची सहमती आहे, अशा ठिकाणी अर्थमुव्हर उत्खनन यंत्राच्या साहाय्याने योग्य आखणी करुन दोन्ही बाजूने चर खोदून त्यामधून निघणारी माती/मुरुम शेत/पाणंद रस्त्यामधील भागात टाकण्यात यावी. तसेच चरात खोदून निघालेली माती/मुरुम योग्य प्रमाणात पसरवून रस्त्यांचा कच्चा भराव तयार करण्यात यावा.
असा कच्चा रस्ता तयार करण्याकरीता टायर असलेले बॅकहो लोडर व एक्सकॅव्हेटर (७०HP पेक्षा अधिक क्षमता असलेले जेसीबी इत्यादी अर्थमूव्हर) या करीता १०० तास प्रति किलोमीटर व चेन असलेले एक्सकॅव्हेटर (२०० HP पेक्षा अधिक क्षमता असलेले पोकलेन इत्यादी अर्थमुव्हर) करीता ४० तास प्रति किलोमिटर अनुज्ञेय राहील. या पेक्षा प्रति किलोमिटर अधिक तास लागत असल्यास तालुकास्तरीय समितीची मान्यता आवश्यक राहील" असे वाचावे .
संकेतांक क्र. २०१९०२०६१७३८०१५४१६
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

विविध योजनांच्या अभिसरणामधून “पालकमंत्रीशेत,पाणंद रस्ते योजना राबविणेबाबत -नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक 12.10.2018

विविध योजनांच्या अभिसरणामधून “पालकमंत्री शोतपाणंद रस्ते योजना राबविणेबाबत-नियोजन विभाग, रोहयो प्रभाग शासन निर्णय दिनांक 27.02.2018

शेत/पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतुक करण्याकरीता पावसाळ्यामध्ये शेत/पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. शेत/पाणंद रस्ते हे पावसाळ्यामध्ये पाणी व चिखलाने वाहतुकीच्या कामास निरूपयोगी ठरतात, अशा ठिकाणी ने-आण करण्यासाठी शेत/पाणंद रस्त्यांची आवश्यकता आहे.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

93653

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.