(टीप-खालील शिक्षक बदली दिनांक निहाय सर्व शासन निर्णय खालील प्रमाणे माहितीसाठी वाचू शकता.)
जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरण ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 व अधिक माहिती साठी येथे Click करा.
सुधारित बदली धोरणानुसार नवीन दि. १४ मार्च २०२३ उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारीत धोरण / बदली संवर्ग निश्चित करण्यात येत आहे.
१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल. (अवघड क्षेत्राचे निकष खाली वाचा)
१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.
१.३ बदली वर्ष:- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.
१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा:-अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.
१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक इत्यादी.
१.६ सक्षम प्राधिकारी :- शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदेअंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकाच्या बदली सुधारित अटी लागू करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २१-०६-२०२३ साठी व अधिक माहिती साठी येथे Click करा.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणं-या जिल्हातर्गत व आंतर जिल्हा बदली संदर्भात अभ्यासगट गठीत करणेबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १४-०३-२०२३ साठी व अधिक माहिती साठी येथे Click करा.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १३ जानेवारी २०२३ साठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०७-०४-२०२१ साठी येथे क्लिक करा