ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक (होर्डिंग्ज) लावण्याच्या परवानगीबाबत धोरण/नियम करण्याकरिता समिती स्थापन करणेबाबत
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः व्हीपीएम २०२५/०९/पंरा-४ (ई-ऑफीस क्र. ९७१०३४) बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट मंत्रालय, मुंबई-४०० ००१ तारीखः ६ मे २०२५ [Regarding the constitution of a committee to formulate a policy/rules for granting permission to erect advertisement boards (hoardings) within Gram Panchayat limits.]
मा.उच्च न्यायालय, मुंबई रिट याचिका क्र.८६५७/२०२४ संदर्भातील दि.२१ ऑगस्ट २०२४ च्या आदेशात ग्रामपंचायतीला जाहिरात फलक/होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याबाबत अधिकार नसल्याचे नमूद केले आहे. तसेच मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील जनहित याचिका क्र.१५५/२०११ याचिकेत अनधिकृत जाहिराती, घोषणा फलक, होर्डिंग, पोस्टर्स बाबत विस्तृत आदेश दिले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये सद्यस्थितीत ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात – फलक (होर्डिंग्ज) लावण्याबाबत कोणतीही तरतूद अथवा नियम नाहीत.जाहिरात फलक/होर्डिंग लावण्याबाबत/परवानगी याबाबत नगर विकास विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे धोरण /नियम विहीत केलेले आहेत. ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक/होर्डिंग लावण्यास विहीत पद्धतीने परवानगी
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF तारीखः ६ मे २०२५ वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी……..
दिल्यास त्यापासून ग्रामपंचायतीना उत्पन्न प्राप्त होणार आहे. जाहिरात फलक/होर्डिंग उभारण्यातून निर्माण होणा-या आपत्ती घडू नये यानुषंगाने ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक/होर्डिंग लावण्याबाबत तसेच त्यासाठीच्या परवानगी याबाबत दिनांक ०३/०२/२०२५ रोजी मा. मंत्री (ग्रामविकास) महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने धोरण/नियम करण्याबाबत साधक बाधक विचार विनिमय होणे अपेक्षित असल्याने समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज बोर्डसाठी मान्यता देण्याचे अधिकार नसल्याबाबत मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायती राज विभाग शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम-२०२४/प्र.क्र.१३३/पंरा-४ दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२४ [Implementation of the Hon. High Court’s orders regarding the lack of authority of the Gram Panchayat to grant approval for any type of advertisement boards or hoardings within its jurisdiction.]
मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट याचिका.क्र. ८६५७/२०२४ संदर्भातील दि.२१.८.२०२४ च्या आदेशात निदर्शनास आल्याप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ तसेच त्याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या नियमात व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० मध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज लावण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी देण्याची तरतुद नाही. सबब राज्यातील ग्रामपंचायतींनी, ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक / होर्डिंग्ज लावण्यासाठी ना- हरकत प्रमाणपत्र अथवा मान्यता देण्याचे नियमबाह्य कृत्य करु नये. नियमबाह्य कृत्य करणाऱ्या संबंधितांवर प्रचलित कायद्यतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक / होर्डिंग्ज काढून टाकण्याची तात्काळ कार्यवाही करावी.
अधिक व सविस्तर माहितीसाठी वरील शासननिर्णयाच्या PDF दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२४ वर Click करून download करून माहिती मिळवून घ्यावी………
#mukhymantrisamrudhiabhiyan #mspa #governmentofmaharashtra#maharashtra#checklist#MaharashtraGovernment #GovernmentGR #GovernmentResolution #MaharashtraGR #GR #Maharashtra Government #Government Resolution #GR #Government Decision #DIVABATTI TAX #FACTORY TAX #Government Decision #Government Resolution #GR #Gram Panchayat Taxes and Fees #GRAMPANCHAYAT KAR AKARNI, #GRAMPANCHAYAT TAXES #KARKAHANA TAX #Maharashtra Government #MAJI SANIK TAX #MIDC #MIDC TAX #MOBILE TOWER TAX #PAVAN CHAKKI TAX #PROPERTY TAX #SANIK VIDHVA TAX, #SANITARY TAX #SOLAR PROJECT TAX #TAX FREE #taxation-at-industrial-rate #Encrochment #gharkul #Pandit dindayal upadhay gharkul #atikraman #permision #building #construct #Maharashtra Regional and Urban Planning Act
या संकेतस्थळावरील Contact Form / Feedback Form वापरू शकता.
आपल्याला येथील माहिती उपयुक्त वाटल्यास ही वेबसाइट आपल्या सहकारी, मित्रपरिवार आणि संबंधित व्यक्तींसोबत शेअर करू शकता
https://gramvikaseseva.com/grampanchyat-kar-v-fee/https://gramvikaseseva.com/tower-fee/
Leave a Reply