केंद्र प्रमुख पदाच्या पदोन्नती प्रक्रिये बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारित कार्यपद्धती नुसार कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २७-१२-२०२३
महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक त्या सुधारणेसंदर्भातील सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन संदर्भ क्र (३) येथील नमूद शासन निर्णयातील सुधारीत तरतूदीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात शासनाकडे मार्गदर्शनसाठी प्रलंबित प्रकरणाबाबतही नियुक्ती प्राधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सदर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी.
केंद्र प्रमुख या पदावरील मर्यादेत विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २७-०९-२०२३
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीच्या अनुषंगाने निर्गमित शासन शुध्दीपत्रक दिनांक ०९.०३.२०२३ याअन्वये अधिक्रमीत करण्यात येत आहे.
तसेच शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१, ५.२ व ६ येथील तरतूदी यान्वये वगळण्यात येत आहेत. परंतु उर्वरित तरतूदी यापुढे लागू राहतील.
०२. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीद्वारे केंद्रप्रमुख पदावरील निवडीकरीता पुढीलप्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्यात येत आहे:-
२.१ मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवड:- मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
२.२ पदोन्नतीने नियुक्तीसाठी:- ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.
०३. केंद्रप्रमुख ही पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेमधील असल्याने त्यांच्या सेवा प्रवेशासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी ग्राम विकास विभागाने कार्यवाही करावी.
केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरिता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०३-२०२३
शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ मधील परिच्छेद क्र.५.१ हा वगळण्यात येत असून, त्याऐवजी परिच्छेद क्र. ५.१ पुढीलप्रमाणे वाचण्यात यावा. ” विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरीलप्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. ” ०२. तसेच परिच्छेद क्र. ६ मधील “प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक)” याऐवजी “प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक)” असे वाचण्यात यावे.
अधिक माहिती साठी शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.
केंद्र प्रमुखाची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 01-12-2022
०४. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:-
४.१ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाः विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.
४.२ परीक्षेचे आयोजन व स्वरुपः- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी
अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-
१. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
२. ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्य पातळीच्या किमान १० प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षाथ्यर्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
३. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल.
४. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परीषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.
४.३ परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रमः परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम
गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील.अधिक माहिती साठी शासन निर्णय PDF वर Click करून माहिती मिळवून घ्यावी.