(नियम क्रमांक 74) शासनाच्या महिला कर्मचा-यांना 180 दिवसांपर्यंत प्रसूती रजा मिळू शकते. पण रजा मंजूर करतेवेळी त्या महिलेला दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुले जिवंत असता कामा नयेत म्हणजेच ही रजा 2 हयात अपत्यांपर्यंतच अनुज्ञेय आहे. ही विशेष प्रकारची रजा कोणत्याही खात्यावर खर्च टाकली जात नाही
प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत प्रसूति रजा संदर्भात कालावधीची अट वगळने नियम ७४ दि 15-01-2016
दोन वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास सदर प्रसुती रजा व रजा वेतन खालील शर्तीच्या अधीन राहून अनुज्ञेय राहिल:-
१) प्रसुती रजा मंजूर करण्यापुर्वी ६ महिन्यांच्या वेतनाइतक्या रकमेचा बॉन्ड अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याकडून घेण्यात यावा, तद्नंतरच उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे प्रसुती रजा व रजा वेतन अनुज्ञेय करण्यात यावे.
२) अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याने प्रसूती रजा संपवून शासन सेवेत रुजू झाल्यानंतर किमान दोन वर्षे राज्य शासनाची सेवा करणे बंधनकारक राहील. सेवेचा दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी, प्रसुती रजा कालावधीत / प्रसुती रजेनंतर रुजू न होता / प्रसुती रजा संपवून रुजु झाल्यावर, राज्य शासनाव्यतिरिक्त / राज्याच्या एकत्रित निधीतून वेतनावरील खर्च भागविला जात नाही अशा इतर सेवेत जाण्याकरीता प्रकरणपरत्वे कार्यमुक्त व्हावयाचे झाल्यास / राजीनामा द्यावयाचा झाल्यास अथवा अन्य कारणास्तव राजीनामा द्यावयाचा झाल्यास अशा शासकीय महिला कर्मचाऱ्याने घेतलेल्या प्रसुती रजा कालावधीत देय झालेल्या वेतनाइतके वेतन राज्य शासनास अदा केल्यानंतरच अशा शासकीय महिला कर्मचाऱ्यास राज्य शासनाच्या सेवेचा राजीनामा देता येईल किंवा कार्यमुक्त होता येईल.
२. या सुविधेचा लाभ आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहिल.
३. या शासन निर्णयातील तरतुदीपुरते महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील यासबंधीच्या विद्यमान तरतुदी सुधारण्यात आल्या आहेत, असे मानण्यात यावे. उपरोक्त नियमामध्ये रितसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल.
राज्य शासकीय महिला कर्मचारी यांची प्रसुती रजा मर्यादा १८० दिवस(नियम ७४ ) प्रसुती रजा मर्यादा १८० दिवस दि 24-08-2009
१) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या नियम ७४ मधील तरतुदीनुसार राज्य शासकीय महिला कर्मचा-यांना अनुज्ञेय असलेली ९० दिवसांची प्रसूती रजेची मर्यादा १८० दिवसांपर्यंत वाढविण्यात यावी. या सुविधेचा लाभ फक्त दोन अपत्यांपुरताच मर्यादित राहील. प्रसूती रजा मंजूर करण्याच्या इतर शर्ती पूर्वीप्रमाणे यापुढेही लागू राहतील. २) या सुविधेचा लाभ आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील. ३) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील यासंबंधातील विद्यमान तरतुदी या शासन निर्णयातील तरतुदीपुरते सुधारण्यात आले असे मानण्यात यावे. उपरोक्त नियमामध्ये रीतसर सुधारणा यथावकाश करण्यात येईल.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा दि 25-10-2005
३. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली, १९८१ मधील नियम १६ अंतर्गत उपनियम ३५- अ आणि ३५-ब नव्याने अंतर्भत करण्यात येत असून पुढीलप्रमाणे आहेत. ३५- अ) केंद्र शासनाने अलीकडेच, लहान मूल दत्तक घेणाऱ्या मातेला नैसर्गिक मातेप्रमाणेच दत्तक मुलांचे संगोपन करावे लागते आणि सुरुवातीच्या काही कालावधीत दत्तक मुलाला नवीन वातावरणाची सवय व्हावी म्हणून मूलाच्या सोबतही रहावे लागते. या सर्व बाबी विचारात घेऊन लहान मूल दत्तक घेणाऱ्या केंद्र शासकीय महिला कर्मचाऱ्यांना एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत देय व अनुज्ञेय रजा मंजूर करण्यासंबंधीचे आदेश निर्गमित केले आहेत. त्याच धर्तीवर मूल दत्तक घेतलेल्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांनाही एक वर्षापर्यंत किंवा मुलाचे वय एक वर्ष पूर्ण होईल तो दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक असेल त्या दिनांकापर्यंत देय अनुज्ञेय
(वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता ६० दिवसापर्यंत परिवर्तित रजा व अनर्जित रजा धरुन )
घेण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. मात्र मूल दत्तक घेणाच्या दिनांकाला दोन पेक्षा कमी मुले हयात असणे आवश्यक आहे. ही तदतूद प्राथमिक शाळा / माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये/ सैनिकी शाळा / अध्यापक विद्यालये इत्यादी मधील मान्यताप्राप्त पदांवरील आणि ज्यांच्या नियुक्तीस संबंधित मान्यताप्राप्त महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासाठी लागू करण्यात येत आहे.
प्रसुती रजेच्या विद्यमान तरतुदींमध्ये सुधारणा आणि मुल दत्तक घेणा-या महिला कर्मचा-यांना देय व अनुज्ञेय रजा दि 25-10-2005
प्रसूति रजेच्या विद्यमान तरतुदीमधे सुधारणादोन पेक्षा कमी हयात मुले दि 04-11-1996
राजपत्रित व् अराज पत्रित कर्मचा-यांचे औग १९९५ वेतन तसेच महा राज्याच्या निवृतीवेतन धारकाचे औग १९९५ चे निवुती वेंतन वितरित करण्याबाबतप्रसूति रजा सुधारणा , 90 दिवस प्रसूति रजा गर्भपात रजा ४५ दिवस दि 04-08-1995
शासन निर्णय क्रमांकः अरजा-1490/12/सेवा-9, दिनांक 28 जुलै, 1995 च्या परिच्छेद । (अ) मधील “दोन किंवा दोन पेक्षा कमी हयात मुले असलेल्या” या शब्द समूहाऐवजी, “दोन पेक्षा कमी हयात मुले असलेल्या” असे वाचावे.