Thursday, July 24, 2025
Thursday, July 24, 2025
Home » सरपंच, सदस्य भत्ता

सरपंच, सदस्य भत्ता

0 comment

सरपंच, उपसरपंच यांचे मानधन व ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता Online पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करणे बाबत ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १४-०८-२०१९ साठी येथे Click करा

ज्या पध्दतीने ग्रामपचायत कमचा-याच वतन आनलाइन पध्दतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे त्याच पध्दतीने व त्याच प्रणालीद्वारे सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता यापूढे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता ऑनलाईन प्रणालीतून करण्यात येणार असल्याने संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे यांच्या एचडीएफसी बँकेमधील खालील खाते क्रमांक मध्ये उपरोक्त मानधनाची रक्कम जमा करुन संबंधितांना अदा करण्यात येईल.
१) Account Title: STATE PROJECT DIRECTOR RGPSA/RGSA, PUNE
२) Account No :- ५०१००२३१२६९०७८
३) IFSC Code: HDFC००००३५५
२. यासाठी कार्यपध्दती, कर्तव्य व जबाबदाऱ्या ह्या संदर्भाधीन क्रमांक २ च्या शासन निर्णयाप्रमाणेच असतील. दर महिन्याला प्रत्येक ग्रामसेवकाने सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचे LOG IN करून माहिती अद्ययावत करावी. सरपंच, उपसरपंच व सदस्य यात बदल झाला असेल तर दर महिन्याला ग्रामसेवकाने संबंधितांची माहिती अद्ययावत करावी. संदर्भाधीन क्रमांक २ च्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांनी संबंधित माहितीची खातरजमा करावी. तसेच सदर मानधन व सदस्य बैठक भत्ता संबंधितांच्या खाते क्रमांकावरती त्याच दिवशी अथवा दुसऱ्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करण्यात येईल याची खातरजमा संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पुणे यांनी करावी, तसेच याबाबतचा अहवाल दर महिन्याला शासनाला सादर करावा.
३. संदर्भाधीन क्रमांक २ च्या शासन निर्णय मध्ये नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसारच व संदर्भाधीन क्रमांक ३ च्या शासन निर्णय मध्ये नमूद केलेल्या लोकसंख्या वर्गवारी व शासन अनुदान नुसार सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व संदर्भाधीन क्रमांक १ च्या शासन निर्णयामध्ये नमूद सदस्य बैठक भत्ता त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात येईल.
४. सदर खर्च मागणी क्रमांक एल-२, प्रधानशिर्ष २०५३-जिल्हा प्रशासन, ०९३-जिल्हा आस्थापना-(०७) (०१) ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचा-यांचे किमान वेतन यासाठी अनुदाने (२०५३ १०४२)-३१-सहायक अनुदान याखाली खर्च करण्यात येईल.

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

महाराष्ट्रातील सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याबाबत , ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ३०-०७-२०१९ साठी येथे Click करा

ग्रामपंचायतीची लोकसंख्यानिहाय वर्गवारी विचारात घेऊन सरंपचांना आणि उपसरपंचांना खालीलप्रमाणे दरमहा मानधन अनुज्ञेय राहील.
सरपंच व उपसरपंच यांना देण्यात येणा-या मानधनावरील खर्चापैकी ७५% खर्च शासन उचलेल. उर्वरित २५% मानधनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीमधून देण्यात येईल.

महाराष्ट्रातील सर्व सरपंचाना मानधनात व सदस्य बैठक भत्यात वाढ, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०६-०९-२०१४ साठी येथे Click करा

अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….

या लेखात, आम्ही आपणाला सरपंच, सदस्य भत्ता याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

45830

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare.