Saturday, October 25, 2025
Saturday, October 25, 2025
Home » स्थायीत्व, कायमपणाचे फायदे बाबत    

स्थायीत्व, कायमपणाचे फायदे बाबत    

0 comment 1.4K views

शासन सेवेतील अस्थायी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्राचा लाभ प्रदान करणेबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना..11-06-2025, 202506111534466507

आस्थायी शासकिय कर्मचाऱ्याना/अधिकाऱ्याना स्थायीत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देणेबाबत साप्रवि शा परीपत्रक क्रस्थाप्रप १४१४/(प्रक्र ७३ /१४ ) /१३- अ  दि ११/९/२०१४

शासकिय अधिकाऱ्यास गट अ च्या राजपत्रीत पदावर कायमपणाच्या फायद्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत साप्रवि परीपत्रक क्र स्थाप्रप-१०९९/ प्र क्र ४८/९९/१३- अ दि १८/८/१९९९

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांकः एसआरव्ही- 1075/ दहा, दि. 19 सप्टेंबर, 1975 या अनुसार कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र होणा-या प्रत्येक अस्थायी कर्मचा-यांच्या बाबतीत त्या कर्मचा-यांची नियुक्ती करण्यास सक्षम असणा-या अधिका-याने तो कर्मचारी कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र होत आहे अशा आशयाचे प्रमाणपत्र प्रथम पदावरील नियुक्तीच्या संदर्भात देणे आवश्यक आहे. अशी प्रमाणपत्रे उपरोक्त दिनांक 16/12/1995 च्या परिपत्रकात विहित केलेल्या नमुन्यात देण्यात यावीत असे आदेश देण्यात आले आहेत.
2. राजपत्रित अधिका-यांना ते धारण करीत असलेल्या पदावर स्थायी करण्याच्या कार्यवाहीस विलंब होणार असल्यास, केवळ एवढयाच त्रुटीमुळे संबंधित अधिकारी कोणत्याही लाभापासून वंचित राहू नये (उदा. भा.प्र.से. नामनिर्देशन) या दृष्टीकोनातून पात्र अधिका-यास राजपत्रित पदावर स्थायीत्व लाभ प्रमाणपत्र देऊन स्थायी अधिका-यांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळण्यास ते पात्र समजले जाण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत विचार करून शासन आता असे आदेश देत आहे की, गट-अ च्या अधिका-यांना पूर्वी यराजपत्रित पदावर स्थायीत्य लाभ प्रमाणपत्र मिळालेले असले तरीही ते धारण करीत असलेल्या गट-अ च्या पदावर उपरोक्त दिनांक 19/9/1975 च्या आदेशातील विहित अटी पूर्ण करीत असल्यास त्यांना स्थायीत्व लाभ प्रमाणपत्र देण्यात यावे. सदर प्रमाणपत्र उपरोक्त दि. 16/12/1995 च्या परिपत्रकात विष्वित केलेल्या नगुन्यात देण्यात यावे. कायगपणाच्या फायद्याचे प्रमाणपत्र योग्य त्या सक्षम प्राधिका-यांच्या सहीने व विहित नमुन्यात देण्यात येईल, याची दक्षता घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

शासकिय अधिकाऱ्यास गट अ च्या राजपत्रीत पदावर कायमपणाच्या फायद्याचे प्रमाणपत्र देण्याबाबत साप्रवि परीपत्रक क्र स्थाप्रप-१०९३/ /२६४०/प्र क्र ९८/९३/१३- अ दि १६/१२/१९९५


शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-1075/दह।, दिनांक 19 सप्टेंबर, 1975 या अनुसार कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र होणा-या प्रत्येक अस्थायी शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत त्या कर्मचा-याची नियुक्ती करण्यास सक्षम असणा-या अधिका-याने, तो कर्मचारी कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र होत आहे अशा आशयाचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. अशी प्रमाणपत्रे देण्यात एकरुपता राहाण्याच्या दृष्टीने ती. उपरोक्त दिनांक 28 ऑगस्ट, 1985 च्या परिपत्रकात विहित केलेल्या नगुन्यात नोंदयावीत असे आदेश देण्यात आले होते. शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र असूनही केवळ तसे प्रमाणपत्र सेवापुस्तकात नोंदल न गेल्यामुळे कर्मचा-यांना सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळण्यारा अधागधी अडचणी येतात. ही बाब अतिशय गंभीर आहे.
2. पात्र अस्थायी शासकीय कर्मचा-यांना कायमपणाचे फायदे देण्याची प्रमाणपत्रे वेळीच देण्याची आणि त्याची नोंद त्याच्या सेवापुस्तकामध्ये घेण्याची दक्षता नियुक्ती प्राधिका-यांनी घेणे आवश्यक आहे. एखादा कर्मचारी जर दिनांक 19 सप्टेंबर, 1975 मधील शर्तीची पूर्तता करीत असतानाही केवळ प्रशासकीय अडचणीमुळे त्याला स्थायीत्व प्रमाणपत्र देण्याचे आदेश विलंबाने काढण्यात आले तर त्याच्या परिणागी संबंधीत कर्मचा-याला स्यायित्व प्रगाण-पत्रामुळे मिळणा-या फायद्यापासून वंचित रहावे लागते. शासन आता असे आदेश देत आहे की, संबंधित कर्मचा-याला तो स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्यास ज्या दिनांकापागून पात्र ठरेल त्या दिनांकापासून देण्यात यावे. एखाद्या कर्मचा-याच्या संबंधात स्थायीत्य प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला असेल तर त्यामामतची नोंद वेळोवेळी संबंधित कर्मचा-याच्या सेवापुस्तकात घेण्यात यावी. म्हणजे स्थायीत्य प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही वेळोवेळी करण्यात आली होती परंतु ते न मिळण्यास संबंधित कर्मचारी अपात्र होता हे स्पष्ट होईल. तसेच ज्या प्रकरणामध्ये प्रमाणपत्र देण्यापूर्वी पदोन्नती, बदली व सामावून घेण्याच्या कार्यवाहीमुळे नवीन पदावरील सेवा 3 वर्षे होत नसतील तरीही अशा कर्मचा-यास तो पात्र असल्यास पूर्वीच्या पदावर स्थायीत्व प्रमाणपत्र देण्यारा हरकत नसावी. तथापि, सदर प्रमाणपत्र देण्यापूर्वी तो यापूर्वी काम करीत असलेल्या कार्यालयाकडून दिनांक 19 रान्टेंचर, 1995 च्या परिपत्रकागधील 3 अर्टीची पूर्तता संबंधित कर्मचारी करीत होता किंया कसे याबाबतची माहिती मिळविणे आवश्यक राहील. नियुक्ती प्राधिका-यांना प्रमाणपत्र देणेसोयीचे व्हावे म्हणून प्रमाणपत्राचा नमुना सोयत जोडण्यात आला आहे. कायमपणाच्या फायद्याचे प्रमाणात्र योग्य त्या सक्षम प्राधिका-याच्या सहीने आणि सदरः नमुन्यातच देण्यात येतील याची दक्षता घ्यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

अस्थायी शासकीय कर्मचाऱ्याना कायमपणाचे फायदे उपलब्ध करून देणे, सक्षम प्राधिकाऱ्याने द्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना साप्रवि शानि  क्र स्थाप्रप-१०८५/ /५८६/प्र क्र ५५/१३- अ दि २८/०८/१९८५

दिनांक १९.९.१९७५ याअनुसार कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र होणा-या प्रत्येक अस्थायी शासकीय कर्मचा-याच्या बाबतीत त्या कर्मचा-याची नियुक्ती करण्यास सक्षम असणा-या अधिका-यांना तो कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र होत आहे, अशा आशयाचे प्रमाणपत्र येणे आवश्यक असते. अशी प्रमाणपत्रे देण्यात एकरूपता राखण्याच्या दृष्टीनं ती शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-१०७५/दहा, दिनांक ९ एप्रिल, १९७६ चे जोडपत्र "अ" मधील नमुन्यात नोंदवावेत असे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अशी प्रमाणपत्रे विहित नमुन्यात आणि सक्षम प्राधिका-याच्या सहीने दिली जात नाहीत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शासनाच्या असेही निदर्शनास आले आहे की, अशी प्रमाणपत्रे वेळच्यावेळी दिली जात नाहीत आणि दिल्या गेलेल्या प्रमाणपत्रांची नोंद संबंधित कर्मचा-याच्या सेवापुस्तकात घेतली जात नाही. त्यामुळे कायमपणाचे फायदे मिळण्यास पात्र असूनही केवळ तसे प्रमाणपत्र सेवापुस्तकात नोंदले न गेल्यामुळे कर्मचा-यांस सेवानिवृत्ती वेतनादि लाभ मिळण्यास अवाजवी अडचणी येतात. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे.
२.पात्र अस्थायी शासकीय कर्मचा-यांना कायमपणाचे फायदे देण्याची प्रमाणपत्रे वेळीच देण्याची आणि त्याची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्याची दक्षता नियुक्ती प्राधिका-यांनी घ्यावी. नियुक्ती प्राधिका-यांना प्रमाणपत्र देणे सोयीचे व्हावे म्हणून प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडण्यात आला आहे. कायमपणाच्या फायद्याची प्रमाणपत्रे योग्य त्या सक्षम प्राधिका-याच्या सहीने आणि हया नमुन्यातच देण्यात येतील याची दक्षता घ्यावी.
३.त्याचप्रमाणे शासन असेही आदेश देत आहे की, जे अस्थायी शासकीय कर्मचारी दिनांक ३१ डिसेंबर, १९८१ पूर्वी सेवत आले आहेत आणि ज्यांनी आपल्या अखंड सेवेची ३ वर्षे पूर्ण केली आहेत अशा अस्थायी शासकीय कर्मचा-यांना, जर ते विहित अटींची पूर्तता करीत असतील तर कायमपणाच्या फायद्याची प्रमाणपत्रे देण्याचे काम कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१ ऑक्टोंबर, १९८५ पूर्वी पूर्ण करण्यात यावे. त्याबाबतचा प्रतीपूर्ती अहवाल सोबत जोडलेल्या नमुन्यात संबंधित नियुक्ती प्रधिका-यांनी/विभाग प्रमुखांनी आपापल्या प्रशासकीय मंत्रालयीन विभागाकडे दि. ३० नोव्हेंबर, १९९५ पूर्वी न चुकता पाठवावा. मंत्रालयीन विभागांनी आपल्या विभागाचा व आपल्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या सर्व कार्यालयांबाबतचा एकत्रित अहवाल हया विभागाकडे दि. ३१ डिसेंबर, १९८५ पूर्वी न चुकता पाठवावा.
४.शासन असेही आदेश देत आहे की, अस्थायी शासकीय कर्मचा-यांना कायमपणाच्या फायदयाची प्रमाणपत्रे देण्याचे काम नियुक्ती प्राधिका-यांनी प्रत्येक वर्षात ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावे व त्याबाबतचा अहवाल ३० सप्टेंबर पर्यंत विभाग प्रमुखांकडे पाठवावा
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी..........

Temporary Government servants extension of benifits of permanecy to   साप्रवि परिपत्रक एसआरव्ही-१०७५-x दि २७/२/१९७६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

166481

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions