महाराष्ट्र नागरी सेवा नियम-१९८१
महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतील तरतुदी सर्व सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरी च्या सुरुवाती पासून ते नोकरी असेपर्यंत व निवृत्ती झाल्यानंतरही नियमांची आवश्यकता असते तेव्हा या नियमांचा अभ्यास,माहिती असणे आवश्यक व क्रमप्राप्त आहे हे नियम १५ ऑगस्ट १९८१ पासून अंमलात आले आहेत.
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मुंबई जिल्हा यांनी दि.21 व 22 सप्टेंबर, 2017 या कालावधीत पुकारलेल्या 2 दिवसांच्या पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत. दि 20-06-2019
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, मुंबई जिल्हा यांनी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दि.२१ व २२ सप्टेंबर, २०१७ या दोन दिवसाच्या कालावधीत पुकारलेल्या संपामध्ये जे शासकीय अधिकारी/कर्मचारी सहभागी झाले होते, त्यांची अनुपस्थिती “असाधारण रजा” म्हणून नियमित करण्यात यावी. तथापि, सदर असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय वित्त विभाग, क्र. सेनिवे १००१/२९/सेवा ४, दि. १४.०१.२००१ च्या आदेशास अपवाद करुन सेवेतील खंड न समजता निवृत्तीवेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राहय धरण्यात यावा.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अर्जित रजेचे रोखीकरण सुधारीत वेतन संरचनेनुसार करणेबाबत.दि 24-05-2019
दिनांक १ जानेवारी २०१६ रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या/होणाऱ्या तसेच वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ (२) व परिच्छेद क्र. ३ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी, शासकीय कर्मचाऱ्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या
परिगणनेसाठी ‘वेतन’ या संज्ञेचा अर्थ, हा उपरोक्त संदर्भ क्रमांक ४ येथील अधिसूचनेतील नियम क्रमांक ३(१२) अन्वये अंमलात आलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहील.
२. तसेच उपरोक्त परिच्छेद-२ मध्ये नमूद केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सुधारीत वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम, एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात यावी. जर संबंधीत कर्मचारी/अधिकारी यांस दिनांक ०१.०१.२०१६ ते दिनांक ३१.०१.२०१९या कालावधीत असुधारीत वेतनसंरचनेतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्याची रक्कम यापूर्वी अदा केलेली असल्यास, त्यांना या शासन निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम, ठोक रकमेद्वारे रोखीने प्रदान करण्यात यावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
सातव्या वेतन आयोगानुसार रजा प्रवास सवलतीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांबाबत.दि 07-03-2018
१. No.31011/8/2017-Estt-A-IV Government of India, Ministry of Personnel, Public Grievances & Pensions, Department of Personnel & Training dated 18 th January 2018. रजा प्रवास सवलत (LTC)
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
रजेचे रोखीकरण – स्वेच्छानिवृत्त, रुग्णता निवृत्त, राजीनामा.राजीनामा दिल्यास अर्जित रजे इतके रजेचे रोखिकरण नियम 68 दि 24-06-2016
मुख्य नियमांच्या नियम ६८ च्या, –
(i) शीर्षकात ” नियत वयोमान सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील, रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम ” च्या ऐवजी “नियत वयोमानाने सेवानिवृत्त/सक्तीने सेवानिवृत्त/स्वेच्छानिवृत्त/रुग्ण सेवानिवृत्त/स्वतः होऊन राजीनामा अथवा नोकरी सोडणारे कर्मचारी यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम ” असा समावेश करण्यात यावा.
(ii) मुख्य नियमांच्या नियम ६८ पोट-नियम (६) नंतर पुढील पोट-नियम समाविष्ट करण्यात यावा व तो दिनांक २५ मे १९८४ पासून लागू असल्याचे समजण्यात यावे :-
“ (७) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या नियम १० किंवा नियम ६५ अन्वये सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा सेवानिवृत्त करण्यात आलेल्या, किंवा नियम ६६ अन्वये सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या कालावधी इतकी, मात्र ३०० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम या नियमात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने स्वाधिकारे मंजूर. करील.”
(iii) पोट-नियम (७) नंतर, जो समाविष्ट केला आहे, खालील पोट-नियमाचा समावेश करण्यात यावा व तो दिनांक ३ नोव्हेंबर १९९२ पासून लागू असल्याचे समजण्यात यावे :-
“(८) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा, रुग्ण म्हणून सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा सेवानिवृत्त करण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीच्या तारखेस त्याच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या कालावधी इतकी, मात्र ३०० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन रांहून रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम या नियमात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने स्वाधिकारे मंजूर करील.”
(iv) पोट-नियम (८) नंतर (जो समाविष्ट केला आहे) खालील पोट-नियमाचा समावेश करण्यात यावा :-
“(९) रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी हा, स्वतः होऊन राजीनामा देणाऱ्या किंवा नोकरी सोडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा समाप्तीच्या तारखेस त्यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या कालावधीइतकी, मात्र ३०० दिवसांच्या कमाल मर्यादेस अधीन राहून रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम या नियमात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने स्वाधिकारे मंजूर करील.”अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अर्जित रजा परिगणना करण्याच्या पध्दतीत सुधारणा दि 11-10-2011
अर्जित रजेची परिगणना [नियम ५१ (२) (बी) : ज्या शासकीय कर्मचाऱ्यास नोकरीमधून
काढून टाकण्यात आलेले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल त्याच्या बाबतीत, ज्या कॅलेंडर महिन्यात त्याला नोकरीमधून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल, त्या कॅलेंडर महिन्याच्या आधीच्या कॅलेंडर महिन्याच्या शेवटापर्यंत, प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला २,१/२ दिवस या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात येईल. ज्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाला असेल त्याच्याबाबतीत त्याच्या मृत्युच्या दिनांकापर्यंत त्याने सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक महिन्यास २,१/२ दिवस या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करण्यात येईल.
२) अर्धवेतनी रजेची परिगणना [ नियम ६० (१) (ए) (चार): ज्या शासकीय कर्मचाऱ्यास
सेवेतून काढून टाकण्यात आलेले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल त्याच्या बाबतीत, ज्या कॅलेंडर महिन्यात त्याला नोकरीमधून काढून टाकण्यात आले असेल किंवा बडतर्फ करण्यात आले असेल, त्या कॅलेंडर महिन्याच्या आधीच्या कॅलेंडर महिन्याच्या शेवटापर्यंत, प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याला ५/३ दिवस या दराने अर्धवेतनी रजा त्याचे खाती जमा करण्यात येईल. ज्या शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाला असेल त्याच्या बाबतीत, त्याच्या मृत्युच्या दिनांकापर्यंत त्यांने सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक महिन्याला ५/३ दिवस या दराने त्याच्या खाती अर्धवेतनी रजा जमा करण्यात येईल.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत दि 10-12-2010
वित्त विभागाच्या दिनांक २७ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे अर्जित रजेचे रोखीकरण सुधारीत वेतन संरचनेनुसार करण्याबाबत काढण्यात आलेले आदेश राज्यातील खाजगी / प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ज्यांना अर्जित रजा देय आहे त्या संवर्गांना जसेच्या तसे या शासन निर्णयान्वये लागू करण्यात येत आहेत.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अर्जित रजेचे रोखीकरण (एका ठोक रकमेत).दि 10-11-2009
शासकीय कर्मचा-यांचे सुधारीत वेतन संरचनेतील ” वेतन ” विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम एका ठोक रक्कमेत रोखीने प्रदान करण्यात यावी. जर सदर कर्मचा-यास असुधारित वेतनश्रेणीतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्याची रक्कम अदा केली असल्यास त्यांना फरकाची रक्कम एका ठोक रक्कमेत रोखीने प्रदान करण्यात यावी.”
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत. दि 27-08-2009
दिनांक १.१.२००६ रोजी व त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असतांना मृत्यु झालेल्या /होणा-या तसेच दिनांक १५-01-२००१ शासन निर्णयातील परिच्छेद २ (२) व ३ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी शासकीय कर्मचा-याच्या खाती जभा असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या परिगणनेसाठी ” वेतन” या संज्ञेचा अर्थ शासन निर्णय दिनांक २२-०४-२००९ अन्मवये अमलात आलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन ) नियम २००९ मधील नियम ३ (२) मध्ये दिलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहील.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)(सुधारणा) 2008रजेचे स्वरूप बदलने नियम 14 (१) कामावर रुजू झाल्यापासून 30 दिवसात विनंती करणे दि 25-07-2008
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) (दुसरी सुधारणा) नियम, २००८ असे म्हणावे. २. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या नियम १४ मधील पोट-नियम (१) नंतर, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल :- * मात्र, अशा विनंतीवर प्राधिकाऱ्याला किंवा या संबंधात पद निर्देशित केलेल्या दुसऱ्या कोणत्याही प्राधिकाऱ्याला, संबंधित कर्मचाऱ्याने उपभोगलेल्या रजेचा प्रस्तुत कालावधी संपवून तो कामात्रर रुजू झाल्यापासून ३० दिवसांच्या कालावधीत अशी विनंती प्राप्त झाल्याखेरीज विचार करता येणार नाही. “
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा)(सुधारणा )2006 दि 29-06-2005
१. (एक) या नियमांस महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) (सुधारणा) नियम, २००६ असे म्हणावे. (दोन) हे नियम दिनांक १ जुलै २००६ पासून अंमलात येतील. २. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ च्या नियम ६८ मध्ये, – (अ) पोट-नियम (५) मध्ये, शासकीय कर्मचाऱ्याला” या मजकुराऐवजी, ” पोट-नियम ६ च्या तरतुदीच्या अधीन राहून, शासकीय कर्मचाऱ्याला” हा मजकूर समाविष्ट करण्यात यावा. (ब) पोट-नियम (५) नंतर पुढील पोट-नियम समाविष्ट करण्यात यावा :- “६ (ए) निलंबनाधीन असताना किंवा शिस्तभंगाची अथवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित असताना, सेवानिवृत्तीचे वय झाल्यावर सेवानिवृत्त होणा-या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यास, जर त्याच्या मते, अशा कर्मचा-याविरुद्धची कार्यवाही समाप्त झाल्यावर, त्याच्याकडून काही रक्कम वसुलीयोग्य होण्याची शक्यता असेल तर, अर्जित रजेची पूर्णतः किंवा अंशतः सममुल्य रोख रक्कम रोखून धरता येईल. कार्यवाही समाप्त झाल्यावर, तो शासकीय देण्याचे, कोणत्याही असल्यास, समायोजन केल्यावर, अशा रीतीने रोखून धरलेल्या रकमेस पात्र असेल. (बी) महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या तरतुदींनुसार एक शिक्षात्मक उपाय म्हणून शासकीय कर्मचाऱ्यास सक्तीने सेवानिवृत्त केल्यास, रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी, त्याला सेवानिवृत्तिच्या दिनांकास त्याच्या खाती अर्जित रजा जमा असल्यास ३०० दिवसांच्या कमाल मर्यादेपर्यंत, या नियमात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने अर्जित रजेबद्दल रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम देणारा आदेश काढील. “
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
सेवानिवृत्ती/मृत्युपूर्वी शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या लेखा शिर्षात बदल करण्याबाबत.दि 03-02-2004
नवीन लेखा शीर्ष उघडणे
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….
शासकीय सेवे तदर्थ / आस्थायी नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचा-याना रजा तदर्थ /अस्थाई कर्मचारी रजा दि 01-03-1997
दीर्घ सुटी विभागाव्यतिरिक्त अन्य विभागाच्या सेवेतील कर्मचारी
(अ) ज्या कर्मचा-यांची नियुक्ती विहित अभिकरणांमार्फत करण्यात आलेली असून निव्वळ तांत्रिक कारणास्तव ” तदर्थ अस्थायी” म्हणून समजण्यात आली असेल (उदा. स्थायालयाच्या आदेशानुसार नियनित नियुक्त करणे शक्य होत नाही) अशा कर्मचाऱ्यांना, नियमित अस्थायी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग/निवड मंडळ पुरस्कृत) कर्मचा-यांप्रमाणे, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील तरतुदीनुसार रजा होईल.
(ब) उपरोक्त (अ) येथे नमूद केलेल्या कर्मचाधातिरिक्त इत्तर तदर्थ अस्थायी कर्मचान्यांना खालील शतींच्या अधीन राहून रजा मंजूर करण्यात यावी.
(१) संबंधित कर्मचाऱ्याने पूर्ण केलेल्या सेवेकरिता दरमहा २0 दिवस याप्रमाणे अर्जित रजा देण्यात यावी.
1945) रजा मंजूर करताना ती पूर्ण दिवसांमध्ये मंजूर करण्यात यावी.
(३) सेवेत असताना /सेवा समाप्तीनंतर यथास्थिती अर्जित रजा प्रापत करण्याची शिल्लक अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मुभा दिली जाणार नाही.
(४) तदर्थ अस्थायी म्हणून करण्यात आलेली नेमणूक अपरिहार्य कारणास्तव तीन वर्षांच्या पलीकडे सलग चालू ठेवण्यात आलेली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना, त्यांच्या नियुक्तीच्या सुरुवातीच्या दिनांकापासून म.ना.से. (रजा) नियम, १९८१ मधील तरतुदीनुसार नियमित अस्थायी कर्मचा-यांप्रमाणे सर्व प्रकारच्या रजेचे लाभदेण्यात यावेत.अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……….