आत्महत्या-आत्मदहन-उपोषण-मोर्चा आंदोलने निषेध ई बाबतच्या निवेदनाच्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करण्याबाबत गृह विभाग शासननिर्णय दिनांक १०-०८-२०२१ pdf मधील file download करण्यासाठी येथे click करा
शासन निर्णय खालील प्रमाणे
राज्यात जिल्हा व तालुका पातळीवर विविध संघटनांतर्फे विविध विषयांवर विविध मागण्यांसाठी मोर्चाने येऊन निदर्शने करुन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना निवेदने / अर्ज सादर केले जातात. त्याचप्रमाणे विविध भागातील व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक मागणीकरीता उपोषण, इच्छा मरण, आत्महत्या, आत्मदहन, निषेध, आंदोलन इ. बाबतची व्यक्तीशः निवेदने सादर करतात. सदर निवेदनामधील मागणीचा मुळ विषय कोणत्या विभागाशी संबंधित आहे याबाबतचा विचार न करता व त्यामधील विषयाचा गृह विभागांशी संबंध नसतानाही त्यांच्याकडून मुळ अर्ज गृह विभागाकडे पाठविली जातात. गृह विभागात अशा मोर्चाच्या, उपोषण, आत्महत्या, आत्मदहन, आंदोलन इ. संदर्भात केवळ कायदा व सुव्यवस्थेशी संबंधीत बाबींवर कार्यवाही करणे अभिप्रेत असते. त्यामुळे गृह विभागात प्राप्त झालेल्या अशा निवेदनामधील इतर मागण्या / समस्या / अडचणी इत्यादींचा विचार केला जात नाही.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे आलेला मोर्चा, विविध संघटनांनी केलेली निदर्शने / घेराव याबाबतची केवळ कायदा व सुव्यवस्था बाबतची वस्तुनिष्ठ माहिती पत्राव्दारे गृह विभागास कळविण्यात व त्यांच्याकडे प्राप्त झालेली विविध विषयावरील निवेदने संबंधित मंत्रालयीन विभागाकडे परस्पर पाठविण्याबाबत दिनांक १२.०५.२००५ व दिनांक १२.०३.२००८ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत. तरी सुध्दा गृह विभागाशी संबंधित नसलेल्या विषयावरील मूळ निवेदने / मुळ अर्ज आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी गृह विभागाकडे पाठविली जातात. त्यामुळे सदर निवेदनातील / अर्जातील मुळ मागणींवर कार्यवाही होण्यासाठी मंत्रालयातील संबंधित विभागाकडे परस्पर पाठविण्यात यावी व उपोषण, इच्छामरण, आत्महत्या, आत्मदहन, मोर्चा, आंदोलन, निदर्शने, निषेध इत्यादीबाबतच्या निवेदनावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून तात्काळ कार्यवाही करण्यासाठी एक प्रत संबंधित विभागातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना सदरचे निवेदन / अर्ज पाठविण्याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात यावी