Tuesday, October 13, 2026
Tuesday, October 13, 2026
Home » तीर्थक्षेत्र विकास योजना

तीर्थक्षेत्र विकास योजना

0 comment 4.8K views

ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ब वर्ग देणे व निधीची मागणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत. क्र. तीर्थवि-२०२४/प्र.क्र.३०/यो-११ दिः ०९/०३/२०२४

ग्रामीण यात्रास्थळ/तिर्थक्षेत्र विकास योजना या सध्याच्या कार्यक्रमास अनुक्रमे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब-वर्ग) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना या नावाने लागू करुन, अनुदानात वाढ करणेबाबत. ग्राम विकास विभाग 28-12-2023 सांकेतांक क्रमांक 202312281727158220

यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदांना अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीच्या मर्यादेत वाढ करणेबाबत.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक : तिर्थवि २०२१/प्र.क्र.३६८/ योजना-६ बांधकाम भवन, २५ मर्झबान मार्ग, मुंबई- ४०००३२. तारीखः २३ फेब्रुवारी, २०२२.

यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्हापरिषदांना अनुदान ही जिल्हास्तरीय “वार्षिक योजनेत प्रतिवर्ष प्रत्येक जिल्हयास रू. ३०.०० लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात येत होती. आता त्यामध्ये वाढ करून रू. ६०.०० लक्ष इतकी खर्चाची वार्षिक मर्यादा करण्यात येत आहे “.

नियोजन विभाग, शासन निर्णय क्रमांक तीक्षेवि-२०१५/प्र.क्र.६/का-१४४४, दिनांक ४ जून २०१५ अन्वये तीर्थक्षेत्रांचे आराखडे जिल्हास्तरीय समिती, राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती व शिखर समितीच्या मान्यतेसाठी सादर करतांना खालील बाबींचा समावेश असावा :-

अ) तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस चौकीची योग्य व्यवस्था असावी.

ब) भाविकांकरीता येण्या-जाण्याकरीता बस स्थानकाची योग्य व्यवस्था असावी.

क) तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा (ओला व सुका) व सांडपाण्याचे सुयोग्य व्यवस्थापनाकरीता तजवीज असावी.

ड) तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांकरीता स्वच्छतागृह असावे.

इ) पर्जन्य जल पुनः भरणची (Rain Water Harvesting) व्यवस्था असावी.

तीर्थक्षेत्राचा परिसर स्वच्छ व हिरवा (Green zone) राहण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

उ) ज्या तीर्थक्षेत्राच्या परिसरात शासकीय किंवा ट्रस्टची जागा उपलब्ध असेल, त्या जागेमध्ये मोठया प्रमाणात झाडे लावण्याचे प्रयोजन असावे.


राज्यस्तरीय शिखर समिती, उच्चाधिकार समिती, जिल्हास्तरीय समिती व जिल्हास्तरीय कार्यकारी समिती खालीलप्रमाणे गठीत करण्यात येत आहेत.

(अ) ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्राच्या महात्म्यामुळे सदर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दररोज अंदाजे १५०० ते २००० भाविकांची किंवा त्यापेक्षा कमी भाविकांची आणि यात्रा / उत्सवाच्या वेळी दरवर्षी चार लाखापेक्षा जास्त भाविकांची उपस्थिती असते. या उपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी शासनाने विहीत केलेल्या प्रमाणपत्रात भाविकांची उपस्थिती प्रमाणित करुन दिल्यास अशी तिर्थक्षेत्रे वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्याकरिता पात्र ठरु शकतील.

https://gramvikaseseva.com/ ही महाराष्ट्र शासनाशी संबंधित शासकीय निर्णय (Government Resolutions – GR) आणि परिपत्रके (Circulars – CR) यांची माहिती विषयनिहाय माहिती उपलब्ध करणारे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे. या वेबसाइटचे मुख्य उद्दिष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी,नागरिकांना शासकीय धोरणे, नियम, आणि योजनांबाबत अद्ययावत आणि परिपूर्ण माहिती प्रदान करणे आहे.
You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment