Thursday, January 15, 2026
Thursday, January 15, 2026
Home » विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक

विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक

0 comment 524 views

विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत दि. २७ जुलै, २०१५ पासून दि.२० ऑगस्ट,२०२१ पर्यंत निर्गमित सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण – सुधारित, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत.. सामान्य प्रशासन विभाग 20-11-2025

विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 20-06-2021

विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणे, इ. बाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.सामान्य प्रशासन विभाग 21-10-2020

विधानमंडळ / संसदेच्या महिला सदस्यांना विशेषत्वाने सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 20-03-2020

विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांसदर्भातील दिनांक 27 जुलै, 2015 च्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक ७ (ii) मधील माहिती या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत.. सामान्य प्रशासन विभाग14-02-2020

विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 30-05-2018

विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन परिपत्रक दि.२७ जुलै, २०१५ तील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याबाबत. सामान्य प्रशासन विभाग 27-10-2017

संसद व विधीमंडळाच्या माजी सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणेबाबत. सामान्य प्रशासन विभाग 17-04-2017

विधान मंडळ, संसद सदस्यांना सन्मानाची सौजन्याची वागणूक देणे, त्याचेकडून आलेल्या पत्र ,अर्ज निवेदनांना पोच देणे त्यावर सत्वर कार्यवाही करणे,शासकीय कार्यक्रमाना लोकप्रतिनिधीना आमंत्रित करणे, त्याचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापणे इ बाबत मार्गदर्शक तत्वे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दि २७-०७-२०१५

कर्मचाऱ्यांकडून सन्मानजनक वागणूक मिळण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना.

(৭) विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्यासंबंधी : विधानमंडळ / संसद सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी शासकीय कार्यालयांना कामानिमित्त भेट देतील, त्या वेळी त्यांना आदराची व सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी. खासदार / आमदार यांचे म्हणणे शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक ऐकून घ्यावे व शासकीय नियमानुसार शक्य असेल तेवढी मदत लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामकाजात करावी. (ii) खासदार / आमदार भेटावयास येतेवेळी व भेट संपून परत जातेवेळी अधिकाऱ्यांनी त्यांना उत्थापन देऊन अभिवादन करावे.

(iii) विधानमंडळ / संसद सदस्य यांनी दूरध्वनीद्वारे माहिती विचारल्यास अथवा चौकशी केल्यास सन्माननीय सदस्यांना यथोचित माहिती द्यावी. दूरध्वनीवरून सन्माननीय सदस्यांशी बोलताना आदराने व सौजन्याने बोलावे.

(iv) शासकीय कार्यालयात अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांना सौजन्यपूर्ण व आदराची वागणूक न दिल्याचे निदर्शनास आल्यास किंवा त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात यावे व त्यांच्याविरुध्द प्रचलित शिस्तभंगविषयक नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

(v) विधानमंडळाची कोणतीही समिती एखाद्या शासकीय कार्यालयाला / निमशासकीय कार्यालयात भेट देते, त्यावेळी विधानमंडळाच्या कोणत्याही समितीची प्रतिष्ठा व विशेषाधिकार यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने अशा समितीला नेहमी सौजन्यपूर्ण वागणूक देण्याविषयी विशेष खबरदारी घ्यावी. (vi) भेटीसाठी आलेल्या अभ्यागतांमध्ये विधानमंडळ / संसद सदस्य व इतर लोकप्रतिनिधी यांना प्राधान्य देणेः- पूर्वनियोजित अपरिहार्य शासकीय कामामध्ये व्यग्र असतांना भेटीसाठी आलेल्या विधानमंडळ / संसद सदस्यांच्या / इतर लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास पूर्वनियोजित अपरिहार्य कार्यक्रमात व्यग्र असल्याची बाब विनम्रपणे आणून सन्माननीय सदस्यांच्या सोयीची अन्य वेळ ठरवून घ्यावी. नागरिकांसाठी राखून ठेवलेल्या वेळेत भेटीसाठी येणाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांनी खासदार / आमदार यांना प्राधान्य द्यावे व भेटीची वेळ आगावू ठरवून आलेल्या नागरिकांच्या भेटी घेतल्यानंतर भेटीसाठी आलेले खासदार / आमदार यांना प्राधान्य देऊन अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घ्यावी. सन्माननीय लोकप्रतिनिधींना त्यांची संविधानिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने त्यांना मदत करतांना प्रयत्नांची शिकस्त करणे अपेक्षित आहे.

(२) शासकीय कार्यक्रम / समारंभाच्या वेळी विधानमंडळ सदस्य / संसद सदस्यांना आमंत्रित करणे इत्यादीबाबत :- शासकीय लोकोपयोगी / विकासात्मक कामांच्या भूमिपूजनाच्या / पायाभरणीच्या / शुभारंभाच्या /उद्घाटनाच्या, इत्यादी संदर्भातील कार्यक्रमांत स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असतो, म्हणून अशा कार्यक्रमाच्या वेळी त्या कार्यक्षेत्रातील सर्व विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, लोकसभा /राज्यसभा सदस्य महोदयांना योग्य ती पूर्वसूचना देऊन आमंत्रित करण्यात यावे. त्यांनाही विश्वासात घेऊन ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे याची खातरजमा करून या समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेत प्रमुख उपस्थितांच्या नांवाचा उल्लेख असल्यास त्यामध्ये सन्माननीय स्थानिक खासदार / आमदारांच्या नांवाचा समावेश करावा.

(1) ज्या मतदारसंघात शासकीय कार्यक्रम असेल, त्या मतदारसंघातील सर्व विधानमंडळ / संसद सदस्यांची नांवे निमंत्रणपत्रिकेवर योग्य प्रकारे छापण्यात यावीत. (ii) ज्या जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम/समारंभ असेल, त्या जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनाही सदर कार्यक्रमास आमंत्रित करावे. तसेच तत्संबंधीच्या निमंत्रण पत्रिकेवर पालक मंत्र्यांचे नांव योग्यप्रकारे छापण्यात यावे व समारंभाच्यावेळी त्यांना आदराचे स्थान देऊन त्यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचारानुसार करण्यात यावी. (iii) ज्या जिल्ह्यात शासकीय कार्यक्रम असेल, त्या जिल्ह्यातील सर्व केंद्रीय मंत्री (मंत्री / राज्यमंत्री / उपमंत्री) राज्यातील त्या जिल्ह्यातील सर्व मंत्री (मंत्री/राज्यमंत्री / उपमंत्री) यांनाही योग्य ती पूर्वसूचना देऊन आमंत्रित करण्यात यावे. त्यांना विश्वासात घेऊन ते कार्यक्रमास उपस्थित राहणार किंवा कसे याची खातरजमा करून समारंभाच्या निमंत्रणपत्रिकेवर त्यांचे नांव योग्य प्रकारे छापण्यात यावे. (iv) तसेच त्यांना समारंभाच्या वेळी आदराचे स्थान देण्यात यावे व समारंभाच्या वेळी त्यांची व्यासपीठावरील बैठक व्यवस्था राजशिष्टाचारानुसार करण्यात यावी.

खासदार,आमदार यांना शासकीय कार्यालयात सौजन्‍यपूर्व वागणूक देण्‍यासंबधी. CR क्रमांक:- सीडीआर-1091-प्र.क्र.6-91-अकरा, दिनांक:- 31-12-1991

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

About Us

सुचना सदर वेबसाईट ही कर्मचारी-अधिकारी यांना दैनदीन कामकाजात आस्थापना विषयक, लेखाविषयक, योजनांची माहिती, ज्ञान प्राप्त व्हावे व दैंनदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशां नुसार अचूक अंमलबजावणी करता यावीया उद्देशाने निर्मीत केलेली आहे.

सदर वेबसाईट निर्मीतीचा कोणताही व्यवसायिक हेतु नाही. तथापि, अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी जबाबदार राहणार नाही.

अधिक अभ्यासासाठी मुळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी/चुक निदर्शनास आणुन दिल्यास सुधारणा करण्यात येईल.

माहितीस्थळ भेटीबाबत

273291

© 2025 All Rights Reserved by Gramvikaseseva | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions