378
- पारपत्र सुविधा मिळवू इच्छिणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने पारपत्रासाठी आवेदनपत्र देण्यापूर्वी त्यांच्या विभाग प्रमुखांकडून व विभाग प्रमुखाने शासनाकडून “ना-हरकत प्रमाणपत्र “मिळविणे अवश्यक आहे.
- पारपत्र अधिनियम, १९६७ आणि पारपत्र नियम १९८० अन्वये सर्वसाधारण पारपत्र मिळविण्यासाठी विहित केलेल्या आवेदनपत्राच्या नमुन्यानुसार राज्य/केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यास किंवा सांविधिक संस्था अथवा सार्वजनिक उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यास त्यांच्या विभागाकडून “ना-हरकत प्रमाणपत्र’ “मिळवून ते मूळ प्रतीत सादर करावे लागते. असे प्रमाणपत्र देण्यापूर्वी कोणत्या बाबी पडताळून पाहणे आवश्यक आहे
- (१) संबधित कर्मचाऱ्याविरुध्द विभागीय चौकशी प्रलंबित आहे किंवा विभागीय चौकशी करण्याचे ठरले आहे, किंवा कसे,
(२) संबधित कर्मचाऱ्याविरुध्द दक्षता प्रकरण प्रलंबित आहे किंवा तसे प्रकरण विचाराधीन आहे किंवा कसे,
(३) सुरक्षिततेच्या बाबतीत शासनाच्या अभिलेखात अर्जदाराविरुध्द आक्षेपार्ह असा विश्वसनीय पुरावा आहे किंवा कसे,
You Might Be Interested In