नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/ स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान/ उच्च वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पूर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक १६-१२-२०२२ साठी व अधिक माहिती साठी येथे Click करा
नियमित शिक्षक पदावर कार्यरत शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे / स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे दूस-या समान (प्राथमिक मधून प्राथमिक, माध्यमिक मधून माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय) तसेच उच्च/असमान (प्राथमिक मधून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय अथवा माध्यमिक मधून उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय) पदावर नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकाच्या पुर्वीच्या वेतनास संरक्षण देतेवेळी खालील अटी व शर्ती लागू राहतील:-
(१) स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शाळेमधील पुर्वीची नियुक्ती ही विहीत मार्गान/प्रक्रियेद्वारे झालेली असावी.
(२) पुर्वीच्या नियुक्तीस वेळोवेळी वैयक्तिक मान्यता मिळालेली असावी तसेच वेतन अनुदान मिळत असावे.
(३) पुर्वीची नियुक्ती विहीत मार्गाने / प्रक्रियेद्वारे झालेली नसल्यास नियमित वेतनश्रेणीमध्ये कार्यरत शिक्षकाची नव्याने नियुक्ती झाल्यास त्याच्या पुर्वीच्या वेतनास संरक्षण मिळणार नाही. तथापि, शासन निर्णय दि. १५/०९/२०११ नुसार अशा शिक्षकास शिक्षण सेवक योजना लागू होणार नसल्याने, त्याचे वेतन नव्याने नियुक्त पदास लागू वेतनश्रेणीच्या किमान टप्प्यावर निश्चित करण्यात येईल.
(४) पुर्वीची सेवा व नवीन नियुक्ती यामध्ये सेवाखंड असल्यास वेतनास संरक्षण राहणार नाही. तथापि, पूर्वीच्या पदावरुन कार्यमुक्त झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होण्यासाठी प्रचलित धोरणानुसार वाजवी कालावधी अनुज्ञेय असेल.
(५) समान तसेच उच्च पदावरील बदलीसाठी वेतन संरक्षण लागू राहणार नाही.
(६) अन्य व्यवस्थापनाकडे निवड झालेल्या नवीन पदाची व पूर्वीच्या व्यवस्थापनाकडील पदाची वेतनश्रेणी समान असल्यास कर्मचा-यास पूर्वीच्या पदावरील सेवाज्येष्ठता लागू होणार नाही. तथापि, पूर्वीच्या पदावरील सेवा ग्राहय धरुन वरिष्ठ/निवडश्रेणीचे लाभ देय होतील.
(७) एका व्यवस्थापनाकडून अन्य व्यवस्थापनाकडील उच्च वेतनश्रेणीतील पदावर नव्याने नियुक्ती झाल्यास शिक्षकास उच्च वेतनश्रेणीतील नवीन पदाच्या सेवाशर्ती तसेच सेवाज्येष्ठता लागू होईल. त्यामुळे पूर्वीच्या पदावरील सेवा वरिष्ठ/निवडश्रेणीच्या लाभासाठी ग्राहय होणार नाही.
(८) शासन निर्णय दि. १५/०९/२०११ नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पुर्वीची सेवा सेवानिवृत्तीवेतनासाठी ग्राहय राहील.(९) पवित्र प्रणालीमार्फत नव्याने शिक्षण सेवक पदी निवड होऊन रुजू झालेल्या वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षकाच्या वेतन संरक्षणास मान्यता देण्याची कार्यवाही शिक्षणाधिकारी यांचेकडून करण्यात येईल. सदर कार्यवाही होईपर्यंत संबंधितांस सदर पदांचे मुळ वेतन देय राहील.
(१०) सदर पदावरील नियुक्ती ही नवीन नियुक्ती असल्याने वेतनास संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिविक्षाधिन कालावधी लागू राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….